आठवड्याचे भविष्य – 21 एप्रिल ते 27 एप्रिल 2019

>> नीलिमा प्रधान

मेष – ताणतणाव उद्भवतील
मेषेच्या अष्टमात गुरू 22 एप्रिल रोजी वक्री होत आहे. सूर्य-हर्षल युती होत आहे. कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण होईल. राजकीय क्षेत्रात कलाटणी देणारी घटना घडेल. सामाजिक क्षेत्रात लोकांची नाराजी स्पष्टपणे दिसेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत जवळचे लोक गैरसमज तयार करतील. शुभ दि. 24, 25

वृषभ – ध्येयाकडे लक्ष द्या!
वृषभेच्या सप्तमेषात गुरू ग्रह वक्री होत आहे. गुरुबल सुरू राहील. चंद्र – शुक्र त्रिकोणयोग गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. वाटाघाटीत यश मिळविता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमच्यावर टीका होईल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत कौतुक होईल. स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष द्या. शुभ दि. 26, 27

मिथुन – गैरसमज दूर ठेवा!
मिथुनेच्या षष्ठsषात गुरू वक्री म्हणजे वृश्चिकेत येत आहे. या सप्ताहात गैरसमज होण्याची शक्यता जास्त आहे. कुटुंबातील कामे वाढतील. प्रश्न सोडवताना तारेवरची कसरत करावी लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत कस लागेल. व्यवसायात वाढ होईल. नोकरीत जबाबदारी वाढेल. शुभ दि. 24, 25

कर्क – नवे बदल होतील
कर्केच्या पंचमेषात गुरू वक्री होत आहे. सूर्य – हर्षल युती होत आहे. अडचणीत आलेली कामे करून घ्या. कुटुंबातील तणाव कमी होईल. वाटाघाटीचा प्रश्न मार्गी लावा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत नव्याने स्थान निर्माण करा. जनहित साधा. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. कर्तृत्व उजळेल. शुभ दि. 26, 27

सिंह – मनोबल राखा
वृश्चिक राशीत गुरू महाराज वक्री होत आहेत. सूर्य – हर्षल युती होत आहे. मानसिक दडपण चोहोबाजूने येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत सुरळीत चाललेल्या कार्यात अडचणी निर्माण होतील. प्रतिष्ठा सांभाळा. व्यवसायात संबंध बिघडण्याची शक्यता. सहनशीलता ठेवावी लागेल. दुरावा येईल. शुभ दि. 24, 25

कन्या – सावध रहा
कन्या राशीत पराक्रमात म्हणजे वृश्चिकेत गुरू वक्री होत आहे. चंद्र – शुक्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळविण्याचा प्रयत्न होईल. प्रत्येक दिवस तुम्ही यशस्वी करू शकाल. कोणतेही धाडसी विधान करताना सावध रहा. नाटय़-चित्रपट क्षेत्रांत मैत्री वाढेल. लोकप्रियता जपा. शुभ दि. 23, 26

तूळ – व्यवहारात संतुलन राखा
व़ृश्चिक राशीत गुरू वक्री, सूर्य – हर्षल युती होत आहे. व्यवसायात छोटय़ा अडचणी येतील. त्याला जिद्दीने तोंड देता येईल. मैत्रीत गैरसमज होऊ शकतो. भावना व व्यवहार यांमध्ये गल्लत करू नका. राजकीय क्षेत्रात विचार प्रभावशाली ठरतील. कुणालाही कमी लेखू नका. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. शुभ दि. 23, 25

वृश्चिक – सकारात्मक काळ
स्वराशीत गुरू वक्री 22 एप्रिल रोजी होत आहे. चंद्र – शुक्र त्रिकोणयोग. तुमच्या प्रत्येक कार्याला नव्याने उजाळा देता येईल. व्यवसायात चांगले यश येईल. प्रत्येक दिवस यशस्वी ठरेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत पाऊल प्रगतीकडेच पडेल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. कलाक्षेत्रांत पराक्रम गाजवाल. शुभ दि. 24, 25

धनु – महत्त्वाच्या कार्याला गती
धनु राशीतून 22 एप्रिल रोजी गुरू वृश्चिकेत वक्री होत आहे. सूर्य – चंद्र त्रिकोणयोग होत आहे. रविवार, सोमवार मानसिक तणाव होईल. व्यवसायात सावधपणे निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुम्ही वरिष्ठांच्या बरोबर राहाल. महत्त्वाचा निर्णय, नोकरीत कामाचा व्याप वाढेल. जिद्दीने प्रगती कराल. शुभ दि. 26, 27

मकर – प्रसंगानुसार निर्णय घ्या!
वृश्चिक राशीत गुरूमहाराज वक्री, चद्र – शुक्र त्रिकोणयोग होत आहे. गुरुबल पुन्हा मिळेल. कोणत्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे हे ठरवता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत बदलणारे डावपेच तुम्हाला न पटणारे असतील. व्यवसायातील तणाव लवकर संपवा. नवे कंत्राट घ्या. कोर्टाच्या कामात सुधारणा होईल. शुभ दि. 26, 27

कुंभ – शेअर्समध्ये लाभ
वृश्चिकेत गुरू वक्री, सूर्य – चंद्र त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या प्रगतीचा रथ वेगाने धावणार आहे. आठवडय़ाच्या शेवटी तणावाचा प्रसंग निर्माण होईल. वास्तू, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत प्रसिद्धी लाभेल. प्रेरणा देणारी घटना घडेल. शुभ दि. 21, 23

मीन – प्रगतीचा आलेख उंचावेल
वृश्चिकेत गुरू वक्री, सूर्य हर्षल युती होत आहे. मनावरील दडपण कमी होईल. प्रगती करण्यासाठी प्रत्येक दिवस उपयोगी पडेल. व्यवसायात बदल होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिमा उजळेल. योजनांना गती मिळेल. पदाधिकार मिळेल. मोठय़ा लोकांचा परिचय फायदेशीर ठरेल. शुभ दि. 22, 26