फॅशन + भविष्य

>> मानसी इनामदार

मेष – हसता हसता
अडचणी, समस्यांवर हसत हसत मात द्याल. हसणे, आनंदी राहणे हा अडचणीत तणावमुक्त राहण्याचा नामी मार्ग आहे. धनप्राप्तीसाठी सुरक्षित जागी पैसे गुंतवा. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास फलदायी ठरेल. सोनेरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सोन्याचे आभूषण, रेशमी वस्त्र

वृषभ – चिवट आशावाद
निकटच्या सहकाऱयांबरोबर वादविवाद टाळा. सतत आशावादी राहा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास, लवचिकता वाढेल. भीती, चिंता यापासून लांब राहा. तुमच्या आनंदी स्वभावाने घरातील वातावरण प्रसन्न आणि उत्फुल्ल राहील. पांढरा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – मोगऱयाची फुले, सुती वस्त्र

मिथुन – मैत्र महत्त्वाचे
जुनी मैत्री आणि मैत्र जपा. मग ते माणसासोबत असो वा प्राण्यांसोबत. त्यामुळे तुमची मानसिकता सकारात्मक होईल. कलात्मक बुद्धिमत्तेतून फायदा होईल. कामाच्या ठिकाणी ती वापरा. जोडीदारासोबत एकवाक्यता होईल. लाल रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – गुलाब पुष्प, पुरुषांनी लाल पितांबर

कर्क – सौख्य, समाधान
ज्येष्ठांनी त्यांच्या ऊर्जेचा वापर स्वतःसाठी आणि जोडीदारासाठी करावा. त्यातून समाधान लाभेल. किमती वस्तूंची खरेदी होईल. घरात छोटेसे होमहवन करा. हवनाच्या धुरामुळे वातावरणात सकारात्मकता वाढेल. वाहन सौख्य लाभेल. पिवळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – डिझायनर घडय़ाळ, सुगंध

सिंह – कुटुंबीयांसमवेत

जोडीदाराच्या कामात ढवळाढवळ करू नका. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आवडत्या कामातून धनलाभ होईल. सहलीचा बेत आखाल. पुटुंबियांसमवेत आनंद अनुभवाल. जलपूजन करा. त्यामुळे घरात शांतता राहील. निळा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – सुती साडी, चांदीचे दागिने

कन्या – वाचन वाढवा
घरात अनुकूल वातावरण असेल. श्रीगणेशाची उपासना करा. लाल रंग जवळ बाळगा. चतुर्थीला बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवा. सारी विघ्ने दूर होतील. वाचन वाढवा. मुळातच तुम्ही व्यासंगी आहात. त्याचा कामाच्या ठिकाणी उपयोग होईल.
शुभ परिधान – रुद्राक्ष, सुगंधी फूल

तूळ – नव्या गोष्टी
तुमच्या उत्तम संकल्पनेतून बऱयाच नव्या गोष्टी साकाराल. पुटुंबाची काळजी घ्या. घरातील सदस्यांच्या समस्या समजून घ्या. गृहिणींनी स्वतःसाठी वेळ काढावा. चांगल्या कलापृतीचा आस्वाद घ्याल. हातूनही उत्तमोत्तम कलापृती घडतील. काळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सॅटीनचे वस्त्र, मोती

वृश्चिक – मित्रमैत्रिणी
नव्या ओळखी होतील. यातून मित्र परिवार विस्तारेल. पण अवास्तव खर्चास आळा घाला. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी होईल. त्यातून आर्थिक बचतही होईल. नवीन व्यक्तींवर एकदम विश्वास टापू नका. तांब्याच्या भांडय़ातून पाणी प्या. तांब्याचा रंग फलदायी.
शुभ परिधान – तांब्याचे वळे, शाल

धनु – मदत करा
आठवडय़ाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल. त्यामुळे आर्थिक लाभ होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. त्यामुळे मनास शांतता लाभेल. इष्टदेवतेची उपासना करा. निळा रंग शुभ ठरेल. समाजकार्यात भाग घ्याल. इतरांना मदत करा. पुण्यसंचय महत्त्वाचा.
शुभ परिधान – पारंपारिक वस्त्रs, अंगठी

मकर – संगीत साधना
आयुष्य खूप सुंदर आहे याचा प्रत्यय येईल. निसर्गाच्या सान्निध्यात राहा. संगीत क्षेत्रातील व्यक्ती उत्तम कामगिरी करतील. पुरस्कारही मिळेल. पण संगीत साधनेत खंड नको. नोकरदार व्यक्तींना बढती मिळेल. पगारही वाढेल. कोकोचा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – ब्रॅण्डेड कपडे, हातात कडे

कुंभ – भरीव लिखाण
महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा कराल. पण त्यांच्यावर विसंबू नका. कुटुंबीयांसमवेत वेळ घालवाल. पण कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष करू नका. कामात नियमितता ठेवा. संतुलित आहार घ्या. हातून भरीव लिखाण होईल. पण त्यावर मेहनत घ्या. ऑफ व्हाईट रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – मोती, चंदन

मीन – स्वतःवर विश्वास
चॉकलेट, आले आणि गुलाब यांच्या मिश्रणाची एक वेगळीच अनुभूती तुम्हाला येणार आहे. तुमचा सदाचार सोडू नका. तेच तुमचे वैशिष्टय़ आहे. आनंदी राहा. देवीची आणि मारुतीची उपासना करा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही सर्जनशील आहात. जांभळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – अष्टगंध, सुती वस्त्र

आपली प्रतिक्रिया द्या