होम क्वारंटाईनचे आदेशभंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

474

होम क्वारंटाईनचे आदेश असतानाही आदेशाचा भंग करून शहरावर साथीचे संकट निर्माण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व नगरसेवक आनंदराव पवार यांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सौदी अरेबियाला जाऊन आल्यानंतर शासकीय यंत्रणेने त्यांना दि.30 पर्यंत घरीच अलग रहाण्यास सांगितले होते. पण त्यांनी आदेशाचा भंग करून दि.15 रोजी सुमारे 250 लोकांना कुब्बा मस्जिद येथे मेजवानी दिली. त्या दरम्यान व नंतर ते बाहेर फिरत होते. पोलिसांनीही तोंडी घरी रहाण्याचे आदेश दिले होते. दि.18 रोजी अलग रहाण्या बाबत नोटीस बजावली होती. तरीही त्यांनी जुमानले नाही. त्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांच्या या नियमभंगामुळे शहराला नाहक त्रास झाला असून त्यांच्यावर भा. द. वि. स कलम 269, 270 व 271 नुसार कारवाई करण्यात यावी,असे या निवेदनात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या