भविष्य…शुभ नारळीपौर्णिमा

मानसी इनामदार

समस्या पती-पत्नींत सतत वाद होत असतील, गैरसमज दूर होत नसतील तर…

तोडगा – घरात विठोबा-रखुमाईची मूर्ती ठेवावी. दोघांनी मनोभावे त्यांची पूजा करावी.

 मेष – यशस्वी व्हाल

खूप महत्त्वाच्या व्यक्तीशी या आठवडय़ात भेट होणार आहे. या भेटीमुळे आर्थिक गणिते बदलण्यास मदत होईल. तुमच्यातील मानसिक ऊर्जेचा तुम्हाला प्रत्यय येईल. आणि प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. पिवळा रंग जवळ ठेवा. उगवत्या सूर्याचे दर्शन घ्या. शुभ आहार…सूर्यफुलाचे तेल, पोळी

वृषभ – चांगली बातमी

दूर देशातून खूप चांगली बातमी येणार आहे. पैसा आणि वेळ दोन्ही हातचे जाऊ देऊ नका. जवळची व्यक्ती दुखावली जाणार नाही, याची काळजी घ्या. शांत डोक्याने निर्णय घ्या. व्यवसाय उद्योगात कठोर मेहनत घ्या. उत्तम यश मिळेल. भगवा रंग जवळ बाळगा…शुभ आहार…केशरी दूध, श्रीखंड

मिथुन – अभिनंदनाचा वर्षाव

तुमच्या अतिशय चांगल्या कामामुळे कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होईल. घरच्यांचाही छान पाठिंबा राहील. त्यामुळे ऊर्जा आणि प्रसन्नता दोन्ही लाभतील. पण अगदी घरातील सदस्यांच्याही अवास्तव अपेक्षांच्या पाठी लागू नका. हिरवा रंग महत्त्वाचा….शुभ आहार…अळूची पाने, सुरण

कर्क – झकास आठवडा 

आपली इच्छा, आकांक्षा, स्वप्ने या आठवडय़ात आकारास येणार आहेत. खेळाडूंसाठी झकास आठवडा. स्पर्धा जिंकाल. आर्थिक व्यवहार जपून करा. आवडत्या व्यक्तीवर आंधळे प्रेम करू नका. आपले म्हणणे नीट मांडा. कामानिमित्त प्रवास घडेल. लाल रंग जवळ बाळगा…शुभ आहार…सात्त्विक आहार, खिचडी

सिंह – महत्त्वाच्या गाठीभेटी

केलेल्या कामाला दाद मिळेल. एखादा व्यावसायिक प्रकल्प हाती घ्याल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. खर्चाला आवर घाला. हातून लेखनकार्य घडेल. साहित्यिकांसाठी यशाचा आठवडा. फुकाच्या गप्पांपासून दूर राहा. निसर्गाच्या सान्निध्यात राहा. निळा रंग महत्त्वाचा…शुभ आहार…काकडी, बीट, सलाड

कन्या – मनोधैर्य वाढेल

मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. उगाच वादविवाद टाळा. महत्त्वाचे आर्थिक करार होतील. त्यात फायदा होईल. काळा रंग जवळ बाळगा. शिवाची उपासना करा. त्यामुळे मनोधैर्य वाढेल. निसर्गरम्य ठिकाणी जाणे होईल. त्यामुळे मनास प्रसन्नता लाभेल…शुभ आहार…मसाल्याचा चहा, तुळशीचा काढा

तूळ – मेहनतीचे चीज

नव्या जमिनीच्या खरेदीचे योग आहेत. त्यातील गुंतवणुकीस यश मिळेल. बारीकसारीक गोष्टींचा बाऊ करीत बसू नका. सांस्कृतिक कार्यात वाहवा होईल. आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. होतकरू कलाकारांच्या मेहनतीचे चीज होईल. अबोली रंग जवळ बाळगा….शुभ आहार…शक्तिवर्धक, सात्त्विक आहार.

वृश्चिक – मन तृप्त

आप्तस्वकियांकडून आपुलकीचा वर्षाव होईल. त्यामुळे मन तृप्त होईल. तब्येतीस जपा. अरबट चरबट खाणे टाळा. आवडीच्या कामात मन गुंतवा. त्यातूनच नवे काम हाती येईल. खर्च आणि आर्थिक उलाढाल यांची सांगड घातली जाईल. आकाशी रंग जवळ बाळगा…शुभ आहार…रंगीबेरंगी पदार्थ

धनू – नव्या संधी

आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी घ्या. धावपळ, दगदग खूप होईल. पण त्यातून दुरावलेली माणसे जवळ येतील. आर्थिक नुकसान भरून निघेल. त्यामुळे श्रमाचे चीज होईल. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. त्यांचे सोने करा. घरात सूर्यफुले ठेवा. पिवळा रंग महात्त्वाचा…शुभ आहार…गूळ खोबरे.

मकर – आनंदाचे वातावरण

घरातील लहान मुलांना प्रोत्साहित करा. जेणेकरून त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळेल. नव्या जोमाने कामाला लागाल. आर्थिक नफा होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. समुद्राची पूजा करा. निळा रंग जवळ ठेवा. वरिष्ठांच्या म्हणण्याला मान्यता द्या. तुम्ही फायद्यात राहाल…शुभ आहार….नारळ, साखर

कुंभ – आर्थिक फायदा

अपेक्षेबाहेर आर्थिक फायदा होईल. त्यामुळे खूप खूश राहाल. कुटुंबात सुखांचा वर्षाव होईल. त्यामुळे मन आभाळात तरंगेल. गुंतवणुकीचे व्यवहार सतर्कपणे हाताळाल. हसत राहाल. त्यामुळे तब्येतीत सुधारणा होईल. पण आवडते ते जवळ असणार नाही. राखाडी रंग महत्त्वाचा….शुभ आहार…आवडीचे पदार्थ

मीन – नवी मैत्री

सत्पात्री मदत करा. त्यातून पुण्यसंचय वाढेल. लोभ, मोह सोडा. कामावर लक्ष केंद्रित करा. नव्या कपडय़ांची खरेदी होईल. अवश्य करा. घरात नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहील. लाल रंग महत्त्वाचा. नव्या लोकांशी मैत्री होईल. मेहनत वाढवा. शुभ आहार…पौष्टिक, सात्त्विक पदार्थ