साप्ताहिक राशिभविष्य- 7 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2019

7179

>> मानसी इनामदार

मेष – आर्थिक व्यवहार
मोठय़ा आर्थिक उलाढाली या आठवडयात होतील. तुमचा फायदा होईल पण अपरिचितांवर विश्वास ठेवू नका. लोखंडाच्या कढईत भोजन शिजवा. महत्वाचे व्यवहार करताना निळा रंग जवळ बाळगा. उगाचच अस्वस्थता जाणवेल.
शुभ परिधान – फॅन्सी शर्ट, पैंजण

वृषभ – योग्य दिशा
उद्योग व्यवसायात उत्तम प्रगती आहे. विश्वासू सहकाऱयांशी सल्लामसलत करा. त्यातून कामाला योग्य दिशा मिळेल. घरात मानसिक आणि कौटुंबिक स्थैर्य राहील. मन प्रसन्न राहील. पिवळे वस्त्र जवळ ठेवा. पायांची काळजी घ्या.
शुभ परिधान – ब्रॅण्डेड पादत्राणे, पर्स

मिथुन – यशस्वी व्हाल
महत्वाच्या कामाचे नियोजन करा. त्यामुळे मोठी झेप घेता येईल. गरम पदार्थांचे सेवन करा. जवळच्या व्यक्तीचा विरह सहन करावा लागेल. पण चिंता करू नका. कामे यशस्वी होतील. लाल रंग जवळ ठेवा. नियमित गणेश पूजन करा.
शुभ परिधान – शालू, काचेच्या बांगड्या

कर्क – संधीतून फायदा
कार्यालयात सहकारी मदत करतील. त्यामुळे काम सोपे होईल. रात्रीची जागरणे टाळा. नव्या कामाची संधी उपलब्ध होईल. यात खूप फायदा होईल. गुंतवणूक कराल. भगवा रंग जवळ ठेवा. विठ्ठलाचे पूजन करा.
शुभ परिधान – घडयाळ, नेलपेण्ट.

सिंह – वैशिष्टय़पूर्ण आठवडा
नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा अत्यंत नामी ठरणार आहे. त्वचेची काळजी घ्या. बदामाच्या तेलाचे मर्दन सर्वांगाला करा. मुलांच्या अभ्यासावर जातीने लक्ष द्या. जोडीदाराची साथ लाभेल. मातीचा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – रेशमी साडी, वहाण

कन्या -जबाबदारी निभवाल
मुलांशी भावनिक बंध अजूनच दृढ होतील. त्यामुळे आनंदी राहाल. चालण्यात सातत्य ठेवा. कामाच्या ठिकाणी मोठया जबाबदाऱया सोपविण्यात येतील. त्या यशस्वीपणे पार पाडाल. सोनेरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सुगंध, गजरा

तूळ – सुट्टीवर जा
नव्या योजनांचा पाठपुरावा कराल. उद्योगधंद्यात त्याचा उपयोग होईल. दीर्घकाळानंतर सुट्टी घेण्याची संधी मिळेल. कुटुंबियांसमवेत वेळ मजेत घालवाल. बाहेरगावी जाण्याचा योग आहे. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – मोत्याचे दागिने, बांगडी

वृश्चिक -नवी नोकरी
तुमचे भाग्योदय होणार आहे. अनपेक्षित अर्थप्राप्ती होईल. जुनी येणी वसूल होतील. पण घरात खर्चही तितकेच निघतील. शिवाची आराधना करा पांढरा रंग जवळ बाळगा. एखादी नवी संधी दार ठोठावेल. नव्या नोकरीचे योग आहेत.
शुभ परिधान – रुद्राक्ष, चांदीचा अलंकार

धनु – मदतीची देवाण घेवाण
सहकाऱ्यांची साथ लाभेल. तुम्हीही त्यांना मदत कराल. पण मदत माणूस पारखून करावी. हातून सर्जनशील घडेल. वादविवाद टाळा. नखांचे विकार होण्याची शक्यता. रासायनिक पदार्थांपासून लांब राहा. तांब्याचा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – तांब्याचे वळे, रुमाल

नवीन घडेल
मकर – अत्यंत लाभदायी आठवडा. घरातील लोकांसाठी काहीतरी भरिव करून ठेवलं. त्याचा उपयोग त्यांना दीर्घकाळापर्यंत होईल. हातून नवनिर्मिती होईल. निळा रंग जवळ बाळगा. स्वामी समर्थांची आराधना करा.
शुभ परिधान – ठेवणीतील कपडे, स्फटिक

कुंभ – प्रेमवर्षाव होईल
वरिष्ठांची विशेष मर्जी लाभेल. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. अधिकारपदात वाढ होईल. नव्या जबाबदाऱया घ्याल. जोडीदाराच्या प्रेमवर्षावात नाहून निघाल. त्यामुळे मन आनंदी होईल. स्वास्थ्य उत्तम राहील. अबोली रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – कुंकू, अष्टगंध

मीन – मेहनतीचा आठवडा
स्थावर मालमत्तेचा अनपेक्षित लाभ होईल. आर्थिक नियोजन कराल. खेळाडूंसाठी आठवडा खूप मेहनतीचा. त्याचे फळ मधुर मिळेल. व्यायामात सातत्य ठेवा. देवीची उपासना करा. लाल रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – खेळाचे कपडे, धावण्याचे शूज

आपली प्रतिक्रिया द्या