हाँगकाँग ओपन बॅडमिंटन – सायना पराभूत, सिंधूची आगेकूच

331

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालची पाठ अपयश काही सोडायला तयार नाही. हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी आठव्या मानांकित सायनाला महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत चीनच्या काई यान यानकडून 21-23, 22-20 असा सरळ पराभव पत्करावा लागला. सायनाचा हा गेल्या पाच स्पर्धांतील सलामीचा चौथा पराभव आहे. काईने याआधी झालेल्या चायना ओपन स्पर्धेतही सायनाला पराभूत केले होते. सायना पराभूत होत असताना हिंदुस्थानचे दुसरे मोठे आशास्थान मानल्या जाणाऱ्या विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने मात्र सलामीला किम गा इयुनला 21-15, 21-16 असे पराभूत करून एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले. पुरुष एकेरीत सौरभ वर्मालाही पराभवाला सामोरे जावे लागले.

हाँगकाँग ओपनच्या पुरुष एकेरीत हिंदुस्थानच्या 16 व्या मानांकित सौरभ वर्मा यालाही पहिल्याच फेरीत  चिनी तैपेईच्या  वान्ग जू वेई याने  54 मिनिटांच्या झुंजीत 21-11, 13-21,21-8  असे पराभूत केले. समीर लागोपाठ तिसऱ्या स्पर्धेत सलामीला गारद झाला आहे. आता समीर आणि सायनाला पुढच्या आठवडय़ात सुरू होणाऱ्या कोरिया ओपनची प्रतीक्षा आहे. समीरने दुसरा गेम जिंकूनही त्याला या लढतीत पुनरागमन करता आले नाही. तिसऱ्या गेममध्ये सौरभचा खेळ त्याच्या लौकिकास साजेसा होऊ शकला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या