विद्यापीठांना परीक्षा घेण्याची गृहमंत्रालयाची परवानगी

733
exam-pattern
प्रातिनिधिक फोटो

देशभरात कोरोनाचा संसर्ग कायम असतानाच केंद्रिय गृहमंत्रालयाने विद्यापीठांना परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊन केले. 1 जूनपासून ‘अनलॉक-1’ केले होते. तर 1 जुलैपासून ‘अनलॉक-2’ सुरू आहे. देशातील सर्वच राज्यांनी आपल्या विद्यापीठांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएसई, आयसीएसई बोर्डानेही दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. मात्र, सोमवारी केंद्रिय गृहमंत्रालयाने निवेदन प्रसिद्धीस देवून विद्यापीठांना परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. ‘युजीसी’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिम वर्षाची परीक्षा दयावी, असे यात म्हटले आहे. मात्र, कोरोनास्थिती पाहून विद्यापीठांनी परीक्षाचे कसे आयोजन करायचे याबाबत स्पष्ट केलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या