भविष्य – रविवार 15 ते शनिवार 21 डिसेंबर 2019

4794

ग्रहांची साथ लाभेल

मेष – मेषेच्या दशमेषात शुक्र, भाग्येषात सूर्य राश्यांतर होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ज्यांची पाळेमुळे खोलवर रुजलेली असतात त्यांच्या फांद्या छाटण्याचा प्रयत्न हा वरवरचा असतो. ग्रहांची साथ तुम्हाला आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने बहारदार कार्य होईल. क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढेलच.   शुभ दिनांक- 17, 18

व्यवसायात संधी मिळेल

वृषभ – वृषभेच्या भाग्येषात शुक्र, अष्टमेषात सूर्य राश्यांतर होत आहे. या आठवडय़ात मनोबलाच्या जोरावरच तुम्हाला वाटचाल करावयाची आहे. व्यवसायात मोठी संधी मिळेल. नोकरीत तणाव सहन करा. सामाजिक क्षेत्रात तुमचे वक्तव्य इतरांना झोंबणारे असेल. कलाक्षेत्रात तडजोड स्वीकारावी लागेल.     शुभ दिनांक-15, 16

आत्मविश्वास वाढेल

मिथुन – मिथुनेच्या अष्टमेषात शुक्र, सप्तमात सूर्य राश्यांतर होत आहे. आत्मविश्वास व उत्साह वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे स्थान अधिक मजबूत करा. प्रगतीची एकही संधी सोडू नका. नावलौकिकात भर पडणारी घटना घडेल. नोकरीत बदल करा. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात नवी दिशा मिळेल.      शुभ दिनांक- 19, 21

रागावर नियंत्रण ठेवा

कर्क – कर्केच्या सप्तमेषात शुक्र, षष्ठsषात सूर्य राश्यांतर होत आहे. तुम्ही ठरवाल तेच घडेल असे समजू नका. नाहीतर राग वाढेल. त्यामुळे होणारे कामही लांबेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होईल. मनोबल राखा. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात तुमच्या मेहनतीला कमी महत्त्व मिळेल.      शुभ दिनांक- 15, 20

निर्णयात सावधगिरी बाळगा

सिंह – सिंहेच्या षष्ठsषात शुक्र, पंचमेषात सूर्य राश्यांतर होत आहे. आठवडय़ाची सुरुवात तणावाची आहे. राग, मनस्ताप वाढवणारी घटना घडेल. व्यवसायात सुधारणा करणे फार सोपे नाही. नोकरीत उतावळेपणाने निर्णय घेऊ नयेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिलासा देणारी घटना घडेल.   शुभ दिनांक – 19, 20

जबाबदारी वाढेल

कन्या – कन्येच्या पंचमेषात शुक्र, सुखेषात सूर्य राश्यांतर होत आहे. चर्चेत, सभेत कोणतीही प्रतिक्रिया देताना विचार करा. तुमच्यावर मुद्दा उलटण्याची शक्यता आहे. व्यवसाय, नोकरीत तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. दुसऱयांच्या सांगण्यावरून तुम्ही कोणतेही मत तयार करू नका. जबाबदारी वाढेल.  शुभ दिनांक- 15, 21

द्विधा अवस्था होईल

तूळ – तुळेच्या सुखेशात शुक्र, पराक्रमात सूर्य राश्यांतर होत आहे. व्यवसाय, नोकरीत जबाबदारी पूर्ण कराल. आठवडय़ाच्या शेवटी एखादा निर्णय निश्चित करताना मनाची द्विधा अवस्था होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. गोड बोलून तुमच्या मनातील गुपित काढण्याचा प्रयत्न होईल.   शुभ दिनांक- 17, 18

शेअर्सचा अंदाज येईल

वृश्चिक – वृश्चिकेच्या पराक्रमात शुक्र, धनेषात सूर्य राश्यांतर होत आहे. साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यातील काही महिने राहिले आहेत. व्यवसाय, नोकरीत सुधारणा होईल व चांगला बदल होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे प्रस्थ वाढेल. पुरस्कार व लाभ मिळेल.       शुभ दिनांक – 19, 20

प्रगतीचा मार्ग लाभेल

धनु – धनुच्या धनेषात शुक्र, स्वराशीत सूर्य राश्यांतर होत आहे. अनेक प्रश्न सोडवण्यात यश मिळेल. नोकरीतील ताण कमी होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा नवा मार्ग शोधता येईल. दिग्गज लोकांचे सहकार्य मिळेल. स्थिरता निर्माण होईल. तुमच्या क्षेत्रात मानप्रतिष्ठा मिळेल. कडवट बोलणे टाळा.          शुभ दिनांक – 19, 20

मनोबल राखा

मकर – स्वराशीत शुक्र, मकरेच्या व्ययेषात सूर्य राश्यांतर होत आहे. साडेसाती सुरू आहे. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कायद्याच्या कक्षेत राहून काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्ही ढवळाढवळ करता असा आरोप येईल. सौम्य धोरण ठेवा. मानापमानाचा विचार न करता जनकल्याणाचे काम करा.  शुभ दिनांक – 15, 16

योजनांना गती मिळेल

कुंभ- कुंभेच्या व्ययेषात शुक्र, एकादशात सूर्य राश्यांतर होत आहे. आठवडय़ात तारेवरची कसरत करावी लागेल. धावपळ होईल. तात्पुरत्या स्वरूपाच्या अडचणी कामात येतील. सामाजिक क्षेत्रात मतभिन्नता झाली तरी वर्चस्व दिसेल. योजनेला गती मिळेल. ठरविलेले कार्य सिद्धीस जाण्याची आशा वाढेल.   शुभ दिनांक – 17, 18

खरेदी-विक्रीत लाभ होईल

मीन – मीनेच्या एकादशात शुक्र, दशमेषात सूर्य राश्यांतर होत आहे. रेंगाळत मागे पडलेले काम पूर्ण करा. व्यवसायात सुधारणा होईल, नोकरीत चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक समस्या सोडवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गुंता सोडवण्यात यश मिळेल.  जमिन, वाहन खरेदी विक्रीत फायदा होईल.  शुभ दिनांक – 20, 21

आपली प्रतिक्रिया द्या