तिहेरी तलाकविरोधातील कायदा करून ऐतिहासिक चूक सुधारली – अमित शहा

660

तिहेरी तलाकविरोधातील विधेयक हे मुसलमानांच्या फायद्याचे आहे त्याचा हिंदू, ख्रिश्चन, जैन धर्मियांना फायदा होणार नाही’, असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी तिहेरी तलाक विरोधातील कायदा आणून ‘ऐतिहासिक चूक सुधारल्याचे’ सांगितले. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने शहाबानोला दिलेल्या तिहेरी तलाक विरोधात निर्णय पोटगी देणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले होते. मात्र तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी व्होटबँकचा विचार करत त्यावेळी हा कायदा बनवला नव्हता, असा आरोप शहा यांनी केला आहे. ॉ

‘तिहेरी तलाकची प्रथा ही मुस्लीम महिलांसोबत अन्याय करणारी प्रथा होती. महिलांना अधिकारापासून रोखणारी प्रथा होती. समानतेपासून दूर ठेवणारी प्रथा होती तिहेरी तलाकविरोधातील हा कायदा आणून आम्ही कोणतीही चूक केलेली नाही हे आम्हालाही माहित आहे व जे या कायद्याचा विरोध करत आहेत. त्यांनाही माहित आहे. अनेक नेत्यांनी संसदेत त्याचा विरोध केला मात्र त्यांच्या मनाला माहित आहे की ही वाईट प्रथा आहे ती हटवलीच पाहिजे. पण ते बोलू शकले नाही’, असे अमित शहा यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी तिहेरी तलाक विधेयकाला विरोध केला म्हणून काँग्रेसवर देखील निशाणा साधला. ‘काँग्रेसला बिलकूल लाज राहिलेली नाही. ते सांगतात आम्ही तिहेरी तलाकचे समर्थन करतो, ही प्रथा राहिली पाहिजे. मात्र त्यांचे या प्रथेला समर्थन का आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांनी फक्त त्यांचे व्होटबँक टिकवून ठेवण्यासाठी या विधेयकाला विरोध केला’, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला फटकारले.

आपली प्रतिक्रिया द्या