वेरुळ लेण्यांमध्ये मधमाश्यांचा हल्ला, अनेक पर्यटक जखमी

27

सामना ऑनलाईन । वेरुळ

जगप्रसिद्ध वेरुळ लेणी पाहायला आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात हिंदुस्थानी पर्यटकांसह काही जपानी पर्यटक जखमी झाले आहेत.

वेरुळ येथील ३४ लेण्यांपैकी ३२ क्रमांकाच्या लेण्यामध्ये पर्यटक लेणी पाहत होते. तेव्हा अचानक लेण्यातच वस्तीला असलेल्या आग्या मोहोळाच्या मधमाशांनी पर्यटकांना दंश करण्यास सुरुवात केली.

या हल्ल्यामुळे इतर वेळी शांत असणाऱ्या लेणी परिसरात एकच गोंधळ उडाला. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी तातडीने पर्यटकांच्या मदतीला आले. आरोग्य अधिकाऱ्यांच्या साहाय्याने जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी पर्यटक संभाजीनगर येथे रवाना झाले.

आपली प्रतिक्रिया द्या