आठवड्याचे भविष्य : 14 एप्रिल ते 20 एप्रिल 2019

>> निलीमा प्रधान

मेष – वर्चस्व सिद्ध कराल
मेष राशीत सूर्य, मीनेत शुक्र राश्यांतर होत आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तिथे तुमची प्रतिमा उजळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व नव्याने सिद्ध होईल. सामाजिक कार्यात सहकारी डावपेच खेळण्याचा प्रयत्न करतील.
शुभ दिनांक – 15, 16.

वृषभ – सावध रहा
मेषेत सूर्य, मीनेत शुक्र राश्यांतर होत आहे. व्यवसायात हातात असलेले काम सांभाळून ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या मनाविरुद्ध निर्णय झाल्याने संताप वाढू शकतो. भलत्या प्रकरणात तुम्हाला अडकवले जाईल. नोकरीत कामात सावध रहा. महत्त्वाचा निर्णय देताना वरिष्ठांचा सल्ला घ्या.
शुभ दिनांक – 17, 18.

मिथुन – प्रयत्नात सातत्य ठेवा
अडचणीत आलेली कामे याच आठवडय़ात करता येईल. प्रयत्नात सातत्य ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. तुमचे अधुरे स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत बढती वा चांगला बदल लाभेल. नवी दिशा मिळाल्याने पुढील नियोजन करता येईल. चांगली संधी थोडा काळच असते. तिचा लाभ घ्या.
शुभ दिनांक – 15, 16.

कर्क – नावलौकिक मिळेल
मेषेत सूर्य, मीनेत शुक्र राश्यांतर होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना प्रेमाने जिंकता येईल. स्वतःच्या मनाप्रमाणे यश मिळवण्याचा प्रयत्न करा. दुसऱयांच्या प्रतिष्ठsवर घाला न घालता स्वतःचे कार्य करण्यात वेळ खर्च करा. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक व पैसा मिळेल.
शुभ दिनांक – 15, 16.

सिंह – परदेशगमनाची संधी
मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र राश्यांतर होत आहे. मनावर दडपण येईल. व्यवसायात भावनेच्या आहारी जाऊ नका. तुमचा आत्मविश्वास व उत्साह या जोरावर कठीण कामसुद्धा करून दाखवाल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल.
शुभ दिनांक – 17, 18.

कन्या – जुने वाद मिटतील
मेषेत सूर्य, मीनेत शुक्र राश्यांतर होत आहे. व्यवसायात नव्याने प्रयत्न करा. जुना वाद मिटवता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काही निर्णय तटस्थपणे घ्यावे लागतील. नोकरीत कामाच्या ठिकाणी लक्ष द्या. कोर्टाच्या कामात योग्य सल्ला घेऊनच बोला. तात्पुरता निर्णय लांबणीवर टाकता येईल.
शुभ दिनांक – 19, 20.

तूळ – मानसन्मान लाभेल
मेषेत सूर्य, मीनेत शुक्र राश्यांतर होत आहे. धंद्यात वाढ होईल. मागील येणे वसूल करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला मानसन्मान मिळेल. तुमच्यावर जबाबदारी टाकली जाईल. परदेशात जाण्याचा योग येईल. जवळचे लोक स्पर्धा करतील.
शुभ दिनांक – 15, 16.

वृश्चिक – नोकरीत बदल होतील
मेषेत सूर्य, मीनेत शुक्र राश्यांतर तुम्हाला आव्हान देणारे असेल. व्यवसायात वाढ होईल. लोकांचे सहकार्य मोलाचे ठरेल. नोकरीत अचानक बदल होण्याची शक्यता  आहे. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात तुमच्या यशावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता.
शुभ दिनांक – 14, 17.

धनु – विचारांना चालना मिळेल
मेषेत सूर्य, मीनेत शुक्र राश्यांतर. दर्जेदार लोकांचा सहवास मिळेल. विचारांना चालना देणारी घटना घडेल. व्यवसायात मागे राहू नका. कुणीतरी मदत करील यावर थांबू नका. स्वतःचे कष्ट, बुद्धी यांचा वापर करा. ग्रहांची चांगली साथ आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. दौऱयात यश मिळेल.              शुभ दिनांक – 15, 19.

मकर – प्रगतीची संधी लाभेल
मेषेत सूर्य, मीनेत शुक्र राश्यांतर. आठवडय़ाच्या सुरुवातीला मनावर ताण येईल. राजकीय, सामाजिक कार्यावर टीका होईल. तुमच्या प्रतिष्ठsचा वापर चांगल्या कामासाठी कराल. लोकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याचे भान ठेवल्यामुळे लोकांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल.
शुभ दिनांक – 17, 18.

कुंभ – योजना मार्गी लागेल
मेषेत सूर्य, मीनेत उच्चीचा शुक्र राश्यांतर होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, तुमच्या कार्याला चार चाँद लागतील. त्याबरोबर लोकप्रियतेत वाढ होईल. आर्थिक सहाय्य मिळेल. ठरविलेली योजना पद्धतशीररितीने मार्गी लावता येईल. उद्योग-धंद्याला व्यापक स्वरूप देता येईल. कोर्ट केस संपवा.
शुभ दिनांक- 19, 20.

मीन – आत्मविश्वास वाढेल
मेषेत उच्चीचा सूर्य, मीनेत उच्चीचा शुक्र राश्यांतर होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. उत्साह व आत्मविश्वास यांचे योग्य गणित मांडा, प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर वाटचाल करताना अडथळे येतील. गैरसमज होण्याची शक्यता आहे. सहनशीलता ठेवा.
शुभ दिनांक – 14, 18.