आठवड्याचे भविष्य : रविवार 10 ते शनिवार 16 मार्च 2019

>> नीलिमा प्रधान

मेष – मेषेच्या व्ययेषात सूर्य, कुंभेत बुध वक्री होत आहे. राजकारणात तुमची जिद्द फारच महत्त्वाची ठरेल. विरोधाकडे लक्ष न देता चर्चा करा. निर्णय घ्या. सामाजिक क्षेत्रात लोकांचे सहकार्य मिळेल. त्यांच्या प्रश्नावर निश्चित स्वरूपाचे उपाय तुम्ही शोधा. खर्च वाढेल. कुटुंबात महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. शुभ दि. 11,13

वृषभ – वृषभेच्या एकादशात सूर्य राश्यांतर, कुंभेत बुध वक्री होत आहे. रविवार, सोमवार मन अस्थिर राहील. रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय क्षेत्रात प्रभाव वाढवण्याची तयारी ठेवा. सामाजिक कार्यात झालेला गैरसमज दूर करा. व्यवसायात भागीदाराबरोबर तणाव होऊ शकतो. समस्या सोडवता येईल. शुभ दि. 15,16

मिथुन – मिथुनेच्या दशमेषात सूर्य, नवमेषात बुध वक्री होत आहे. कोणत्याही क्षेत्रातील महत्त्वाची कामे करून घ्या. उद्योगधंद्यात जम बसेल. मोठे कंत्राट मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा पणाला लावून प्रश्न सोडवता येईल. तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. नोकरीत जबाबदारी वाढेल. शुभ दि. 10, 11
सावधपणे व्यक्त व्हा

कर्क – कर्केच्या भाग्येषात सूर्य राश्यांतर, कुंभेत बुध वक्री होत आहे. या आठवडय़ात तुम्हाला सावधपणे वक्तव्य करावयाचे आहे. इतरांच्या चुकीचे आरोप तुमच्यावर होऊ शकतो. राजकारणात अंदाज घेणे कठीण आहे. सामाजिक प्रतिष्ठा टिकवता येईल. करार करण्याची घाई नको. शुभ दि. 13, 14
निर्णय प्रभावी ठरतील

सिंह – सिंहेच्या अष्टमेषात सूर्य, सप्तमात बुध वक्री होत आहे. राजकारणात तुमचा निर्णय प्रभावी ठरेल. तुमचे महत्त्व वाढेल. व्यवसायात नवा फंडा विचारात घ्या. मेहनत घ्या. जिद्द ठेवा. समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. जीवनसाथीची नाराजी दूर करणे अवघड होईल. कलाक्षेत्रात संमिश्र घटना घडतील. शुभ दि. 10, 11
रागावर ताबा ठेवा

कन्या – कन्येच्या सप्तमेषात सूर्य, कुंभेत बुध वक्री होत आहे. तुमच्या क्षेत्रातील प्रश्न सोडवणे कठीण आहे. राजकारणात तुमचे डावपेच तयार करा. रागावर ताबा ठेवा. सामाजिक कार्याला दिशा मिळेल. लोकांचे सहकार्य मिळवा. उद्योगात प्रगतीची संधी मिळेल. कलाक्षेत्रात नवी संधी मिळेल. तिचा लाभ घ्या. शुभ दि. 15, 16
स्पर्धा वाढेल

तूळ – तुळेच्या षष्ठsशात सूर्य, पंचमेषात बुध वक्री होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीलाच महत्त्वाचा निर्णय घ्या व कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न होईल. तुमच्याशी स्पर्धा वाढेल. तुमच्या मागे कट रचण्याचा प्रयत्न होईल. कुटुंबात किरकोळ समस्या येईल. खर्च वाढेल. शुभ दि. 10, 11
मन अस्थिर राहील

वृश्चिक – वृश्चिकेच्या पंचमेषात सूर्य, कुंभेत बुध वक्री होत आहे. मन अस्थिर राहील. कोणताही अंदाज घेताना विचारांचा गुंता होईल. उद्योगात अडचणी येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विरोधक त्रस्त करतील. आत्मविश्वासाने निर्णय घ्या. प्रश्नाच्या दोन्ही बाजू समजून घेऊनच निर्णय घ्या. शुभ दि. 13, 14
नवे कंत्राट मिळेल

धनु – धनुच्या सुखेषात सूर्य, कुंभेत बुध वक्री होत आहे. गतिमान झालेली कामे वेळेत पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. व्यवसायात तारेवरची कसरत असली तरी नवे कंत्राट मिळवता येईल. मोठय़ा लोकांच्या ओळखीचा फायदा करून घ्या. चित्रपट-क्रीडा क्षेत्रात मोठे काम मिळेल. कुटुंबात सुखद समाचार मिळेल. मुलांची प्रगती होईल. शुभ दि. 10, 11
प्रतिष्ठा वाढेल

मकर – मकरेच्या पराक्रमात सूर्य, कुंभेत बुध वक्री होत आहे. प्रत्येक दिवस कसा महत्त्वाचा करावयाचा हे तुम्ही ठरवा. राजकीय क्षेत्रात तुमचे विचार प्रभावी ठरतील. डावपेच यशस्वी होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रगतीत आडवा येणारा दगड फोडता येईल. दूरदृष्टी ठेवा. ध्येय गाठा. चांगली संधी कापरासारखी उडून जाते. परदेशात जाल. शुभ दि. 12, 13.
मनोबल राखा

कुंभ – कुंभेच्या धनेषात सूर्य, स्वराशीत बुध वक्री होत आहे. माणसाची हुशारी, कर्तृत्व हे कधी कधी जवळच्या माणसाला दिसत नाही. दुसऱयांना त्याचे कौतुक जास्त वाटते. तसे तुमच्या बाबतीत घडू शकते. सामाजिक क्षेत्रात द्वेष होऊ शकतो. गुप्त कारवायांचा त्रास होईल. तरीही तुमचे मनोबल मात्र खंबीरपणे निर्णय घेऊ शकेल. शुभ दि. 11, 15
उतावीळपणा करू नका

मीन – स्वराशीत सूर्य प्रवेश, कुंभेत बुध वक्री होत आहे. मनावरील दडपण दूर होण्याची शक्यता. व्यवसायात उतावीळपणा नको. राजकीय क्षेत्रात संधी मिळेल पण संघर्ष करावा लागेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लोकांच्या उपयोगी पडाल. कलाक्रीडा क्षेत्रांत ओळखी वाढतील. कौतुकास्पद काम होईल. शुभ दि. 14, 16

आपली प्रतिक्रिया द्या