होम क्वारंटाईन तरुणावर वसई पोलिसांची कारवाई, मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

3581

कोरोना व्हायरसच्या प्रसारास आळा घालण्यासाठी परदेशवारी करून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन आदेश दिले आहेत. असे असताना वसईतील एक तरूण सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे वसई पोलिसांनी सदर तरूणाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वसईतील सालोली येथील 35 वर्षीय तरूण अमेरिकेहून 23 मार्च रोजी हिंदुस्थानात परतला होता. वैद्यकीय तपासणीअंती त्याला होम क्वारंटाईन शिक्का मारून 14 दिवस घरी विलगीकरण राहण्यास सांगितले होते. मात्र सदर तरूण घरी न राहता सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याची माहिती वसई पोलिसांना मिळाली. या प्रकरणी मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी सदर तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या