आठवड्याचे भविष्य : रविवार 13 ते शनिवार 19 ऑक्टोबर 2019

2229

>>  नीलिमा प्रधान

मेष – महत्त्वाच्या कामाकडे लक्ष द्या

मेषेच्या अष्टमेषात बुध राश्यांतर शुक्र-नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाच्या कामाकडे लक्ष द्या. व्यवसायात लक्ष द्या. व्यवसायात फायदा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत विचारांना चालना मिळेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत स्पर्धेत प्रगती कराल.   शुभ दिनांक – 21, 22

वृषभ – सावध रहा

वृषभेच्या सप्तमेषात बुध राश्यांतर, चंद्र-मंगळ युती होत आहे. व्यवसायात अडचणींवर मात करता येईल. अहंकार न ठेवता धंद्यात चर्चा करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत जवळचे लोक तुमच्या विरोधात कारस्थान करण्याचा प्रयत्न करतील. चौफेर सावध रहा. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील.  शुभ दिनांक – 22, 23

मिथुन – अधिकारांचा लाभ घ्या

मिथुनेच्या षष्ठsषात सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. क्षेत्र कोणतेही असो, व्यवसाय-नोकरीत तुम्हाला लाभ होईल. तुमचे अधिकार उपयोगात आणता येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत मोठी लोकप्रियता मिळेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल.   शुभ दिनांक – 21, 22

कर्क – कल्पनाशक्तीला चालना मिळेल

कर्केच्या पंचमेषात बुध राश्यांतर, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वरिष्ठ, जवळचे सरकारी, नेते यांना कमी लेखू नका. आत्मविश्वास हवा. कौटुंबिक समस्या चिंताजनक वाटेल. मार्ग मिळेल. कल्पनाशक्तीला चालना देणारी घटना कला क्षेत्रात घडेल. नवीन परिचय होतील.   शुभ दिनांक- 24, 25

सिंह – वर्चस्व सिद्ध कराल

सिंहेच्या सुखेषात बुधाचे राश्यांतर, शुक्र-शनी लाभयोग होत आहे. व्यवसायात काम मिळाले तरी वेळेत पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घ्या. नोकरीत फायदेशीर बदल करता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचे वर्चस्व सिद्ध करता येईल. कुटुंबात सुखद घटना घडेल. नवी खरेदी होईल.    शुभ दिनांक -25, 26

कन्या – परदेशी जाण्याची संधी

कन्येच्या पराक्रमात बुधाचे राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायात जम बसेल. परदेशातही तुमच्या मालाला विशेष मागणी असेल. नोकरीत वरिष्ठांना खुश कराल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमची अपेक्षा पूर्ण होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. प्रगतीचा नवा टप्पा गाठाल.  शुभ दिनांक – 21, 22

तूळ – प्रगतीची संधी लाभेल

तुळेच्या धनेषात बुधाचे राश्यांतर, चंद्र-मंगळ केंद्रयोग होत आहे. रागावर ताबा ठेवा. जुळत आलेली एखादी घटना बिघडण्याची शक्यता. व्यवसायात फायदा होईल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वर्चस्व वाढेल. दौऱयात लोकप्रियता मिळेल. कुटुंबात कामाचा व्याप वाढेल.   शुभ दिनांक – 22, 23

वृश्चिक – व्यवसायात चातुर्य बाळगा

स्वराशीत बुधाचे राश्यांतर, चंद्र-शनी प्रतियुती होत आहे. घरातील खर्च वाढेल. मन अस्थिर करू नका. जवळच्या व्यक्तीबरोबर गैरसमज होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत लोकांच्या मनात संशय निर्माण होईल. व्यवसायात भावना व व्यवहार यांची नीट सांगड घाला. गुंता करू नका. शुभ दिनांक – 22, 23

धनु – सामाजिक क्षेत्रात यश लाभेल

साडेसाती सुरू आहे. धनुच्या व्ययेषात बुध राश्यांतर, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा नाहीतर व्यवसायात मागे राहाल. नोकरीत वर्चस्व वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत दौऱयात यश मिळेल. लोकांच्या भावना जपता येतील. तुमचे बोलणे काही वेळेस वादग्रस्त ठरू शकते.    शुभ दिनांक – 20, 24

 मकर – महत्त्वाचा निर्णय घ्याल

मकरेच्या एकादशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घ्या. जास्त वेळकाढू धोरण ठेवू नका. नवे कंत्राट मिळेल. नोकरीत मनाप्रमाणे बदल करण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत कार्यक्रमाचे योग्य पद्धतीने नियोजन करा. वेळेला महत्त्व द्या.  वाटाघाटीत फायदा होईल. शुभ दिनांक – 21, 22

कुंभ – नवीन परिचय होतील

कुंभेच्या दशमेषात सूर्य राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. कोणतेही काम करण्याची जास्त घाई करू नका. व्यवसायात चांगला फायदा होईल. मोठय़ा लोकांचा परिचय होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचे विचार प्रभावी ठरतील. परदेशात जाण्याचा विचार कराल. संयमाने तुमचे मत व्यक्त करा.  शुभ दिनांक – 20, 24

 मीन – निर्णयात सावधगिरी बाळगा

मीनेच्या भाग्येषात बुध राश्यांतर, चंद्र-शनी त्रिकोणयोग होत आहे. नोकरीत नियमांचा भंग होईल असा निर्णय घेऊ नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत उतावळेपणाने निर्णय घातक ठरेल. भावनेच्या आहारी जाऊन विचार करू नका. प्रसिद्धीचा विचार न करता तुमच्या क्षेत्रात काम करा.   शुभ दिनांक – 22, 23

आपली प्रतिक्रिया द्या