मेलबर्न मछली… सोनाली खरे- बिजय आनंद

789

मधुचंद्र म्हणजे – तुम्ही जे आयुष्य जगता त्या आयुष्याची सुरुवात तुम्ही एका छान मेमरीने करावी. जिथे तुम्ही फक्त तुमच्या जोडीदारासोबत आहात आणि पुढच्या जीवनाचा ग्राफ तिथे सेट करताय, एकमेकांना ओळखून, एकमेकांचे गुण-दोष लक्षात घेऊन. तो मधुचंद्र.
फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? – फिरायला आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. माझा नवरा प्रचंड ट्रॅव्हलर आहे. त्याला पहिल्यापासून प्रवास करायची आवड आहे. त्यात तो एकदम प्रोफेशनल आहे. कुठे जायचे, काय करायचे, कुठचे हॉटेल चांगले आहे, त्याचे रिह्यू कसे आहेत हे सगळं त्याने केले होते आणि मी डोळे मिटून त्याच्यासोबत गेले होते.
तिथे आवडलेले ठिकाण? – ऑस्ट्रेलियात मला मेलबर्न खूप आवडले होते. ते मला सांस्कृतिक वाटले. मेलबर्न पण शहरी आहे, पण तिथे कल्चरल जास्त होते. कला, नाटक या गोष्टींना महत्त्व आहे. पुणं जसं आहे सांस्कृतिक तसे मेलबर्न आहे. ते मी एन्जॉय केले. तिथे मिस ‘सायगॉन प्ले’ पाहिला होता. तो खूप आवडला होता.
ठिकाणाचे वर्णन – ऑस्ट्रेलिया म्हटलं की, आपल्याला सिडनी आठवतं आणि सिडनीचे ऑपेरा हाऊस. मी असं म्हणेन, आम्ही जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तेव्हा ते पूर्णपणे कलात्मकपणे आम्हाला अनुभवता आले त्यामुळे ऑस्ट्रेलियाची ओळख एक कलात्मकतेबरोबर मॉडर्न शहर अशी मला झाली. जिथे ऑपेरा, प्लेज, मेलबर्नसारख्या शहरांमध्ये तुम्ही बघता त्याच वेळी. जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक असलेली ग्रेट बॅरियर रीफ, त्याच्यामध्ये स्नॉर्कलिंग, स्कुबा डायविंग करण्याचा भन्नाट अनुभव. असं कम्प्लिट पॅकेज होतं ऑस्ट्रेलिया.
तिथे केलेली शॉपिंग – तिथे शॉपिंग खूपच केली होती. कारण माझ्या नवऱ्यालाही माझ्याएवढंच शॉपिंगचं वेड आहे. त्यामुळे जेव्हा आमची ट्रिप झाल्यानंतर विमानतळावर गेलो तर टॅक्स रिफंड असतो तिथे ती बाई आमच्याकडे बघत होती जी अमाऊंटची थप्पी तिला आम्ही दिली. मला अजूनही आठवतं की तिने आमच्याकडे बघत ‘आर यू सीरियस? हॅव यू शॉप सो मच?’ ती आठवण आहे. प्रचंड शॉपिंग केली होती आणि खूप सामान होते. त्यामुळे आम्ही रेडी होतो की बॅगा उघडायला सांगितल्या तर बॅगा उघडून एक एक गोष्ट दाखवावी लागेल.
काही खास क्षण – तिथे पाहिलेले नाटक, सिडनीचे ऑपेरा हाऊसमध्ये पाहिलेला ऑपेरा आणि याशिवाय तिथे जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक असलेली ‘ग्रेट बॅरियर रीफ’ होती. तो सगळ्यात आठवणीतला क्षण आहे कारण तिथे मी पहिल्यांदा स्नॉर्कलिंग केली होती. खूप खोल समुद्रात जाऊन केली होती. आम्हाला तासभर खोल समुद्रात जाऊन तिकडे गेल्यावर आम्हाला सगळ्या रीफ पाहायला मिळाल्या होत्या. त्याच्यामध्ये वेगवेगळे मासे पाहायला मिळाले होते. पर्यटकांसाठी आता ते बंद केले आहे. त्यामुळे मी खूप नशीबवान समजेन की मला ते पाहायला मिळालं. ते बघता आलं. ती खास गोष्ट आहे.
मधुचंद्र हवाच की… – हवा, पण असं नाही की, तो कुठल्या एक्झॉटिक ठिकाणीच असायला हवा किंवा परदेशातच असायला हवा. ठिकाण मॅटर करत नाही. तुमच्या जोडीदारासोबत मिळालेला वेळ, एकमेकांना समजून घेण्यासाठी, भविष्याचे बेत रचण्यासाठी मधुचंद्र हवाच.
एकमेकांशी नव्याने ओळख – मला वाटतं आम्हाला कुठेही वेगळेपणा वाटला नाही. कारण आम्ही एकमेकांना भेटलो होतो तेव्हापासून आम्ही जसे एकमेकांशी मनमोकळे आणि प्रॅक्टिकल होतो. कुठेही काही लपवालपवी नव्हती. लग्नाच्या आधी वेगळे आणि नंतर वेगळे असे कुठेच वाटले नाही. लग्नाआधी आम्ही एका शोसाठी एकत्र प्रवास केला होता आणि मला असे वाटते की, जेव्हा आपण एखाद्यासोबत प्रवास करतो तेव्हा त्याला बऱयापैकी ओळखतो.
तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – सी फूड
अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसिझम – अनोळखी ठिकाण, कारण रोमान्स तर तुमचा कुठेही होऊ शकतो. त्याच्यासाठी जागा महत्त्वाची नाही. अनोळखी जागेत एक्स्प्लोअर होता येईल आणि वेगवेगळ्या अनोळखी परिस्थितीत तो रोमान्स कसा खुलतो हेही बघता येईल.
जोडीदाराची खास आठवण? – छोटय़ा छोटय़ा क्षणांचीच ती ट्रिप संस्मरणीय झाली होती. त्याने सरप्राईज म्हणून गोल्ड कोस्टला वर्साकी ब्रॅण्डचं मोठं हॉटेल आहे, तिकडे त्याने रूम बुक केली होती. ते सरप्राईज होते माझ्यासाठी. तो अजूनही मला सरप्राईज देत असतो. ते आवडतं.
मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – मी खूप नशीबवान आहे की तो माझ्या आयुष्यात आला. अतिशय प्रेमळ आहे. जे मनात आहे तेच त्याच्या तोंडावर असते. खोटेपणा अजिबात नाहीय. त्यावेळेला तो जसा होता त्याच्या जास्तपटीने तो चांगला आहे. तसेच तो निसर्गप्रेमी आहे त्याचे हेच गुण मला भावतात.

आपली प्रतिक्रिया द्या