बाबाच्या ‘हनी’चा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सोमवारी हनीप्रीतने पोलीस यंत्रणांच्या नाकावर टिच्चून दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. हनीप्रीतने दाखल केलेला अटकपूर्व जामीनासाठीचा अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

हनी आली…पळाली पण पोलिसांना नाही दिसली

हनीप्रीतचा वकील प्रदीप कुमार आर्य यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ३ आठवड्यांसाठी अटकपूर्व जामीनाची मागणी केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने हनीप्रीतच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी करताना, हा अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात कसा दाखल केला? असा प्रश्न केला. याला उत्तर देताना वकिलाने, दिल्लीमध्ये हनीप्रीतचे घर आहे आणि तिला अटक होण्याची भिती वाटत असल्याचे सांगितले. मात्र न्यायालयाने हनीप्रीतने सरेंडर करावे असे सांगितले आहे. त्यानंतर न्यायालयाने हनीप्रीतचा अर्ज फेटाळला आहे.

हनीप्रीतने घेतला बदला? बाबा राम रहीमला उघडं पाडलं?

मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी वकिलाला हनीप्रीत सध्या कुठे आहे? असा प्रश्न विचारला. यावर वकिलाने हनीप्रीतच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. पंजाब आणि हरयाणामधील ड्रग्ज माफियांकडून हनीप्रीतच्या जीवाला धोका आहे असे वकिलाने सांगितले.

याआधी हरयाणा पोलिसांनी हनीप्रीतविरोधात अटक वॉरंटसह दिल्लीमधील ग्रेटर कैलाश परिसरामधील घरावर छापा टाकला. मात्र हनीप्रीतने याआधीच पोबारा केल्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. छापेमारीबाबत पोलिसांना सांगितले की, हनीप्रीतने दाखल केलेल्या जामीन अर्जामध्ये ग्रेटर कैलाश परिसरात असणाऱ्या घराचा पत्ता देण्यात आला होता. पोलिसांनी ज्या ठिकाणी छापा टाकला ती डेराची संपत्ती आहे आणि राजीव मल्होत्रा नावाच्या माणसाकडे त्याच्या देखरेखीची जबाबदारी आहे. राम रहिम दिल्लीमध्ये आल्यानंतर याच ठिकाणी थांबत होता, असे पोलिसांनी सांगितले.