वाचा येत्या आठवड्याचे भविष्य

45

>> नीलिमा प्रधान

मेष – सतर्क राहा

राजकीय क्षेत्रात चौफेर विचार करून डावपेच तयार करा. सामाजिक क्षेत्रात तुमचे नाव भलत्याच प्रकरणात जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व परिस्थितीवर खंबीरपणे मार्ग शोधता येईल. व्यवसायात दुर्लक्ष नको. उतावळेपणा नको. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कोर्टाच्या कामात योग्य सल्ला घ्या.
शुभ दि. – २, ३

वृषभ – महत्त्वाच्या कामाला गती द्या
कौटुंबिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनाची अस्थिरता वाढेल. राजकीय क्षेत्रातील महत्त्वाची कामे करून घ्या. वरिष्ठांची मर्जी राखता येईल. सामाजिक कार्याला गती द्या. वादाकडे दुर्लक्ष करा. प्रवासात सावध राहा. नोकरीत वर्चस्व तयार करा. कला, क्रीडा क्षेत्रात परिश्रमाला न्याय मिळेल.
शुभ दि. – ४, ५

मिथुन – संशोधनकार्यात यश मिळेल
क्षेत्र कोणतेही असो तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व व बुद्धिचातुर्य याचा प्रभाव वाढेल. संशोधन कार्यात विशेष यश मिळेल. राजकीय क्षेत्रात अधिकाराचा योग्य वापर करा. सामाजिक कार्यात मानप्रतिष्ठा मिळेल. लोकोपयोगी योजना मार्गी लावा. कौटुंबिक समस्येवर धाडसी निर्णय घ्याल. व्यवसायात जम बसेल.
शुभ दि.- २, ३

कर्क – प्रगतीची संधी मिळेल
तुमचे मानसिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न राजकीय क्षेत्रात होईल. स्वभावाबद्दल गैरसमज पसरवला जाईल. सामाजिक कार्यासाठी यश व पैसा मिळविता येईल. व्यवसायात योग्य पद्धतीने तुमचे विचार मांडा. व्यवसायात सुधारणा होईल. कलावंतांना प्रगतीची संधी मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल.
शुभ दि. – १, ३

सिंह – वादविवाद संभवतील
राजकीय क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी असले तरी वरिष्ठ त्यावर मत व्यक्त करणार नाहीत. सामाजिक कार्यात आर्थिक व्यवहारावरून वाद संभवतो. व्यवसायात ठोस निर्णय घेणे कठीण होईल. वाटाघाटीत कटकटी निर्माण होतील.
शुभ दि. – २, ३

कन्या – व्यवसायाला दिशा मिळेल
या आठवडय़ात सर्व महत्त्वाची कामे करा. राजकीय क्षेत्रातील चर्चा करा. प्रत्येक दिवस यशाचा ठरू शकतो. किरकोळ तणावाला जास्त महत्त्व देऊ नका. सामाजिक कार्याचा वेग वाढवा. व्यवसायाला दिशा मिळेल. कोर्टकेससंबंधी कामे करून घ्या. नवीन परिचय झालेल्या व्यक्तीवर मोजकाच विश्वास टाका.
शुभ दि. – ३, ४

तूळ – संयम बाळगा
जमिनीसंबंधी कामात निर्णय घेण्याची वेळ येईल. राजकीय क्षेत्रात दुसऱयांना मदत करावी लागेल. स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष होईल. सामाजिक कार्यात तुमच्या कामाशी स्पर्धा वाढेल. धंद्यात गोड बोलूनच तुमचा मुद्दा पटवून द्या. इतरांची नाराजी सहन करावी लागेल. कोर्टाच्या कामात संयम ठेवा.
शुभ दि. – ४, ५

वृश्चिक – रागावर नियंत्रण ठेवा
राजकीय क्षेत्रातील प्रकरणाने तुमच्या विरोधात हल्लाबोल होईल. सामाजिक कार्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ देऊ नका. महत्त्वाची कामे लवकर करून घ्या. व्यवसायात संतापावर नियंत्रण ठेवा. तुमच्या निर्णयावर टीका होईल. कुटुंबातील तणावाचे दडपण राहील.
शुभ दि. – ६, ७

धनु – व्यवसायाकडे लक्ष द्या!
साडेसाती सुरू आहे. धावपळ व दगदग करण्यामुळे मनःशांती कमीच मिळेल. राजकीय क्षेत्रात तुमचा मुद्दा बरोबर असूनही टीका होईल. सामाजिक कार्यात वरिष्ठांच्या दबावानुसार निर्णय घ्यावा लागेल. अनेक चांगले विचार व योजना तुमच्याकडे आहेत त्याची अंमलबजावणी करा. व्यवसायात दुर्लक्ष नको.
शुभ दि. – १, २

मकर – मनोबल राखा
आठवडय़ाच्या सुरुवातीलाच महत्त्वाची कामे करा. राजकीय क्षेत्रात तुमच्या विरोधात एखादे प्रकरण जाण्याची शक्यता आहे. तुमच्या आक्रमक कृतीवर टीका होईल. सामाजिक बांधिलकीची जाण तुमच्याकडे आहे. लोकांच्या गरजा ओळखून कार्य सुरू करा. व्यवसायाला चांगले वळण मिळेल. कलाक्षेत्रात यश मिळेल.
शुभ दि. – १, ३

कुंभ – कार्याला दिशा मिळेल
राजकीय क्षेत्रात तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळेल. तुमचे मुद्दे सामाजिक क्षेत्रात प्रभावी ठरतील. लोकप्रियतेत वाढ होईल. दूरदृष्टीकोनातून स्वतःच्या कर्तृत्वाचा विकास कसा करून घेता येईल याचा विचार करा. सर्व सूत्रे तुमच्याकडे येऊ शकतात. व्यवसायात प्रगती होईल.
शुभ दि. – ३, ४

मीन – प्रतिष्ठा जपा
आठवडय़ाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा. अधिकार व अहंकाराचा वापर करू नका. राजकीय क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा टिकविण्याचा प्रयत्न करा. सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचा विचार होईल. व्यवहाराला महत्त्व असते. कुटुंबातील चिंता कमी होईल.
शुभ दि. ः ४, ५

आपली प्रतिक्रिया द्या