‘झी 5’वर नव्या कार्यक्रमांचा धडाका

जगभरातील प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या गरजा व आवडीनिवडी पूर्ण करत ‘झी5’ने पाच गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने मुंबईत  ‘हुक्ड टू 5’ या तारांकित सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली. ‘झी5’ वर्षभरात नवीन शोचा धडाका लावणार असल्याचे या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले. हिंदी, तामीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बांगला, पंजाबी आणि मराठी या भाषांमधील 111 पेक्षा जास्त कार्यक्रमांचा यामध्ये समावेश असेल. ‘झी5’ने अनेक मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत करार केला असल्यामुळे प्रेक्षकांना सलमान खान, पंकज त्रिपाठी, हुमा कुरेशी, सोनाली बेंद्रे, आर्या, विजय सेतुपती, नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे अशा अनेक दिग्गजांच्या कलाकृतींचा आनंद घेता येईल.