भविष्य रविवार १७ ते शनिवार २३ डिसेंबर २०१७

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रतिष्ठा मिळेल
तुमचा व्यवसायातील अंदाज बरोबर येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पूर्वी झालेल्या चुका सुधारता येतील. नव्या पद्धतीचा विचार करून अधिक प्रभावी डावपेच टाका. प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळेल. किरकोळ चिंता होईल. प्रकृतीची काळजी घ्या. नाटय़, चित्रपट क्षेत्रात प्रगतीची मोठी संधी मिळेल. शुभ दिन – २१, २२

वृषभ – खर्चावर नियंत्रण ठेवा
महत्त्वाची कामे करा. थोरामोठय़ांची मदत मिळेल. व्यवसायात वाढ करा. चौफेर लक्ष ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबात गैरसमज होईल. कोर्ट केसमध्ये अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. नाटय़, चित्रपट क्षेत्रात वेळ कमी पडेल. शुभ दिन – १७,२१

मिथुन – परदेशात जाण्याचा योग
या सप्ताहात मनावर दडपण राहील, परंतु प्रगतीची संधी तुम्हाला तुमच्या कार्यात मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आर्थिक समस्या येऊ शकते. मानसन्मानात मात्र वाढ होईल. सर्वच ठिकाणी उत्साहवर्धक घटना घडतील. परदेशात जाण्याचा योग येईल. कोर्टाच्या कामात लक्ष घाला, मुद्देसूद विवेचन तयार करता येईल. शुभ दिन – १९,२०

कर्क – कामाचा ताण वाढेल
राजकीय-सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध घटना घडेल. तुमचा संताप अनावर होईल. कुटुंबात समस्या येईल. वाटाघाटीचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. राहत्या घरासंबंधी विचार कराल. कोणतीही मोठी खरेदी करताना सावध राहा. नोकरीत कामाचा ताण वाढेल. तुमच्या विरोधात वरिष्ठांच्या मनात किल्मिष तयार करण्याचा प्रयत्न होईल. शुभ दिन – १७,२१

सिंह – घाई करू नका
रेंगाळत असलेल्या प्रश्नावर उपाय शोधता येईल. अडचणींवर मात करू शकाल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर झालेले आरोप दूर करण्याची संधी मिळेल. कोणतीही घाई नको. लोकांच्या प्रश्नांवर उत्तरे शोधा. योजनांनुसार कार्य करा. व्यवसायात सुधारणा होईल. आर्थिक लाभ होईल. शुभ दिन – १९, २०

कन्या -नवे कंत्राट मिळेल
तुम्ही ठरविलेल्या कार्याला अचानक कलाटणी मिळेल. अस्वस्थ व्हाल. कदाचित कार्याची दिशा बदलावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची जिद्द ठेवा. तुमच्या मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न होईल. व्यवसायात नवे कंत्राट मिळेल त्यावर लक्ष द्या. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. शुभ दिन – १७, २१

तूळ – धंद्यात जम बसेल
प्रगतीची घोडदौड चौफेर होणार आहे. त्यामुळे मागे राहू नका. धंद्यात जम बसेल. मोठे कंत्राट मिळेल. प्रयत्न करा. नोकरीत मनाप्रमाणे चांगला बदल करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकारप्राप्ती होईल. मोठी जबाबदारी पूर्ण करू शकाल. अविवाहितांना लग्नासाठी योग जुळून येईल. शुभ दिन – १९, २०

वृश्चिक – अडचणींवर मात कराल
मनावरील दडपण कमी होईल. अडचणीवर मात करता येईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव असला तरी प्रतिष्ठा जाणार नाही. तुमचा राग वाढेल असे कृत्य विरोधक करतील. तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. त्यामुळे अधिक चांगले यश तुमच्या कार्यात मिळेल. शुभ दिन – २१, २२

धनु- वरिष्ठांचे सहकार्य मिळेल
पुढाकार घेऊन तुम्हालाच प्रश्न सोडवण्याची वेळ येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच टाकता आल्याने उत्साह वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात झालेल्या चुका सुधारता येतील. कामगारांना सुविधा देताना व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. तटस्थ राहून परिस्थितीचा अभ्यास करा म्हणजे अधिक प्रगती होईल. शुभ दिन – २२, २३

मकर – संयम बाळगा
कुटुंबात समस्या निर्माण होईल. जवळच्या माणसाची चिंता वाटेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. जवळचेच लोक अपप्रचार करतील. तरीही संयम बाळगा. आपल्या चुका सुधारून केवळ ध्येयावर लक्ष ठेवा. प्रतिष्ठा पणाला लावल्यास मनस्ताप जास्त होईल. शुभ दिन – २२, २३

कुंभ – पुरस्कार लाभतील
तुम्ही घेतलेला निर्णय धाडसी ठरेल. तुमचे कौतुक होईल. तुम्ही केलेले सहकार्य व दिलेले मुद्दे प्रभावी ठरल्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. स्वतःचा लोकसंग्रह तयार करा. नाटय़, चित्रपट क्षेत्रात पुरस्कार लाभतील. तुमच्या प्रगतीवर फारसा परिणाम होणार नाही. मुलांच्या प्रगतीसाठी चांगला निर्णय घ्याल. शुभ दिन – १७, १९

मीन – लाभ होईल
या आठवडय़ात अडचणीत आलेली कामे पूर्ण करता येतील. प्रत्येक दिवस यशाचा ठरू शकतो. तुम्ही जिद्द ठेवा. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुमच्याकडे मदतीसाठी येतील. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. लॉटरीचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ दिन – १९, २०

आपली प्रतिक्रिया द्या