नाशिकच्या कारचा कोपरगावजवळ भीषण अपघात, पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू

4759

नाशिकमधील कोळपेवाडी येथून कोपरगावकडे जात असताना होंडासिटी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. रवींद्र वानले, प्रतिभा रवींद्र वानले, साई रविंद्र वानले आणि जान्हवी रवींद्र वानले अशी मृतांची नावे आहेत. कारचालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वानले कुटुंबीय पांढर्‍या रंगाच्या होंडा सिटी (झेडएक्सएमएच. 15 बी.एक्स. 5145) या कारने मंगळवारी कोपरगावकडे येत होते. या दरम्यान रात्रीच्या सुमारास वहाडणे वस्तीजवळील म्हसोबा मंदिर चराजवळ कारला अपघात झाला. अपघातामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला आणि पेटही घेतला. या दुर्घटनेत प्रतिभा रवींद्र वानले (33), साई रविंद्र वानले (10) जान्हवी रवींद्र वानले (4) हे तिघे जागीच ठार झाले. तर रवींद्र वानले यांना जबर दुखापत झाली.

car

अपघातानंतर घटनास्थळी धाव घेतलेल्या स्थानिक नागरिकांनी रवींद्र वानले यांना तातडीने कोकणठाण येथील आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविले. मात्र बुधवारी दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील नातेवाईक कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला हजर झाले. पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या