एकता कपूरच्या ‘होम’ वेबसिरीजला आयटाचा पुरस्कार

53

सामना ऑनलाईन । मुंबई

एकता कपूरच्या एएलटी बालाजीची निर्मिती असलेल्या ‘होम’ या वेबसिरीजला इंडियन टेलीविजन अॅकॅडमी अवार्ड्स 2018 चा बेस्ट वेबसिरीजचा पुरस्कार मिळाला आहे. या व्यतिरिक्त या वेब सिरीजमधील अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर व अभिनेते अनु कपूर यांना देखील सर्वोत्तम अभिनेत्री व अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्याला एकता कपूर ही तिचे वडील जितेंद्र यांच्यासोबत उपस्थित होती.

होम ही वेबसिरीज एका सेठी कुटुंबावर आधारित आहे. बिल्डरांच्या दबावामुळे सेठी कुटुंबाला त्यांचे घर सोडावे लागते व त्यामुळे त्यांचे आयुष्य कसे बदलून जाते. त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळाला ते कसे सामोरे जातात हे या वेबसिरीजमध्ये दाखविण्यात आले आहे. 12 एपिसोडची ही वेबसिरीज एएलटीबालाजीच्या एप्लिकेशन व वेबसाईटवर आजपासून सुरू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या