भविष्य – रविवार २२ ते शनिवार २८ ऑक्टोबर २०१७

दगदग वाढेल

मेष – आठवड्याच्या सुरुवातीला दगदग वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच यशस्वी होतील. सहकारी व नेते मंडळींना दुखवू नका. नोकरीत जम बसेल. कोर्टकेसमध्ये थोरा-मोठ्यांचे सहाय्य मिळेल. शुभ दि. : २५, २६.

रागावर नियंत्रण ठेवा

वृषभ – महत्त्वाचे काम करून घ्या. तडजोड करणे व रागावर नियंत्रण ठेवणे या सूत्राची गरज आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अडचणी वाढतील. नोकरीत सरळ मार्गाने व हुशारीने काम करा. भलत्या चक्रात उडवण्याची शक्यता आहे. कोर्टकेसमध्ये तुमचे मुद्दे इतरांना पटणे कठीण आहे. शुभ दि. : २२, २३.

संयम बाळगा

मिथुन – कुटुंबात ताणतणाव होईल. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न पुन्हा निर्माण होईल. व्यवसायात मोठी संधी मिळेल. अडचणीवर मात करून पुढे जावे लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुमची बाजू घेतील. जमिनीसंबंधी समस्या सोडविण्यामध्ये आरोप होतील. शुभ दि. : २५, २६.

नवे अनुभव येतील

कर्क – राजकीय-सामाजिक क्षेत्रात वेगळय़ा स्वरूपाचा अनुभव येईल. विरोध करणारे लोक मैत्री करण्यास येतील. कोर्टकेसमध्ये सावध राहा. व्यवसायाला चांगली संधी मिळू शकेल. नोकरीत इतक्यात बदल करण्याची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या कामाचे श्रेय मिळेल. शुभ दि. : २२, २३.

मनोबलाची परीक्षा

सिंह – या आठवड्यात काही प्रश्न बिकट असतील. तडजोड करावी लागेल. टीका होईल. तुम्ही संयमाने सामोरे जा. पुढे अधिक चांगली संधी मिळेलच. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रभाव व प्रतिष्ठा वाढेल. तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल, परंतु सर्वच ठिकाणी आजूबाजूची परिस्थिती बदलण्याची जिद्द ठेवा. शुभ दि. : २५, २६.

सकारात्मक घटना घडतील

कन्या – या आठवडय़ात तुम्हाला हवे असलेले स्थान मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगती होईल. परदेशात जाण्यासाठी कंपनी प्रयत्न करेल. मुलांसंबंधी चांगली घटना घडेल. व्यवसायात जम बसेल. नवे कंत्राट मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्याबद्दल चर्चा होईल. अधिकार मिळेल. शुभ दि. : २२, २३.

यशदायी काळ

तूळ – क्षेत्र कोणतेही असो तुमच्या कार्यात तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. प्रत्येक दिवस तुमच्या प्रगतीचा ठरेल. घरासंबंधी प्रश्न सोडवता येतील. व्यवसायात संयमाने, चातुर्याने काम करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात व्यापक स्वरूपाचे कार्य करा. योजना बनवा.  शुभ दि. : २४, २५.

तडजोड करावी लागेल

वृश्चिक – कसोटीचा कालावधी आहे. तडजोड, समजूतदारपणा व मेहनत या जोरावर तुम्हाला यश खेचून आणवयाचे आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. तुमच्या आत्मविश्वास मात्र टिकून राहील. व्यवसायात संधी मिळेल. विचार करून निर्णय घ्या. कोर्टकचेरीमध्ये सावध राहा. शुभ दि. : २७, २८.

मनोधैर्य वाढेल

धनु – सुरुवातीलाच अडचणींवर मात करावी लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात दुर्बल वाढणारे लोक समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे चौफेर लक्ष द्या. मनोधैर्य वाढेल. कुटुंबात नवीन घटना घडेल. नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात जम बसेल. शेअर्स अंदाज बरोबर येईल. शुभ दि. : २७, २८.

कार्याला दिशा मिळेल

मकर – तुमच्या क्षेत्रात कार्याला योग्य दिशा मिळेल. प्रोत्साहन मिळेल. नवा अनुभव राजकीय-सामाजिक क्षेत्रात मिळेल. कोणता उठाव केव्हा व कसा करावयाचा याचे एक तंत्र राजकारणात असते. कुटुंबात तुमचे कौतुक होईल. मौल्यवान खरेदी करण्याचा विचार होईल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल. नोकरीत बदल करण्याची संधी दिसेल. शुभ दि. : २३, २४.

विचारांना चालना मिळेल

कुंभ – आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाचा निर्णय घ्या. कुटुंबात तणाव व गैरसमज होईल. जमिनीच्या व्यवहारात वाद वाढू शकतो. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विचारांना चालना देणारी घटना घडेल. कोर्टकेसमध्ये स्वतःच्या बुद्धीने काही निर्णय घ्या. नाटय़-चित्रपटात मतभेद होतील. शेअर्समध्ये वाट पाहा. पुढे फायदा होईल. शुभ दि. : २४, २५.

जबाबदारीने वागा

‘मीन – मनोधैर्य टिकून राहिल्याने कठीण निर्णय घेता येईल. उतावळेपणा व उर्मटपणाने कार्य बिघडू शकते. राजकीय-सामाजिक क्षेत्रात जबाबदारीने वागावे लागेल. दबाव वाढेल. कुटुंबातील समस्या सोडविताना चिडचिडेपणा होईल. नाटय़-चित्रपटात मोठे काम मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. : २५, २७.