हनीप्रीत डोकेदुखीने बेजार, बाबाची भेट घेण्यासाठी आतूर

11

सामना ऑनलाईन । अंबाला

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमची कथित मुलगी हनीप्रीत आजारी असून तिला निद्रानाश व डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. नीट जेवत नसल्याने तिचे वजनही कमी झाले आहे. अशक्तपणा आल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे तेजही गायब झाले असून सुंदर दिसणारी हनीप्रीत आता थकलेली दिसू लागली आहे.

राम रहीमला कंबरदुखीचा त्रास होत असल्याचे कळाल्यापासून हनीप्रीत अस्वस्थ आहे. कसेही करून बाबापर्यंत पोहोचण्याचा ती प्रयत्न करत आहे. बाबाबरोबर तिला एकत्र तुरुंगात राहायचे आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी तिने एक बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रही बनवले होते. ज्यात हनीप्रीतने ती बाबाची अटेंडंट असून त्यांच्या आजारांबद्दल तिला माहिती आहे. यामुळे तिला बाबाबरोबर तुरुंगात एकत्र राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. पण तुरुंग प्रशासनाने डॉक्टरांना बोलवून बाबाची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करुन घेतली. डॉक्टरांनी बाबा फीट असल्याचे सांगितल्यानंतर बाबाबरोबर राहण्याचे हनीप्रीतचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

बाबाला भेटण्याची आशाच धूसर झाल्याने हनीप्रीत निराश झाली आहे. ती रात्र-रात्र जागून काढते. स्वत:शीच पुटपुटते. यामुळे तिचे डोके सतत दुखत असते. याचा परिणाम आता तिच्या शरीरावरही दिसू लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या