
भाज्यांच्या दरांत सातत्याने चढ-उतार होतच असतात. या दरांत काही रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, हेच आपल्याला माहित असते, मात्र एका भाजीच्या 1 किलो दराची किंमत वाचली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही. विशेष म्हणजे ही खरेदी करणे सामान्य माणसासाठी सोपे नाही; काही तिची किंमत खूपच जास्त आहे.
उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरेशिया येथे या भाजीचे पिक घेतले जाते. उष्ण कटिबंधीय हवामानात उगवणाऱ्या या भाजीची लागवड हिंदुस्थानात करणे शक्य होत नाही, त्यामुळे येथील शेतकरी या भाजीपाल्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. अनेक औषधी गुणांनी समृद्ध असलेली ही भाजी ताणतणाव, निद्रानाश, अस्वस्थता, तणाव, डेफिसिट-हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी), चिडचिड अशा विविध समस्यांवर गुणकारी आहे. ‘हॉप शूट्स’ असे या भाजीचे नाव आहे.
‘हॉप शूट्स’च्या रोपांना शंकूच्या आकाराप्रमाणे फुले येतात. या फुलांमध्ये ‘स्ट्रोबाईल’ हा घटक असतो. या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माचा वापर बियरमधील गोडवा वाढवण्यासाठी केला जातो. याशिवाय अल्कोहोलयुक्त पेये बनवण्यासाठीही या फुलांचा वापर केला जातो. अनेक आजारांना बरे करणारी ही भाजी आहे. ही भाजी कर्करोगावरी लढण्यासही सक्षम आहे.
द गार्डियनमधील वृत्तानुसार, या भाजीच्या रोपांचे वैशिष्ट्य म्हणजे या भाजीची रोपे एका रांगेत वाढत नाहीत. त्यांची कापणी करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. हॉप शूट्सला येणारी शंकूच्या आकाराची फळे कच्ची खाल्ली जातात, मात्र या फळांची चव कडू असते. त्यापासून लोणचे बनवले जाते. या भाजीची एक किलोची किंमत 85 हजार ते 1 लाख रुपये प्रति किलो दराने विकली जाते. एवढी महाग भाजी ब्रिटनसह अनेक देशांमध्ये कचरा म्हणून गणली जाते.
हॉप शूट्स भाजी महाग का विकली जाते?
या वनस्पतीपासून भाजी तयार होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो. हॉप शूटला येणारी नाजून, लहान हिरव्या रंगाची फुले काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. या भाजीच्या रोपांची काळजी घेणे हे खूप कष्टाचे काम असते. यामुळेच या भाजीची किंमत खूप जास्त आहे.