भविष्य – रविवार १९ ते शनिवार २५ नोव्हेंबर २०१७

>> नीलिमा प्रधान

मेष – शैक्षणिक प्रगती होईल
दुसऱयांना मदत करण्यासाठी वेळ, खर्च होईल. नवी दिशा मिळेल. कमी शब्दांत तुमचे मनोगत व्यक्त करा. कुटुंबात प्रगतीकारक निर्णय घेता येईल. सर्व परिस्थितीवर मार्ग मिळेल. नाटय़-चित्रपटात ओळखी वाढतील. कलागुणांचा विकास होईल. शैक्षणिक प्रगती होईल.
शुभ दिनांक – २४, २५.

वृषभ – नोकरीच्या ठिकाणी वर्चस्व मिळेल
कौटुंबिक सुखात अडचणी येतील. नोकरीच्या ठिकाणी वर्चस्व निर्माण करता येईल. व्यवसायात चढ-उतार राहील. एकदम कुणावरही विश्वास टाकणे नुकसानकारक होऊ शकते. वरिष्ठांच्या मनातील गैरसमज दूर करता येईल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात तडजोड करावी लागेल. जीवनाचे मार्ग समजून घ्या. शुभ दिनांक – १९, २०.

मिथुन – मैत्री वाढेल
नोकरीत अस्थिरता वाटेल. चूक टाळता येईल. रागावर नियंत्रण ठेवा. धंद्यात मोठे काम मिळेल. अडचणींवर मात करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जबाबदारी वाढेल. वरिष्ठांच्या बरोबर राहावे लागेल. मैत्री वाढली तरी दबाव राहील. नाटय़-चित्रपट क्षेत्रात कामाचे कौतुक होईल.
शुभ दिनांक -२१, २२

कर्क – प्रतिष्ठा वाढेल
क्षेत्र कोणतेही असो, परिस्थितीनुसार निर्णय घ्या. अडचणी येतील. व्यवसायात खर्च वाढण्याची शक्यता आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न निघेल. घर, जमीन खरेदीचा विचार कराल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. परिचय फायदेशीर ठरतील.
शुभ दिनांक – १९, २०

सिंह – विद्यार्थ्यांनी नम्रता ठेवावी
व्यवसायात खर्च वाढेल. सरकारी व मित्र यांची मदत मिळेल. तुमच्या विरोधात अयशस्वी मोहीम होईल. नवीन विचारांची देवाण-घेवाण विचारांना चालना देणारी ठरेल. आक्रमक पवित्रा कौतुकास्पद ठरेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. विद्यार्थीवर्गाने नम्रता ठेवावी.
शुभ दिनांक – २१, २२

कन्या – परदेशात जाण्याचा योग
कोणतेही महत्त्वाचे काम, चर्चा किंवा निर्णय याच आठवडय़ात झाला पाहिजे याकडे लक्ष द्या. व्यवसायात किरकोळ समस्या येतील. नोकरीत प्रतिष्ठा वाढेल. कला क्षेत्रात प्रसिद्धी व पैसा मिळेल. पुरस्कार मिळेल. तुमचे धोरण इतरांना विचारात टाकणारे ठरणार आहे. परदेशात जाण्याचा योग येईल.
शुभ दिनांक- १९, २०

तूळ – नोकरीत चांगला बदल घडेल
महत्त्वाच्या घटना या आठवडय़ात घडतील. प्रत्येक दिवस प्रगतीचा व उत्साहाचा राहील. व्यवसायात नव्या पद्धतीचा वापर करू शकाल. नोकरीत चांगला बदल होईल. बेकारांना नोकरी मिळेल. आप्तेष्ट, मित्र यांच्या भेटीचा आनंद मिळेल. तुमच्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यात यश मिळेल. वाहन जपून चालवा.
शुभ दिनांक- २०, २१

वृश्चिक – व्यवसायात यश मिळेल
व्यवसायात कष्टाने यश मिळेल. गोड बोलून तुमच्याकडून पैसा उकळण्याचा प्रयत्न होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्यावर खूश होतील. कोर्टासंबंधी कामे मार्गी लावता येतील. नाटय़-चित्रपट व्यवसायात गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. विद्यार्थीवर्गाने आळस करू नये. कुटुंबात सर्वांची मदत मिळेल.
शुभ दिनांक – २१, २२

धनु – नाटय़-चित्रपट क्षेत्रात नवे परिचय
व्यवसायात, राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. तुमच्यावर आरोप येईल. कामाची पद्धत बदलावी लागेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. कोर्टाच्या कामात किरकोळ अडचणी येतील. नम्रतेने वागा. नाटय़-चित्रपट क्षेत्रात नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पुढे जातील.
शुभ दिनांक – २४, २५

मकर – घर, वाहन खरेदीचा विचार करा
या आठवडय़ात महत्त्वाची व कठीण वाटणारी कामे पूर्ण करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वर्चस्व राहील. मंगळवार, बुधवार बोलण्याची, उत्तर देण्याची घाई करू नका. भेट घेण्यात व चर्चा करण्यात यश मिळेल. नोकरीत बदल करता येईल. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. नाटय़-चित्रपट व्यवसायात कल्पनेला चांगला प्रतिसाद मिळेल.
शुभ दिनांक – २४, २५

कुंभ – परदेशात नोकरीची संधी
वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात व्यापक स्वरूपाचे कार्य करता येईल. व्यवसायात किरकोळ वाद होईल. कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक राहील. नाटय़-चित्रपट क्षेत्रात प्रभाव वाढेल. कलागुणांचा विकास होईल. शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. परदेशात नोकरीची संधी मिळेल.
शुभ दिनांक – १९, २०

मीन – कोर्ट केसमध्ये मार्ग मिळेल
कौटुंबिक अडचणींवर मात करू शकाल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला संधी मिळेल. प्रतिष्ठा मिळेल. प्रवासात घाई करू नका. कोर्ट केसमध्ये मार्ग मिळेल. महत्त्वाची भेट घेता येईल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात गुंतवणूक नको. वाद व गैरसमज होईल. मैत्रीत दुरावा होऊ शकतो. सावध राहा.
शुभ दिनांक – २०, २४