आठवड्याचे भविष्य – १० ते १६ जून २०१८

>> नीलिमा प्रधान

मेष – पूर्वीची चूक करू नका
मेषेच्या पराक्रमात बुध व सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात एक ‘लक्ष्य’ डोळय़ांसमोर ठेवून वाटचाल करावयाची आहे. पूर्वी झालेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायात पुनर्बांधणी करून घडी नीट बसवा. कौटुंबिक नाराजी तात्पुरती असेल.
शुभ दिनांक – १२, १३

वृषभ – गुरूला विसरू नका
वृषभेच्या धनेषात बुध आणि सूर्याचे राश्यांतर होत आहे. रविवार, सोमवारी संभ्रम वाढेल. विरोधकांची भूमिका बदलण्याची शक्यता आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्ही दुर्लक्षित केलेल्या योजनांकडे विरोधक लक्ष देतील. ज्या गुरूने तुमच्या क्षेत्रात योग्य सल्ला तुम्हाला दिला असेल त्याला विसरू नका.
शुभ दिनांक – १४, १६

मिथुन – चौफेर दक्ष राहा
स्वराशीत बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात आपण कोणाचे ‘भक्ष्य’ होणार नाही याची काळजी घ्या. चौफेर दक्ष राहा आणि स्वतःचे उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवून कार्यरत राहा. गुंतवणुकीचा उतावळेपणा करू नका. वृद्ध व्यक्तीची चिंता राहील. आठवडय़ाच्या शेवटी मार्ग निघेल.
शुभ दिनांक – १५, १६

कर्क – कामाचा व्याप वाढेल
कर्केच्या व्ययेषात बुध आणि सूर्य येत आहेत. आठवडय़ाच्या सुरुवातीलाच महत्त्वाची कामे करून घ्या. योजनांची पूर्तता तत्परतेने करा. कुटुंबातील समस्येवर भाष्य करणे घरातील वादाचे कारण ठरू शकते. कामाचा व्याप सर्वच ठिकाणी वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक – १०, ११

सिंह – मैत्रीमध्ये दुरावा
सिंहेच्या एका दशात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुम्ही ठरवलेले ‘लक्ष्य’ पूर्ण करण्यासाठी कक्षेच्या बाहेर जाऊन काम करावे लागेल. चौफेर घोडदौड करा. दौऱयात खाण्यापिण्याची काळजी घ्या. मैत्रीमध्ये दुरावा येऊ शकतो.
शुभ दिनांक – ११, १२

कन्या – प्रतिष्ठा वाढेल
कन्येच्या दशमेषात बुध आणि सूर्याचे राश्यांतर होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला धावपळ होईल. तब्येतीवर ताण पडेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमची लक्ष्यपूर्ती फारच महत्त्वाची ठरू शकते. प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखद राहील. नोकरीचा प्रश्न सुटेल.
शुभ दिनांक- १२, १४

तूळ – व्यवसायात संधी मिळेल
तुळेच्या भाग्येषात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहेत. राजकीय-सामाजिक क्षेत्रात आशेचा किरण दिसेल. वरिष्ठांच्या मर्जीसाठी एखादे किचकट काम करावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. कोणतेही मत कुठेही व्यक्त करण्याची घाई करू नका. व्यवसायात संधी मिळेल.
शुभ दिनांक – १०, ११

वृश्चिक – परीक्षेसाठी तयारी करा
वृश्चिकेच्या अष्टमेषात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही इतरांना कशा पद्धतीने वेठीस धरले आहे याकडे विरोधक बारीक लक्ष ठेवतील. प्रतिष्ठsवर आच येईल. परीक्षेसाठी चांगली तयारी करा.
शुभ दिनांक – १२, १३

धनु – संमिश्र घटना घडतील
धनु राशीच्या सप्तमेषात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. सर्वच बाबतीत संमिश्र घटना घडतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नव्या विचारांनी कार्य करावे लागेल. दिशा बदलून इतरांचे लक्ष विचलित करण्यात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात समस्या आल्या तरी मार्ग निघेल. जीवनसाथीची काळजी घ्या.
शुभ दिनांक – १०, १४

मकर – वाहन जपून चालवा
आठवडय़ाच्या सुरुवातीपासून तुम्ही तुमची महत्त्वाची कामे करून घ्या. वरिष्ठांबरोबर चर्चा सफल होईल. मकरेच्या षष्ठsषात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्यावर टीका करून तुम्हाला लक्ष्य केले जाईल. वाहन जपून चालवा. अहंकारावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास प्रभावी ठरेल.
शुभ दिनांक – १२, १३

कुंभ- गुप्त शत्रू त्रास देतील
कुंभेच्या पंचमेषात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. तुम्हाला कमी लेखणारे तुमच्याचकडे कामासाठी येतील. जवळच्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक वाटाघाटीत समस्या वाढतील. गुप्त शत्रू त्रास देतील. व्यवसायात फायदा होईल, पण भागीदार तुमची दिशाभूल करण्याची शक्यता आहे.
शुभ दिनांक – १४, १५

मीन – लोकांसाठी काम करा
मीनेच्या सुखस्थानात बुध आणि सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी कामे करा. इतरांकडून तसा प्रयत्न होऊ शकतो. व्यवसायात फायदा होईल. स्पर्धक भागीदार करून घेण्यासाठी मागे लागतील. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल.
शुभ दिनांक – ११, १२