मधुचंद्र : ‘कल्लाकार’ जोडीदार

92

सचिन देशपांडे–पियुषा बिन्दुर यांची बालीची रोमॅन्टिक सफर… हृदयात जपून ठेवलेली

मधुचंद्र म्हणजे – एकमेकांमधील ऑकवर्डनेस घालवण्यासाठी आणि मनाने एकत्र येण्यासाठी घालवलेला वेळ म्हणजे माझ्यासाठी मधुचंद्र.

फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? – फिरायला आम्ही बालीला गेलो होतो. त्याचं सगळं नियोजन मी केलं होतं. अर्थात ते तिला सरप्राईज नव्हतं तिला माहित होतं बालीला जाणार ते. आम्ही दोघंही देशाच्याबाहेर कधी गेलोच नाही, त्यामुळे दोघांचीही इच्छा होती की त्या निमित्ताने देशाच्या बाहेर जावं. माझ्या मित्राची टूरिझम कंपनी आहे त्यातून मग गेलो होतो.

आवडते ठिकाण? – तिथे मला तनाह लॉट मंदिर खूप भावले. ते समुद्रात मंदिर आहे आणि समुद्रातल्या खडकातूनच तयार केलेले आहे. अप्रतिम वास्तू आहे आणि तो दगडही एवढा मोठा आहे त्याच्यातून सुंदर प्रकारे मंदिर साकारले आहे. तसेच बरेचसे समुद्रकिनारे आहेत. तिकडंच गोवा, कोकण म्हणायला हरकत नाही. बऱयाच मोठय़ा प्रमाणात समुद्रकिनारे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं आहेत. तिथलं निसर्ग सौंदर्य फारच अप्रतिम आहे. त्यांचा पर्यटन हाच

मधुचंद्रासाठी शॉपिंग बाली स्पासाठी प्रसिद्ध आहे. मी बरेचसे स्पा, बॉडी प्रोडक्ट्स, साबण, फेसवॉश एक्झॉटिक फ्लेव्हर्सचं बरचंस शॉपिंग केलं. परफ्युम तिथले अप्रतिम असतात. कॉफी पण प्रसिद्ध आहे.

काही खास क्षण – बालीत तनाह लॉट मंदिरासारखें आणखी एक मंदिर आहे. ते समुद्रसपाटीपासून प्रचंड उंचावर बांधलेलं मंदिर आहे. मंदिराच्या आजुबाजूचा परिसर आम्ही फिरत असताना एके ठिकाणी बायकोने माझा फोटो काढला. काही वेळाने फोटो बघत होतो. एका सोलो फोटोत माझ्या बरोबर मागे विक्रम गोखले उभे होते. आम्ही पटकन तिथे जाऊन पाहिलेही पण आम्हाला नंतर ते दिसलेच नाही. खरंतर माझी-त्यांची वैयक्तिक ओळख नाही. पण त्यावेळी दोघांना वाटले अरे यार… किमान त्यांना भेटता तरी आले असते.

मधुचंद्र हवाच की… – हो हवाच. कारण आज बऱयाचशा कपलचं लव्ह मॅरिज असतं. पण अजूनही आपल्याकडे अरेंज मॅरेजचा ट्रेण्ड आहे. त्या चार दिवसांमध्ये पुढच्या अनेक वर्षांचा पाया तिकडे रचला जातो. तेव्हा तिथे तुम्ही एकमेकांसोबत असता ते अत्यंत खरे असता.

किती दिवस द्यावेत… – त्याच्यासाठी आपण असे दिवस नाही ठरवू शकत. एकमेकांना ओळखणं हे कायम चालू असतं मी या मताचा आहे. तुम्ही कितीही वर्ष एकमेकांसोबत घालवली तरी शंभर टक्के कोणाला ओळखू शकत नाही. आपण माणूस आहोत आणि माणसाचा स्वभाव सतत बदलत असतो त्यामुळे आपण असे नाही सांगू शकतं.

तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – लग्नाच्याआधी काविळ झाल्यामुळे तिथलं नॉनव्हेज मला खाता आलं नाही. तिथली एक्झॉटिक फळं, कॉफी मला फार आवडली होती.

अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसीजम – दोन्ही. रोमॅन्टिसिजम अनोळखी ठिकाणीही सापडतो. बायकोसोबत अऩोळखी ठिकाणी गेलो आणि ते ठिकाण माहित नसेल तर ते एक्प्लोअर करायला मिळतं. त्याचबरोबर आपली बायको काय वागू शकते याचाही अनुभव येतो.

एकमेकांसाठी घेतलेली भेटवस्तू – आमचं लग्न आणि तिचा वाढदिवस एकाच महिन्यात असतो. माझ्या मित्राने सांगितलं होतं की हनिमूनला बायकोला काहीतरी गिफ्ट देतात. त्यामुळे मी तिला स्वॉरोस्कीचा सेटच घेतला होता. तो मी तिला पार्ट-पार्टमध्ये गिफ्ट केला आणि तिने मला प्रचंड प्रेम दिलं.

मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – ती खूप आता खुलली आहे. फार कमी वेळात सगळ्यांना आपलंसं केलं. तिला मी कायम म्हणायचो की माझे आई-बाबा विरुद्ध तू अशी वेळ जेव्हा असेल तेव्हा माझ्यासाठी फार कठिण असेल. आता बऱयाचदा असे होते की आई-बाबा, ती एकत्र असतात आdिण मी एका बाजूला पडतो. आमच्याकडे तो सासू-सून वाद देवाच्या कृपेने नाही आहे. हा तिच्या स्वभावातला गुण आहे की तिने सगळ्यांना आपलेसे केले आहे. ती प्रचंड हुशार आहे, ती घरातल्या घरात काहीवेळात एखादं गिफ्ट बनवते. तसेच ती फार लाईव्हली आणि मस्तीखोर आहे. तिला स्वप्नात रमायला आवडतं. ती सतत घरातल्या घरात काहीतरी छान कलाकृती बनवत असते.

आपली प्रतिक्रिया द्या