आठवड्याचे भविष्य ( रविवार १ ते शनिवार ७ जुलै २०१८)

189

>> नीलिमा प्रधान

मेष – व्यवसायात किरकोळ वाद
मेषच्या पंचमेषात शुक्र प्रवेश व सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठत लोकांना एकत्रित करण्यात यश मिळेल. गुरुवार, शुक्रवार तुमच्या वैयक्तिक गोष्टीवर टीका करण्याचा प्रयत्न होईल. दुर्लक्ष करा. व्यवसायात किरकोळ वाद वाढू शकतो. कुटुंबात मनस्ताप होईल. शुभ दि. २, ३

वृषभ – उद्दिष्टपूर्तीसाठी कष्ट घ्या
वृषभेच्या सुखेषात शुक्र प्रवेश व चंद्र-बुध त्रिकोण योग होत आहे. या आठवडय़ात तुमच्या पद्धतीने तुमची महत्त्वाची कामे करा. संधी नेहमी कमी वेळा असते. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा सांभाळता येईल. उद्दिष्टपूर्तीसाठी कष्ट घ्या. भविष्यात त्याचा उपयोग करून घेता येईल. कला-क्रिडाक्षेत्रांत प्रभाव वाढेल. शुभ दि. १, २

मिथुन – लोकप्रियता वाढेल
आठवडय़ाच्या सुरुवातीला अडचणी आल्या तरी नंतर मात्र तुमच्या मनाप्रमाणे कार्य करून त्यात यश मिळवता येईल. मिथुनेच्या पराक्रमात शुक्र प्रवेश व बुध मंगळ प्रतियुती होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत धाडसी निर्णय घेण्याची वेळ येईल. तुमची लोकप्रियता व प्रतिष्ठा त्यामुळेच वाढेल. शुभ दि. ३,४

कर्क – रागावर नियंत्रण ठेवा
सिंह राशीत शुक्र प्रवेश व शुक्र-प्लुटो षडाष्टक योग होत आहे. सोमवार, मंगळवार तणाव व मानसिक दडपण येईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कोर्टकचेरीच्या कामात अडचणी वाढतील. बुद्धिमत्ता वापरून उत्तरे द्या. रागावर नियंत्रण ठेवा. कामाचे श्रेय मनाप्रमाणे तुम्हाला मिळणे कठीण आहे. शुभ दि. ५,६

सिंह – कुटुंबात मतभेद
स्वराशीत शुक्र प्रवेश व सूर्य-गुरू त्रिकोण योग होत आहे. व्यवसायात अचानक समस्या येऊ शकते. कामगार वर्गाबरोबर वाद वाढवू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत गुप्त कारवायांच्या द्वारे तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो. व्यवहारामुळे कुटुंबात मतभेद होतील. शुभ दि. ३, ४

कन्या- कोर्टकेसमध्ये सरशी
कन्या राशीच्या व्ययेषात शुक्र प्रवेश व सूर्य-गुरू त्रिकोण योग होत आहे. सोमवार, मंगळवार कुटुंबात नाराजी व वाद होईल. व्यवसायात मोठे कंत्राट याच आठवडय़ात मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कोर्टकेसमध्ये सरशी होईल. व्यवहारात भावनांना महत्त्व देण्याची चूक करू नका. शुभ दि. १, ५

तूळ – समस्यांचे धुके कमी होईल
तुळेच्या एकादशात शुक्र प्रवेश व सूर्य-चंद्र त्रिकोण योग होत आहे. व्यवसायाला कलाटणी मिळेल. नवा फंडा शोधता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत समस्यांचे धुके कमी होऊन प्रगतीचा प्रकाश दिसेल. वरिष्ठांच्या बरोबर एकमत होईल. लोकसंग्रह वाढवता येईल. गुरुवार, शुक्रवार रागावर ताबा ठेवा. शुभ दि. २, ३

वृश्चिक – विघ्नसंतोषी त्रास देतील
वृश्चिकेच्या दशमेषात शुक्र प्रवेश व बुध, मंगळ प्रतियुती होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मार्ग सरळ दिसत असला तरी विघ्नसंतोषी लोक तुम्हाला त्रस्त करण्याचा प्रयत्न करतील. क्षेत्र कोणतेही असो तुम्ही तुमची सभ्यता सोडू नका. युक्ती व गोडबोलणे यावरच जग जिंकता येते. शुभ दि. १, ५

धनु – खाण्यापिण्याची काळजी घ्या
धनु राशीच्या भाग्येषात शुक्राचे राश्यांतर व बुध-शनी षडाष्टक योग होत आहे. तुम्ही कुणाचाही वचपा काढण्यात वेळ घालवत नाही. परंतु निष्कारण तुम्हाला कुणी आव्हान देऊ नये. महत्त्वाचे काम याच आठवडय़ात करून घ्या. कला, क्रीडा क्षेत्रांत खंबीर राहा. स्वतःच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. शुभ दि. ३, ४

मकर – मनाची खंबीरता ठेवा
मकरेच्या अष्टमेषात शुक्र प्रवेश , चुंद्र-गुरू त्रिकोण योग होत आहे. मनाची खंबीरता तुमचा उत्साह कायम ठेवील. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमचे महत्त्व कमी करण्याचाच प्रयत्न शत्रू करील. मात्र राग काढण्याची व दाखवण्याची ही वेळ नाही. पुढे संधी मिळेल. प्रतिष्ठा पणाला लावून काम होईल असे नाही. शुभ दि. ३, ४

कुंभ – चर्चा सफल होतील
कुंभेच्या सप्तमेषात शुक्र प्रवेश व सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. व्यवसायात वाढ होईल. परंतु तात्त्विक मतभेद होतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल उचलता येईल. दर्जेदार लोकांच्या बरोबर चर्चा सफल होईल. कौटुंबिक चिंता कमी होईल. नोकरी लागेल. प्रवासात घाई करू नका. शुभ दि. ५, ६

मीन – कणखरपणाच उपयोगी पडेल
मीनेच्या षष्ठस्थानात शुक्र प्रवेश. चंद्र-बुध त्रिकोण योग होत आहे. व्यवसायात अडचणीवर मात करू शकाल. कुटुंबात वाटाघाटीत तणाव होईल. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमच्याबद्दल गैरसमज वाढेल. कार्यावर त्याचा परिणाम होऊ देऊ नका. कणखरपणाच उपयोगी पडेल. शुभ दि. ६, ७

आपली प्रतिक्रिया द्या