भविष्य – रविवार २२ ते शनिवार २८ एप्रिल २०१८

47

>> नीलिमा प्रधान

मेष – सकारात्मक घटना घडतील
राजकीय क्षेत्रात गुप्त कारस्थाने तुमच्या विरोधात होतील. तुमची प्रतिष्ठा कायम राहील. तुमचे डावपेच टाकत राहा. सामाजिक कार्यातील उणिवा शोधून त्यावर शरसंधान साधण्याचा प्रयत्न होईल. कोर्टकेसमध्ये बेफिकिरीने बोलू नका. सकारात्मक घटना घडतील. पुरस्कार व आर्थिक लाभ मिळेल.
– शुभ. दि. २५, २६.

वृषभ- अहंकाराला दूर ठेवा
क्षेत्र कोणतेही असो, कुठेही अचानक स्फोटक घटना घडू शकते. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांच्या बरोबर मतभेद राहतील. सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येईल. जमिनीसंबंधी कामात वाद होऊ शकतो. अतिमहत्त्वाकांक्षा व अहंकार ठेवल्यास त्रास व अडचणी वाढतील.
शुभ. दि. २३, २४.

मिथुन – परदेशी जाण्याची संधी
तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या योजना पूर्ण करा. सामाजिक कार्याचा विस्तार करून लोकोपयोगी काम करून घेता येईल. व्यवसायाला कलाटणी मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. नोकरीत बदल करता येईल. कोर्टकेसमध्ये यश मिळेल.
शुभ दि. २३, २४.

कर्क – वर्चस्व सिद्ध होईल
संघर्ष असला तरी या आठवडय़ात तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ तुमचे विचार ऐकून घेतील. राजकीय क्षेत्रात वर्चस्व सिद्ध करू शकाल. प्रेरणादायी विचार सर्वांना पटतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कला, क्रीडा क्षेत्रात वातावरण पोषक राहील.
शुभ दि. २५,२६.

सिंह – नव्या योजना आखा
मंगळवारपासून मात्र तुमच्या प्रगतीचा रथ चौफेर धावणार आहे. राजकीय क्षेत्रात डावपेच तयार करा. नव्या योजना बनवा. कार्याची आखणी करून सामाजिक कार्याला जोर लावा. वेळ कमी व कामे जास्त असे होईल. नोकरी मिळेल. करार करताना व्यवहारिक धोरण बघा.
शुभ दिन २७, २८.

कन्या – नियोजनबद्ध रहा
स्पष्टवक्तेपणा नेहमीच उपयोगी पडत नाही. तुम्ही राजकीय क्षेत्रात परीक्षण व निरीक्षण करा. तुमचे विचार तयार करा. कोणत्या क्षणी कार्याला आरंभ करावयाचा त्याची वाट पाहा. थोडा विलंब झाला तरी तुमचे महत्त्व टिकणे महत्त्वाचे आहे. तुम्ही संयम ठेवा. नियोजनबद्ध रहा.
शुभ दि. २२, २३.

तूळ – मैत्रीमध्ये गैरसमज
बंधू-भगिनी तुमच्या सुखाचा हेवा करतील. वाटाघाटींमध्ये किरकोळ तणाव होईल. राजकीय क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. वरिष्ठांना तुमच्या कार्याची किंमत कळेल. मैत्रीमध्ये आठवडय़ाच्या शेवटी गैरसमज होण्याची शक्यता आहे. दूरचा प्रवास करण्याचे ठरवाल.
शुभ दि. २३, २४.
वृश्चिक – प्रसंगाचे भान ठेवा
योग्य वडीलधाऱया व्यक्तींचा सल्ला घेऊन तुम्ही तुमचे कार्य करा. राजकीय क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा कमी होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी कार्य करताना वेळ, प्रसंगाचे भान ठेवा. कला, क्रीडा क्षेत्रात गोड बोलून तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
शुभ दि. २३,२४.

धनु – ताणतणाव जाणवतील
आठवडय़ाच्या सुरुवातीला इतरांच्या मर्जीनुसार व त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. प्रकृतीवर ताण पडेल. राजकीय क्षेत्रात सारखे तणावाचे प्रसंग आल्याने तुम्ही त्रस्त आहात. तरीही प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक कार्याला गती मिळेल. व्यवसायात स्वतःच्या हिमतीवर काम करा.
शुभ दि. २५, २६.

मकर – मनोबल राखा
व्यवसायाला कलाटणी मिळेल. नवे भागीदार मिळतील. राजकीय क्षेत्रात तुमच्या कार्यावर हल्लाबोल होईल. मनस्ताप वाढवणारी घटना घडेल. मनोबल राखा. आर्थिक सहाय्य लाभेल. घर, वाहन, दुकान, जमीनसंबंधी ताबा लवकर घ्या. कोर्टकेसमध्ये सुवर्णमध्य निघू शकतो. प्रयत्न करा.
शुभ दि. २३, २७

कुंभ – योजनेचा पाठपुरावा करा.
स्पष्टपणाने तुमचे विचार वरिष्ठांच्या समोर मांडण्याची वेळ राजकीय क्षेत्रात तुमच्यावर येईल. वाईटपणा स्वीकारावा लागेल, परंतु विरोधकांना कोणतीही संधी देणे हितावह नाही. कला, क्रीडा क्षेत्रात दर्जेदार प्रतिष्ठाrत लोकांचा सहवास मिळू शकेल. तुमच्या योजनेचा पाठपुरावा करा.
शुभ दि. २५,२६.

आपली प्रतिक्रिया द्या