आठवड्याचे भविष्य

273

>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष -ठाम निर्णय
ऊन पावसाचा खेळ या आठवडयात तुमच्या अनुभवास येईल. पण काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. कार्यालयीन निर्णय काळजीपूर्वक घ्या. चटकन एखाद्यावर विश्वास ठेवू नका. पांढरा रंग लाभदायी.
शुभ परिधान – चांदी, टोपी

वृषभ – नोकरी मिळेल
घरातील व्यवसायात कामाचा अतिरिक्त ताण वाढणार आहे. निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. शक्य झाल्यास वाळूत उघडया पायांनी फिरा. त्यानिमित्ताने समुद्राचे दर्शन घडेल. निळा रंग परिधान करा. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करा.
शुभ परिधान- शिंपला, मोती

मिथुन – भरभराट होईल
घरातील ताण तणाव हळूहळू निवळेल. वातावरण शांत होईल. हिरवा रंग महत्वाचा ठरेल. ध्यानधारणा करा. पसायदान रोज म्हणा. कामाच्या ठिकाणी भरभराट होईल. आई मुलांच्या नात्याला नव्याने दृढता प्राप्त होईल.
शुभ परिधान – रुद्राक्ष, काळा दोरा

कर्क – उत्तम यश
तब्येतीकडे लक्ष द्या. स्थूल प्रकृतीच्या व्यक्तींनी बाहेरचे पदार्थ टाळावेत. राखाडी रंग जवळ ठेवा. पाण्याने भरलेल्या कलशाची पूजा करा. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. प्रयत्नांची कास सोडू नये. घरातील सहायकांवर जास्त विश्वास ठेऊ नका.
शुभ परिधान – खादीचे कापड, देशी वहाण

सिंह ः अलिप्त राहा
कोणाच्याही अध्यात मध्यात नसण्याचा तुमचा स्वभाव या आठवडयात कामी येईल. कधी कधी केवळ आपल्यापुरते पाहणे शहाणपणाचे ठरते. तेच तुम्ही करायचे आहे. आकाशी रंग जवळ ठेवा. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. कामात यश मिळेल.
शुभ परिधान – उपरणे, काचेच्या बांगडय़ा

कन्या – अन्नदान करा
आपली मुले हे आपले सर्वस्व असते. हे मनाशी नेहमी धरून चला. घरातील मुलांची काळजी घ्या सोमवारी संध्याकाळी अन्नदान करा. पुण्यसंचय वाढेल. मोतिया रंग शुभ ठरेल. न्यायालयीन कामे मार्गी लागतील. घरात नव्या वस्तू येतील.
शुभ परिधान – सोन्याचे झुमके, कुंकू

तूळ – समृद्धी नांदेल
आनंद घर भरून राहील. संध्याकाळी रोज दीप पूजन करा. घरात समृद्धता नांदेल. लहानांच्या तब्येतीची काळजी घ्या. सोने खरेदी कराल. सोन्याचे नाणे वेगळी पूजा करून तिजोरीत ठेवून द्या. लाल रंग लाभदायक.
शुभ परिधान – आधुनिक अलंकार, प्लॅटीनम

वृश्चिक – उत्तम ग्रहमान
प्रकृतीची काळजी घ्या. औषधोपचार वेळेवर करून घ्या. बाकी ग्रहमान उत्तम आहे. साईबाबांची आराधना सुरु ठेवा. तेथील उदी मस्तकी लावा. तुमच्यात एक वेगळी शक्ती आहे. तिचा वापर सरंक्षणासाठी केला जाईल. केशरी रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – नेल आर्ट , अंगठी

धनु – वेगळे वळण
जुने मित्र भेटतील. राखाडी रंग परिधान करा. वैवाहिक आयुष्यास एक वेगळे वळण लाभेल. विवाह जुळेल. तो शुभकारक असेल. कामाचा ताण जाणवेल. नवे काम मिळेल. एकमुखी रुद्राक्षाची दररोज पूजा करा.
शुभ परिधान – टाय, ब्रोच

मकर – मातीशी नाते
मातीशी संबंधित योग आहे. हातून सर्जनशील घडेल. दर गुरुवारी एखादे झाड लावण्याचा प्रघात ठेवा. हिरवाईची प्रसन्नता मनातही रेंगाळेल. मातकट रंग जवळ बाळगा. तांब्याच्या भांडयातून पाणी प्या. तब्येतीची तक्रार जाणवणार नाही.
शुभ परिधान – मोगरा, अत्तर

कुंभ- काम वाढेल
प्रवेशद्वाराजवळ स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवा. सकाळी ते पाणी ओतून द्या. असे नेमाने करा. घरात सकारात्मकता येईल. नव्या जबाबदाऱया मिळतील. मन स्थिर ठेवा. काम वाढेल. हिरवा रंग जवळ बाळगा. हास्य विनोदात वेळ मजेत जाईल.
शुभ परिधान – गॉगल, चाफ्याचे अत्तर

मीन – मनोबल वाढेल
मत्स्य राशीचा थंडावा तुमच्या ठायी आहे. त्यामुळे तुमचे मानसिक बळ वाढेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा तणाव जाणवेल. पण कामाचे कौतुकही होईल. अबोली रंग परिधान करा. प्रेम प्रकरणात यश मिळेल. विवाह योग आहे. मिळणारी कोणतीही संधी सोडू नका.
शुभ – खेळाचे कपडे

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या