भविष्य – रविवार १० ते शनिवार १६ डिसेंबर २०१७

>> नीलिमा प्रधान

मेष – शैक्षणिक प्रगती
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीविषयी चिंता कमी होऊ शकेल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायाला योग्य कलाटणी मिळेल. गोड बोलून तुमच्याकडून एखादे गुपित काढून घेण्याचा प्रयत्न कुणीतरी करेल. कोर्टाच्या कामात सावध राहा. शैक्षणिक प्रगती होईल. तुमचे नेतृत्व विरोधकांनासुद्धा मान्य करावे लागेल.
शुभ दि. – १३, १४

वृषभ – परदेशी जाण्याचा योग
आठवडय़ाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे करा. थोरामोठय़ांची मदत मिळू शकेल. परदेशी जाण्याचा योग कामानिमित्त येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चर्चा सफल होईल. योजना पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. अडचणींवर मात करावी लागेल. आप्तेष्ठ, मित्र यांची मदत मिळण्याची शक्यता आहे.
शुभ दि. – १०, ११

मिथुन – नोकरीचा प्रश्न सुटेल
रेंगाळत राहिलेली कामे मार्गी लावता येतील. व्यवसायात महत्त्वाचा करार होईल. कौटुंबिक प्रश्न सोडविण्यात यश मिळेल. नोकरीचा प्रश्न सुटेल. प्रतिष्ठा झगडून मिळवावी लागेल. मैत्रीत दुरावा येईल. आर्थिक उलाढालीत सावधगिरी बाळगा. नाटय़-चित्रपटसृष्टीने मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा.
शुभ दि. – १२, १३.

कर्क – नवीन कंत्राट मिळेल
या आठवडय़ात तुमची महत्त्वाची कामे होतील. आळस न करता तत्परतेने काम करा. व्यवसायात सुधारणा होईल. नवीन कंत्राट मिळेल. कौटुंबिक वाटाघाटीत पुढाकार घेण्याचा आग्रह होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात नावलौकिक व लाभ मिळेल.
शुभ दि. – १०, ११

सिंह – व्यवसायात फायदा
प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. उत्साहवर्धक घटना घडल्या तरी मनावर एखादे दडपण राहील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात योजना तयार करा. अडचणींवर मात करता येईल. व्यवसायात फायदा होईल. आर्थिक मदत मिळेल. कोर्टकेसमध्ये किरकोळ अडचणी असतील. विद्यार्थी वर्गाने ध्येय महत्त्वाचे मानावे.

शुभ दि. -१२, १३

कन्या – खरेदीची संधी
तुमच्या क्षेत्रात तुमचा कामाचा उत्साह वाढेल. व्यवसायात मोठा बदल होईल. नवे काम मिळेल. नोकरीत प्रगती व बढती होईल. कुटुंबात शुभ समाचार देणारी घटना घडेल. घर, वाहन, जमीन इ. खरेदीचा विचार होईल. संयमाने व बुद्धिचातुर्याने बोला. कोर्टकेसमध्ये दिशा मिळेल, प्रश्न सुटेल अशी आशा वाटेल.

शुभ दि. – १३, १४

तूळ – आर्थिक लाभ होईल
प्रगतीची वाटचाल सुरू आहे. तुमच्या क्षेत्रात तुम्ही वर्चस्व निर्माण करू शकाल. वेळेला व मेहनतीला महत्त्व द्या. कौटुंबिक समस्या कमी होतील. प्रतिमा उजळेल. आर्थिक सहाय्य मिळेल. दर्जेदार लोकांचा सहवास मिळेल. शैक्षणिक विभागात प्रगती होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात व्यापक स्वरूपाचे कार्य करा.
शुभ दि. १५, १६

वृश्चिक – व्यवसायात सहकार्य मिळेल
व्यवसायात थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. अचानक मोठी संधी नोकरी-धंद्यात मिळेल. कुटुंबात जवळच्या व्यक्तींना खूश ठेवता येईल. कोर्टकेसमध्ये योग्य मुद्दे मिळतील. नाटय़-चित्रपट क्षेत्रात तुमचे मत व्यक्त करताना कठोर शब्द वापरू नका. प्रगतीची मोठी संधी मिळेल. एखादे नेतृत्व करण्याची वेळ येईल.

शुभ दि. – ११, १२

धनु – शेअर्समध्ये गुंतवणूक करा
क्षेत्र कोणतेही असो आशादायक परिस्थिती निर्माण होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे अतिशयोक्तीपूर्ण बोलणे टीकाकारांना संधी देणारे ठरेल. कोर्टकेसमध्ये अडचणी येतील. शेअर्समध्ये योग्य सल्ल्याने गुंतवणूक करा. व्यवसायात चौफेर लक्ष द्या.
शुभ दि. – १२, १३

मकर – मनोधैर्य वाढेल
कोणताही महत्त्वाचा निर्णय अथवा चर्चा करावयाची असल्यास आठवडय़ाच्या सुरुवातीला करा. तुमचे मनोधैर्य वाढणार आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात कोणताही धाडसी निर्णय घेताना चौफेर सावधपणे विचार मंथन करा. सत्य व स्पष्ट मत व्यक्त करण्याची नवीनच पॉलिसी तुम्ही उपयोगात आणा. लोकांचे सहकार्य मिळेल.
शुभ दि.- ११, १२

कुंभ – यशस्वी व्हाल
तुमची जिद्द, तुमचा उत्साह यामुळे तुम्ही कोणतेही संकट पार करून यशस्वी व्हाल. नोकरीमध्ये बदल चांगला ठरेल. नवे गुंतवणूकदार मिळतील. शेअर्समध्ये फायदा होईल. स्वतःचे क्षेत्र वाढवा. पुरस्कार व आर्थिक लाभ नाटय़-चित्रपट सृष्टीत मिळेल. परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होईल. व्यवसायात जम बसेल.
शुभ दि. – १३, १४

मीन – रागावर नियंत्रण ठेवा
मान-प्रतिष्ठा मिळेल. सामाजिक कार्याचा विस्तार करण्याचा विचार कराल तुमचा आत्मविश्वास नेहमीच नव्या वाटा शोधत असतो. त्यामुळे कोणत्याही प्रसंगी तुम्ही आनंदी राहू शकता. रागावर नियंत्रण ठेवा. कोर्टकेसमध्ये दिशा मिळेल. नाटय़-क्रीडा-साहित्यात प्रगतीची संधी मिळेल.
शुभ दि. ११, १२