भविष्य – रविवार ३१ डिसेंबर २०१७ ते शनिवार ६ जानेवारी २०१८

>> नीलिमा प्रधान

मेष – व्यवसायात संधी मिळेल
या आठवडय़ात तुम्ही ठरविलेली योजना पूर्ण होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात, दौऱयात व सभा-संमेलनात तुमचा प्रभाव वाढेल. लोकांच्या गरजा ओळखून तुम्ही त्यानुसार कार्याची रचना करा. प्रत्येक दिवस तुमच्या बाजूचा ठरेल. व्यवसायात संधी मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. शुभ दि. – १, २.

वृषभ – सावध रहा
व्यवसायातील निर्णय लवकर निश्चित करा. काम मिळवा. थकबाकी आठवडय़ाच्या सुरुवातीलाच वसूल करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात कठीण प्रसंगावर मात करण्याची जिद्द ठेवा. चौफेर सावध रहा. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळणे अशक्य होऊ शकते. कोर्ट केसमध्ये तुमच्याविरोधात मुद्दे निघतील. शुभ दि. १, २.

मिथुन – मोठे कंत्राट मिळेल
व्यवसायातील गुंता सोडविण्यात यश मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. मोठे कंत्राट मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. तुमच्या योजना पूर्ण करण्याची इच्छा ठेवा. तुमचे सोनेरी स्वप्न पूर्ण होईल. मग क्षेत्र कोणतेही असो. कौटुंबिक सौख्य मिळेल. घर, वाहन, जमिनी खरेदी-विक्री करता येईल. शुभ दि. – ४, ५.

कर्क – आर्थिक व्यवहार सावधपणे करा
तुमच्या क्षेत्रात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदाराबरोबर मतभेद होतील. जवळचेच लोक कटकारस्थान करण्याची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या चुका दाखविण्याचा प्रयत्न विरोधक करतील. मौल्यवान वस्तू सांभाळा. कोणताही आर्थिक व्यवहार सावधपणे करा. वादविवाद जास्त वाढवू नका. शुभ दि. ५, ६.

सिंह – मौल्यवान खरेदी
श्री शाकंभरी देवीच्या कृपेने तुमची कामे मार्गी लागतील. आठवडय़ाच्या मध्यावर व्यवसायात किरकोळ मतभेद होतील. त्याला जास्त महत्त्व देऊ नका. नोकरीत चांगला बदल होईल. कुटुंबात शुभकार्याचे ठरेल. मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. महत्त्वाची वस्तू सांभाळा. कोर्ट केसचा मामला संपवता येईल. शुभ दि. – ३१, २.

कन्या – शेअर्समध्ये फायदा होईल
आठवडय़ाच्या शेवटी मनावरील दडपण वाढेल. जवळच्या व्यक्तीसाठी धावपळ करावी लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे विचार पटवून देणे कठीण होईल. शेअर्समध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होईल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा फारच महत्त्वाची ठरेल. शुभ दि. – ३१, १.

तूळ- नोकरी मिळेल
किरकोळ दुखापत संभवते. कुटुंबात उत्साही वातावरण राहील. प्रेमाला चालना मिळणारी घटना घडेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नव्या योजना वरिष्ठांच्या समोर ठेवता येतील. तुमच्या कार्याचे कौतुक होईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. व्यवसायात जम बसेल. मनावरील दडपण कमी झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. शुभ दि. २, ५.

वृश्चिक – उत्साह वाढेल
राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचा संताप वाढेल. प्रवासात सावध रहा. आप्तेष्ट, मित्र यांच्या भेटीने तुमचा उत्साह वाढेल. परदेशात जाण्याचा विचार कराल. व्यवसायाला कलाटणी मिळेल. गुंतवणूक होईल. महत्त्वाच्या विषयावर विचारविनिमय कराल. कोर्ट केससंबंधी कामात सहाय्य मिळेल. नाटय़-चित्रपट व्यवसायाला प्रतिसाद मिळेल. शुभ दि. ४, ५.

धनु – परदेशात जाण्याची संधी
शारीरिक, मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. जास्त विचार न करता तुमच्या कार्यावर तुम्ही नजर ठेवून कार्य करा. राजकीय-सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वाटाघाटीसंबंधी चर्चा करण्यात यश मिळेल. कोर्ट केसचा मामला संपवता येईल. परदेशात कंपनीद्वारे जाण्याची संधी मिळेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात नव्याने वर्चस्व प्रस्थापित होईल. शुभ दि. ५, ६.

मकर – उतावळेपणा टाळा
या आठवडय़ात तुमच्यावर एखाद्या प्रकरणाचा दबाव राहील. तुमचे मानसिक संतुलन अस्थिर होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध निर्णय घेण्याची वेळ येईल. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर टीका होईल. आरोप होतील. आर्थिक देवघेवीत उतावळेपणा नको. उत्साहाचा व अहंकाराचा अतिरेक कुठेही होता कामा नये. शुभ दि. – ३१, ४

कुंभ – मोठय़ा लोकांचा सहभाग
पूर्वी बिघडलेले संबंध नव्याने पुन्हा जोडले जातील. स्वतःच्या प्रगतीची प्रत्येक संधी तुम्ही घेतल्यास देदीप्यमान यश मिळू शकेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मोठय़ा लोकांचा सहवास मिळेल. तुमच्या अस्तित्वासंबंधी इतर लोक चांगला विचार करतील. लोकांचे सहाय्य व लोकप्रियता मिळेल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. शुभ दि. ५, ६.

मीन – उत्साहवर्धक घटना
व्यवसायात मोठे कंत्राट मिळेल. मागील कामे पूर्ण करून पैसा वसूल करा. मानसन्मानाचा योग येईल. किरकोळ वाद जास्त वाढवू नका. कोर्ट केसमध्ये दिशा मिळेल. तरीही सावध रहा. कुटुंबात प्रेमाचे वातावरण राहील. सावधपणे सर्व कागदपत्रे पहा. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल. स्पर्धेत टिकून राहता येईल.  शुभ दि. ३१, २.