मधुचंद्र : संग्राम साळवी – खुशबू तावडे यांची स्वप्ननगरीत

मधुचंद्र म्हणजे –  परदेशात केलेली ट्रिप आणि एकांतात घालवलेला वेळ ंम्हणजे माझ्यासाठी मधुचंद्र.

फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? ः आम्ही पॅरिस-स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि त्याचं सगळं नियोजन खुशबूने केलं होतं.

तिथे आवडलेलं ठिकाण? ः स्वित्झर्लंड. स्वप्ननगरी. तिथल्या निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य आजही डोळ्यासमोरुन जात नाही. लहानपणी आपण चित्र काढायचो टोकदार डोंगर, त्याच्या मागे सूर्य, ढग, डोंगराच्याखाली एखादं घरं असे प्रत्यक्ष निसर्गाचे रुप मी तिथे पाहिले. आमच्या हॉटेलच्या अगदी समोरच ही निसर्गाची किमया पाहता यायची. ते रुप डोळ्यात साठवून ठेवलं आहे.

ठिकाणाचे वर्णन – प्रत्येकाने आयुष्यात एकदा बघावे असेच स्वित्झर्लंड आहे. तिथला बर्फ, थंडी, निसर्ग याचा अनुभव एकदा घ्यावा. तिथलं वैशिष्टय़ म्हणजे तिथे इमारत एकही पाहायला मिळत नाही. तिथली गंमत म्हणजे गाय एकावेळेला बत्तीस-तेहत्तीस लीटर दूध देते. तिथे अक्षरशः दुधाच्या पाईपलाईन असतात.

तिथे केलेली शॉपिंग – खूप म्हणजे खूप चॉकलेट्स आणले होते. इतके चॉकलेट्स आणले होते की इतरांना वाटून आम्ही वर्षभर खाल्ले. त्याबरोबरच कपडय़ांचीही खूप शॉपिंग केली होती.

मधुचंद्र हवाच की… – ते माझ्यामते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं आणि हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला असं वाटतं मधुचंद्र हवाच. एकमेकांना ओळखण्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी मधुचंद्र हवाच. नंतर आपण आयुष्यभर व्यस्त होऊन जातो. हेच क्षण असतात जे फक्त दोघांचे असतात.

एकमेकांशी नव्याने ओळख – लग्नाआधी आमच्यात चांगलीच मैत्री होती आणि लग्नानंतरही आम्ही ती जपली आहे. एकमेकांना चांगले ओळखत असल्याने ती नव्याने ओळख नव्हती.

एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत… – काहींना ओळखण्यासाठी काही क्षण पुरेसे आहेत तर काहीवेळेला आयुष्य कमी पडतं. त्यामुळे हे प्रत्येक व्यक्तिवर अवलंबुन असतं.

तिथली आठवण – आम्ही स्वित्झर्लंडच्या माऊंट टिटलीस वर गेलो होतो. हे ठिकाण दहा हजार फुटांवर आहे. ड़ीडीएलजे चित्रपटाचे शुट झालेले तिथे आम्ही गेलो होतो. आमच्यासोबत आमचा मित्र त्याच्या बायकोसोबत होता. तिथे आम्ही दोघांनी मनसोक्त डान्स केला होता. खूप मजा आली होती.

तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – तिथले बर्गर, पास्ता, पिझ्झा भरपूर आवडले होते. आम्ही तिथे एका चॉकलेटीअर शॉपमध्ये गेलो होतो. मी त्या दुकानात गेल्यावर अक्षरशः वेडाच झाला होतो. सगळीकडे चॉकलेट्सच होती

अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसीझम – अनोळखी ठिकाण जास्त आवडेल. अशाठिकाणी नवीन जागा पाहता येते. तसेच आपल्या जोडीदारासोबत गेल्यावर ती जागा रोमॅण्टिक होऊनच जाते.

मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – ती खूपच प्रेमळ आणि समजूतदार आहे. माझ्यात लहान मुल आहे आणि ती त्याला खूप चांगल्याप्रकारे सांभाळते. मुळात मुलींना शॉपिंगचे प्रचंड वेड असतं पण इथे उलट आहे मला शॉपिंगचे फार वेड आहे. आणि अशावेळी कुठेही गेल्यावर खुशबूला मला सांगावं लागतं आता पुरे कर. तिला जेवण बनवून इतरांना खायला घालायला आवडतं. तिला किचन आवडतं. नवीन डीश बनवायला आवडतात. तिला पटकन राग येत नाही. तिच्यात फार पेशन्स आहेत आणि म्हणूनच मला ती आवडते. माझं अख्ख घर सांभाळते. गावी गेल्यावर सगळे तिला विचारतात. ती सगळ्यांमध्ये लगेच मिक्सअप होते. तेच मला आवडतं. तिचा स्वभाव प्रेमळ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या