भविष्य – रविवार २५ ते शनिवार ३० डिसेंबर २०१७

>> नीलिमा प्रधान

मेष – आर्थिक लाभ होईल

व्यवसायात चांगले कंत्राट मिळेल. शेअर्समध्ये फायदा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे अंदाज एकदम बरोबर येतील. डावपेचांना योग्य दिशा मिळेल. कुटुंबात सुखद समाचार मिळेल. नाटय़-चित्रपट सृष्टीत पुरस्कार व आर्थिक फायदा होईल. नवीन परिचय नीट तपासून पाहा. शैक्षणिक बाजू अधिक प्रभावी होईल. शुभ दिन – २४, २५.

वृषभ – मौल्यवान वस्तू सांभाळा

 कुटुंबात वाद व गैरसमज होईल. व्यवसायात काम मिळेल. भागीदारीमध्ये समोरची व्यक्ती तुमची फसगत करण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या मागे व पुढे बोलताना सावध राहा. मौल्यवान वस्तू सांभाळा. पोटाची काळजी घ्या.कोर्टाच्या कामात गुंता वाढण्याची शक्यता आहे. नम्रतेने समस्या सोडवा. शुभ दिन – २५, २६.

मिथुन – मोठे कंत्राट मिळेल

क्षेत्र कोणतेही असो महत्त्वाची कामे होतील. भेट व चर्चा करण्यात यश मिळेल. व्यवसायात जम बसेल. मोठे कंत्राट मिळेल. मागील येणे वसूल होईल. जमिनीच्या कामात यश मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. योजना तत्परतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक दिवस प्रगतीचा आहे. शुभ दिन – २५, २६.

कर्क – खर्च वाढेल

कठीण परिस्थिती बदलण्याचा व त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. खर्च वाढेल. व्यवसायात कोणताही निर्णय संयमाने घ्या.राजकीय-सामाजिक क्षेत्रात अहंकाराची भाषा वापरल्यास संकट वाढेल. आर्थिक गुंतवणूक करण्यात फसगत संभवते. प्रवासात कटकटी होतील.  शुभ दिन – २६, २७.

सिंह – परदेशी दौऱयात यश मिळेल

 व्यवसायात किरकोळ अडचणी येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात एखादे गुपित उघड होईल. परदेशी दौऱयात यश मिळेल. कुटुंबात वाटाघाटीसंबंधी समस्या सोडवता येईल. नाटय़-चित्रपट क्षेत्रांत दर्जेदार माणसे भेटतील. तुमचा प्रभाव वाढेल. स्पर्धा जिंकण्यासाठी कलात्मकता पणाला लावा.  शुभ दिन – २४, २८.

कन्या – व्यवसायात जम बसेल

एखादी महत्त्वाची संधी या आठवडय़ात निसटण्याची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक धोरणाचा तुम्हाला तिटकारा होईल. प्रतिष्ठा राहील, परंतु नेमकी समस्या सोडवण्यासाठी आटापिटा करावा लागेल. व्यवसायात जम बसेल. परदेशात व्यावसायिक संबंध जोडले जातील. शुभ दिन – २६, २७.

तूळ – आत्मविश्वास वाढेल

 प्रयत्नांचा वेग वाढवा. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. चौफेर प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. व्यवसायाला धडाकेबंद सुरुवात करा. प्रकृतीत सुधारणा होईल. उत्साह व आत्मविश्वास वाढेल अशा घटना घडतील. अडचणीत आलेला संसार सावरता येईल. घर, वाहन, दुकान इ. खरेदी करता येईल. कोर्ट केस यशस्वी होईल. शुभ दिन – २८, २९.

वृश्चिक – शिक्षणात यश मिळेल

राजकीय-सामाजिक क्षेत्रात सहकारी वर्गाच्या मदतीने तुमची प्रतिष्ठा राखण्यास मदत होईल. प्रवासात सावध राहा. व्यवसायात फायदा होईल. मोठी गुंतवणूक करण्याची घाई नको. योग्य सल्ला घ्या.कुटुंबात भेटी होतील. नाटय़-चित्रपट क्षेत्रात नावलौकिक मिळेल. शिक्षणात यश मिळेल. आळस करू नका. शुभ दिन – २६, ३०

धनु – खरेदीची संधा

कौटुंबिक समस्या सोडवताना भावनेच्या आहारी जाऊ नका. मनावरील व शरीरावरील ताण कमी होईल. घर, वाहन, जमीन इ. खरेदीची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वेगाने कार्य होईल. व्यवसायात कोणतेही आश्वासन देताना सावध राहा. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. दर्जेदार लोकांचा सहवास मिळेल.  शुभ दिन – २४, २५

मकर – दूरदृष्टिकोन ठेवा

 साडेसाती सुरू आहे. क्षेत्र कोणतेही असो, तुमचे अतिशयोक्तीपूर्ण वागणे तुमच्याच अंगाशी येऊ शकते. राजकीय-सामाजिक क्षेत्रात युक्ती व दूरदृष्टिकोन ठेवा. कोर्टाच्या कामात अडचणी येतील. पैसा देऊन फसगत होईल. कुटुंबात मनाविरुद्ध एखादा निर्णय होईल. मन उदास राहील. व्यवसायात भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घालणे गरजेचे आहे.     शुभ दिन – २५, २६.

कुंभ – प्रवास होईल

 तुमच्या यशाचा झेंडा उंचावर फडकेल. चौफेर घोडदौड चालू ठेवा. व्यापक स्वरूपाचे कार्य करा. समस्या सोडवता येतील. कुटुंबात शुभ समाचार मिळेल. परदेशी प्रवास होईल. व्यवसायात मोठा प्रकल्प उभारता येईल. स्वतंत्रपणे छोटासा धंदा सुरू करण्याचा प्रयत्न करा. नाटय़-चित्रपट क्षेत्रात पुरस्काराने सन्मानित व्हाल. शु दिन २६, २७.

मीन – लॉटरीत लाभ होईल

स्वतःच्या मर्यादा ओळखून तुम्ही कार्य करा. व्यवसायात जम बसेल. लॉटरी तिकिटात लाभ मिळू शकेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रगतीची संधी वरिष्ठ देतील. आर्थिक सहाय्य उभे करता येईल. कुटुंबात मौल्यवान खरेदी संभवते. घर, वाहन, जमीन व्यवहार जमेल. नाटय़-चित्रपटात प्रगतीची संधी शोधून मिळेल.  शुभ दिन २८, २९.