हवाहवासा एकांत

977

सोनिया आणि अतुल. 24 वर्षांच्या सहजीवनानंतरही मधुचंद्राचा प्रत्येक क्षण लक्षात आहे.

– मधुचंद्र म्हणजे – लग्नानंतर पहिल्यांदा नवरा-बायको एकत्र बाहेर फिरायला जातात, त्याला आपल्या इथे मधुचंद्र म्हणतात. शांतपणे एकत्र बाहेर फिरायला जाणे म्हणजे माझ्यासाठी मधुचंद्र. लग्नाला चोवीस वर्षे झाली, पण मधुचंद्रानंतर मला आठवत नाही की, आम्ही दोघं एकत्र बाहेर गेलो आहोत.

– फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? – आम्ही केरळला कोडाईकॅनल, टेकडी, मुन्नार या ठिकाणी फिरायला गेलो होतो. त्या ठिकाणाचं प्लॅनिंग मी केले होते. अर्थात सोनिया कुठेही बाहेर फिरायला जायचे असेल तर ती मला सांगते, तुला हवं ते ठिकाण निवड, मग ती त्यात अजिबात डोकं घालत नाही. डोळे मिटून विश्वास ठेवते आणि त्या ठिकाणाचा आनंद घेते.

– तिथे आवडलेले ठिकाण – मुन्नार. तिथले टी गार्डन फार आवडले होते.

– ठिकाणाचे वर्णन – एकतर खूप शांतता होती. मुंबईसारख्या शहरातून तिथे गेल्यावर तुम्हाला गाडीचाही आवाज येत नाही. इतकं शांत वाटतं की, काही वेळेला कानाला दडे बसतात, झोप येत नाही, पण तिथली शांतता आणि तिथला हिरवागार निसर्ग अप्रतिम आहे.

– तिथे केलेली शॉपिंग – तिथला चहा आणि मसाले घेऊन आलो होतो.

– काही खास क्षण – आम्ही कोडाईकॅनलला लेकमध्ये हॉटेल आहे तिथे राहत होतो. आजूबाजूला फक्त पाणी होतं. त्या वेळेला मला खूप सर्दी झाली होती आणि मी रात्री खूप घोरत होतो. खरं तर सोनियाला झोपेचा इश्यू नाही. ती कुठेही बसल्या जागी झोपू शकते, पण त्या दिवशी तिला इतकी भीती वाटतं होती, तिने खिडकी उघडून पाहिली तर फक्त पाणी दिसत होतं. एक-दोनदा तर माझ्या घोरण्याच्या आवाजाने बाजूला वाघ आला की काय या भीतीने उठली. मी इतका घोरत होतो की, रात्रभर ती झोपली नाही. मुळात तिला झोप लागत नाही यावर माझा विश्वासच नाही. जनरली बाजूला ढोल वाजले तरी ती गाढ झोपते. त्या वेळेला काय माहीत, मी पण काय झोपेत एवढा घोरत होतो. मला आठवत नाही. ती रात्रभर झोपली नाही. तो क्षण माझ्या कायम लक्षात राहिला.

– मधुचंद्र हवाच की… – लग्नाच्या धबडग्यात ते जोडपं इतकं थकलेलं असतं की, दहा दिवस त्या जोडप्याने आराम करावा आणि नंतर मधुचंद्रासाठी जावे असं मला वाटतं. मधुचंद्र कधीही करता येतो. त्यासाठी लग्नानंतर लगेच गेले पाहिजे असे काही नाही.

– एकमेकांशी नव्याने ओळख ः तुम्हाला नक्कीच वेगळ्या माणसासोबत राहिल्यासारखं वाटतं. जेव्हा चोवीस तास तुमच्या सवयी एकमेकांना कळायला लागतात आणि जेव्हा तुम्ही कार्ंटग करत असता तेव्हा तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी समोरच्याला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. ते दोन्ही बाजूने असते. त्यामुळे जेव्हा एकत्र राहतो तेव्हा भ्रमनिरास होऊ शकतो. सोनियाला मी इतका घोरतो याचा अंदाज नव्हता किंवा आमचं यावर बोलणंही कधी झालं नव्हतं. त्यामुळे एकत्र राहिल्यावर ज्या पद्धतीने मी घोरलो त्या पद्धतीने एखादी मुलगी पळून गेली असती. असं होऊ शकतं.

– एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत? – मला असं वाटत नाही. मी आणि सोनिया एकमेकांना नावाने ओळखत होतो, खूप वर्षे. त्यानंतर आम्ही खूप वर्षांनी एकत्र काम केले, पण एकत्र काम केल्यानंतर आठव्या की दहाव्या दिवशी मला असं वाटलं की, होय, मी हिच्याशी लग्न करायला हवं. तिलाही माझ्याशीच लग्न करायला हवं असं वाटलं आणि आम्ही एकमेकांशी बोललो ते खोटं नव्हतं. ते जर खोटं असतं तर आमचं लग्न टिकलं नसतं. आम्ही एकमेकांना जे आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न केला.

– तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – साऊथ इंडियन सगळेच पदार्थ आवडले. मी इडली-डोसे रोज खाऊ शकतो. तिथलं नॉनव्हेजही आवडलं होतं.

– अनोळखी ठिकाणी रोमॅण्टिक व्हायला आवडतं का?- मला वाटतं अनोळखी ठिकाणीच रोमॅण्टिक होऊ शकतो. ओsळखीच्या ठिकाणी महाराष्ट्रात कुठे रोमॅण्टिक होण्याचा प्रश्नच येत नाही. कुठेही उभा राहिलो तरी लोकं ओळखतात. त्यात आता हिंदी मालिका, सिनेमा करत असल्याने देशभर ओळखतात. तरीही कधीतरी गंमत वाटते, जेव्हा दोघंच एकत्र असतो.

– मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – माझ्या डोक्यात जी बायकोची कॉन्सेप्ट होती अगदी तशीच सोनिया आहे. आमच्यात मतभेद झाले नाहीत असे नाही. प्रत्येकाच्या संसारात चढ-उतार असतात अगदी तसेच प्रसंग आले, पण मला असं कधीच वाटणार नाही की, हिच्याशी लग्न करून चूक केली, मला हिच्यापेक्षा चांगली बायको भेटली असती असे कधीही वाटले नाही. माझा स्वभाव आणि मला समजून घेणारी दुसरी मुलगी मिळाली असती असे मला वाटत नाही. सोनिया तत्त्वनिष्ठ, शिस्तशीर आहे. काम आलं की, झोकून काम करते आणि स्वतःच्या प्रिन्सिपलशी तडजोड करत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या