आठवड्याचे भविष्य

8749

मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ), [email protected]

मेष – यश तुमचेच
तुमचे आकर्षक व्यक्तिमत्त्व हे तुमचे मोठे भांडवल आहे. त्याचा या आठवडय़ात तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे. यश निश्चित् ाआहे.पोवळे जवळ बाळगा.
शुभ अलंकार – तांब्याचे कडे, वळे.

वृषभ – कौतुक होईल
खूप भावनिक व्हाल. खूप लवकर कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमचा प्रामाणिकपणा, मेहनत यामुळे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. अमेरिकन डायमंड जवळ ठेवा.
शुभ अलंकार – बांगडी, नेकलेस.

मिथुन – आनंदी राहाल
पूर्वी केलेली गुंतवणूक आता कामी येईल. त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम असेल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमचा जोडीदार कायम प्रयत्नशील राहील. पाचू रत्न लाभदायी.
शुभ अलंकार – ठुशी, फॅन्सी अंगठी.

कर्क – कर्जमुक्त व्हाल
घरासाठी घेतलेले सर्व कर्ज फिटेल. त्यामुळे खूप मोकळे आणि समाधानी वाटेल. कुटुंबासमवेत आनंदोत्सव साजरा कराल. घरातील ज्येष्ठांच्या सर्व अपेक्षा पूर्ण कराल. मोती नेहमी करंगळीत घाला.
शुभ अलंकार – तन्मणी, नथ.

सिंह – प्रभावी काम
सामाजिक आणि धार्मिक कार्यात रमाल. त्यामुळे मानस समाधान मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. घरातील ज्येष्ठांच्या सल्ल्याने वागा. फायदा होईल. माणिक रत्न बोटात घाला.
शुभ अलंकार – सोन्याचा कोणताही अलंकार.

कन्या – लहानांचे प्रेम
तुमच्या हातून उच्च कामगिरी होणार आहे. उच्च वर्तुळात वावरण्याचा योग येईल. लहानांकडून मिळालेली काळजी, जिव्हाळा दिल जीत लेगी. पाचू रत्न महत्त्वाचे.
शुभ अलंकार – सोन्याचे वळे, कर्णफुले.

तूळ – मोठी कामे
तुमचे संवाद कौशल्य कामी येईल. त्यातून मोठा आर्थिक लाभ संभवतो. जिभेवर साखर ठेवा. क्रोधाची वाचणे नको. हातातील मोठे काम पूर्ण होईल. हिरा नेहमी धारण करा.
शुभ अलंकार – सोनेरी घडय़ाळ, बाजूबंद.

वृश्चिक – मदत करा
हा आठवडा कामामुळे खूप थकविणारा असेल. पण काम यशस्वी झाल्यामुळे मानस समाधान लाभेल. दुसऱयाकडून घेतलेल्या धनाची परतफेड करा. गरजूंना मदत करा. पोवळे रत्न जवळ ठेवा.
शुभ अलंकार – पटल्या, पारंपरिक दागिना.

धनु – फिरायला जा
व्यक्तिगत आयुष्यात नवी घडामोड घडेल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. समुद्र सान्निध्य लाभेल. फिरायला जाल. पुष्कराज रत्न जवळ ठेवा.
शुभ अलंकार – ब्रेसलेट, सोन्याची अंगठी.

मकर – पैसे सांभाळा
अतिरिक्त पैसा सुरक्षित जागी ठेवा. भविष्यात त्याचा लाभ होईल. धार्मिक कार्यासाठी उत्तम आठवडा आहे. सूर्याचा प्रकाश अंगावर घ्या. नीलम रत्न महत्त्वाचे.
शुभ अलंकार – चांदीची पेटी, रुद्राक्ष.

कुंभ – परमानंद होईल
तर्कसंगत वागण्याचा प्रयत्न करा. आवडत्या व्यक्तीचा सहवास मिळविण्याचा प्रयत्न कराल. काचेपासून लांब राहा. परमानंदाची अनुभूती मिळेल. गोमेद रत्न जवळ ठेवा.
शुभ अलंकार – आवडीचा अलंकार.

मीन – मेहनत चिकाटी
इच्छा साकार करण्यासाठी विलक्षण मेहनत चिकाटीची आवश्यकता असेल, पण त्यात यश मिळणार आहे. नवे प्रकल्प हाती घ्याल. लसण्या खडा जवळ बाळगा.
शुभ अलंकार – हिऱयाचे दागिने.

आपली प्रतिक्रिया द्या