भविष्य – रविवार २६ नोव्हेंबर ते शनिवार २ डिसेंबर २०१७

>> नीलिमा प्रधान

मेष – व्यवसायात संधी मिळेल
घर, जमीन यासंबंधी कामात फायदा होईल. कुटुंबात एखाद्या व्यक्तीविषयी चिंता वाटेल. स्वतःच्या प्रकृतीची योग्य प्रकारे काळजी घ्या. व्यवसायात संधी मिळेल. आपसात किरकोळ मतभेद होतील. नाटय़-चित्रपट क्षेत्रात मोहाला बळी न पडता काम करा. प्रसिद्धीसाठी थोडी वाट पाहावी लागेल. परंतु प्रगती होईल.
शुभ दिनांक – १. २

वृषभ – परदेशात जाण्याची संधी
रेंगाळत राहिलेली कामे पूर्ण करता येतील. व्यवसायात प्रगतीची संधी मिळाली तरी विचारपूर्वक निर्णय घ्या. शेअर्समध्ये फायदा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. नाटय़-चित्रपट क्षेत्रात मोठी संधी मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.
शुभ दिनांक – २८, २९

मिथुन- मौल्यवान वस्तूची खरेदी होईल
नोकरीत फायदेशीर घटना घडेल. शेअर्समध्ये अंदाज बरोबर येईल. कुटुंबात जबाबदारी वाढेल. मौल्यवान खरेदी होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विचारांना चालना देणारी घटना घडेल. नाटय़-चित्रपटात मैत्री करताना समोरच्या व्यक्तींचा प्रथम अंदाज घ्या. पैसा व वेळ फुकट जाऊ शकतो.
शुभ दिनांक – २७, २८

कर्क – प्रतिष्ठा मिळेल
या आठवडय़ात तुमचे डावपेच यशस्वी ठरतील. प्रयत्न करा. तुमच्या कार्याचा विस्तार मनाप्रमाणे करू शकाल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात संयमाने, विचाराने वागल्यास तुमचे महत्त्व वाढेल. प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळेल. घर, वाहन, जमीनसंबंधी कामे करून घ्या. प्रवासाचा आनंद घ्याल.
शुभ दिनांक – २९, २६

सिंह – मेहनत घ्यावी लागेल
व्यवसायात सावधपणे पैसा गुंतवा. कौटुंबिक सुखात अचानक अडचणी येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या उत्साहावर कुणीतरी विरजण घालण्याचा प्रयत्न करेल. कौटुंबिक वाटाघाटीत तुमचे बोलणे महत्त्वाचे ठरेल.
शुभ दिनांक – १, २

कन्या – आरोग्याची काळजी घ्या
या आठवडय़ात तुमचा संयम ढळण्याची शक्यता आहे. धंद्यात पैसा खर्च होईल. भागीदाराबरोबरचे संभाषण वादाकडे जाईल. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या जीवनसाथी व मुले यांना मात्र दुखवू नका. गोड बोलणारी व्यक्ती काम करतेच असे नाही असा अनुभव येण्याची शक्यता आहे.
शुभ दिनांक – २८, २९

तूळ – मोठे कंत्राट मिळेल
क्षेत्र कोणतेही असो तुमची प्रगती तुमच्या मेहनतीवर अवलंबून राहील. ग्रहांची साथ आहे. मेहनत करा. धंद्यात नवा फंडा मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. थोरा-मोठय़ांच्या मदतीने मोठे कंत्राट मिळवता येईल. कुटुंबातील सुखद कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन दर्जेदार परिचय फायदेशीर ठरतील.

शुभ दिनांक – २७, १

वृश्चिक – खरेदीची संधी
अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग शोधता येईल. प्रवासात सावध राहा. कोर्टकेसमध्ये योग्य व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल. व्यवसायात वाढ होईल. दर्जेदार लोकांचा सहवास मिळेल. नोकरीत बदल शक्य होईल. घर, वाहन, जमीन खरेदीची संधी मिळेल. कुटुंबातील समस्या सोडवता येतील.
शुभ दिनांक – २८, २९

धनु – खर्च वाढेल
वृद्ध व्यक्तीची जबाबदारी घ्यावी लागेल. त्यांची काळजी घेताना स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. व्यवसायात आर्थिक उलाढाल गरजेनुसारच करा. नवीन परिचयावर एकदम विश्वास टाकू नका. सहकारी, जवळचे नेते यांच्या बरोबर मतभेद होईल. खर्च वाढेल. कौटुंबिक वाटाघाटीची चर्चा पुढे ढकला.

शुभ दिनांक – २७, २९

मकर – चांगला बदल घडेल
साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. या आठवडय़ात प्रत्येक दिवस तुमच्या हिताचा ठरू शकेल. बोलण्यावर थोडा ताबा ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुम्हाला नवी दिशा मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. नव्या कल्पनेने प्रेरित व्हाल. वरिष्ठ मदत करतील. नोकरीत चांगला बदल करू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. दुरावा कमी होईल.

शुभ दिनांक – २६, २७

कुंभ – आर्थिक लाभ होईल
तुमच्या कार्यातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. राजकीय-सामाजिक क्षेत्रात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करा. प्रत्येक दिवस उत्कर्षाचा ठरेल. नाटय़, कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. आर्थिक लाभ होईल. नोकरीचा प्रश्न सुटेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. नवीन वास्तू खरेदी होऊ शकेल.
शुभ दिनांक – २९, ३०

मीन – शेअर्समध्ये फायदा वाढेल
आर्थिक लाभ वाढेल. रविवार, सोमवार भलते धाडस करू नका. वाहन जपून चालवा. शेअर्समध्ये फायदा वाढेल. कौटुंबिक वाटाघाटीत तटस्थ राहण्याचा प्रयत्न करा. दुरावलेले संबंध सुधारतील. खरेदी-विक्रीत फायदा होईल. विचारांना चालना देणारी घटना धंद्यात व कला क्षेत्रात घडेल.
शुभ दिनांक – १, २