भविष्य – रविवार २५ ते शनिवार ३१ मार्च २०१८

62

>> नीलिमा प्रधान

मेष – जबाबदारी वाढेल
स्वराशीत शुक्र प्रवेश व शुक्र-हर्षल युती तुमच्या राजकीय रणनीतीला वेगळेच वळण देईल. सामाजिक कार्याचा विस्तार करण्यासाठी अडचणीवर मात करावी लागेल. व्यवसायात पटकन निर्णय बदलण्याची घाई करू नका. नव्या क्षेत्रातील आव्हान आणि जबाबदाऱ्या वाढतील. शुभ दि. २५, २९

वृषभ – योजना मार्गी लागतील
महत्त्वाची कामे करण्यास विलंब करू नका. धंद्यातील समस्या कमी करण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रात मेहनत घेऊन तुमची प्रतिष्ठा वाचवता येईल. सामाजिक क्षेत्रात लोकांचा विश्वास संपादन करता येईल. तुमच्या योजना मार्गी लावता येतील. कोर्टकचेरीच्या कामात सहाय्य मिळू शकेल. शुभ दि. २५, २७

मिथुन – परदेशवारीचा योग
ग्रहांची साथ असते तेव्हा प्रयत्नांना लवकर यश येते. रेंगाळत राहिलेली कामे पूर्ण करा. राजकीय क्षेत्रात अधिकार मिळेल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. लोकप्रियतेत भर पडेल. नोकरीत चांगला बदल होईल. परदेशात कंपनीद्वारे जाण्याचा योग येईल. प्रत्येक दिवस प्रगतीकारक आहे. थांबू नका. शुभ दि. २७, २८

कर्क – आर्थिक सहाय्य मिळेल
मनाची अस्थिरता वाढेल, परंतु आत्मविश्वासाने निर्णय घेता येईल. राजकीय क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. सामाजिक कार्यात आर्थिक सहाय्य व लोकांची मदत मिळेल. कोर्टकचेरीच्या कामात दिलासा मिळेल. व्यवसायात मोठे काम मिळेल. थोरामोठय़ांचा सहवास मिळेल. शुभ दि. २९, ३०

सिंह – अचूक निर्णय घ्या
राजकीय क्षेत्रातील वातावरणाचा परिणाम तुमच्या निर्णयावर होऊ शकतो. सामाजिक कार्यात मनावर दडपण येईल. लोकांच्या मनात तुमच्याबद्दल थोडा संभ्रम राहील. प्रयत्नाने सर्व प्रश्नावर उपाय मिळेल. कोर्टकेस व व्यवसायात अडचणी वाढतील. कुटुंबात निर्णय घेताना होणे थोडे कठीण वाटेल. शुभ दि. ३०, ३१

कन्या – जबाबदारीने प्रश्न सोडवा
तुमच्या जवळच्या व्यक्ती एखाद्या प्रकरणाने नाराज होण्याची शक्यता आहे. कुटुंबात तुम्हाला जबाबदारीने प्रश्न सोडवावा लागेल. राजकीय क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा राहील. विरोधक कुरुबुरी करण्याचा प्रयत्न करतील. सामाजिक कार्यात योजनांना चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवहाराच्या गोष्टी करताना सावध रहा. शुभ दि. २५, २६

तूळ – मनस्ताप संभवतो
मनावरील दडपण कमी होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. राजकीय क्षेत्रात कोणताही निर्णय घेताना सर्वांच्या सहमतीनेच घ्या. वरिष्ठ तुमच्यावर जबाबदारी टाकतील. सामाजिक कार्यात मनस्ताप होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नम्रता ठेवा, परंतु व्यवहारी राहा. अपयशाने खचू नका. शुभ दि. २८, २९

वृश्चिक – कामाचा वेग वाढवा
या आठवडय़ात महत्त्वाची कामे वेगाने करून घेता येतील. वेळ फुकट घालवू नका. एखादा निर्णय तुमच्या मनाविरुद्ध होऊ शकतो. राजकीय क्षेत्रात वर्चस्व राहील. तुमचे मुद्दे लोकांना आकर्षित करतील. सामाजिक बांधिलकी दिसेल. स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. शुभ दि. ३०, ३१

धनु – ताण जाणवेल
सप्ताहाच्या सुरुवातीला मानसिक व शारीरिक ताण राहील. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रयत्नपूर्वक योजना मार्गी लावता येतील. तुमचा आत्मविश्वास फार महत्त्वाचा ठरणार आहे. वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न केल्यास चांगलेच यश मिळेल. मनाची अस्थिरता वाढू देऊ नका. शुभ दि. २८, २९

मकर – कामाचे कौतुक होईल
राजकीय क्षेत्रात तुमच्या कार्याचा गवगवा होईल. सप्ताहाच्या मध्यावर एखादा निर्णय व्यवहाराला धरून नसल्याने वाद, तणाव होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात तुमचे तत्त्व कौतुकास्पद ठरेल. लोकांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील लोकांच्या इच्छेनुसार वागावे लागेल. व्यवसायाला चांगली कलाटणी मिळेल. शुभ दि. २६, २७

कुंभ – सकारात्मक कालावधी
तुमच्या कल्पना कृत्रिम उतरवण्याची संधी सोडू नका. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या लोकांबरोबर चर्चा करून नव्या तंत्राची, डावपेचांची आखणी करा. सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा लागेल. तुमच्या कार्याचे कौतुक होईल. सप्ताहाच्या शेवटी गुप्त कारवाया डोके वर काढतील. शुभ दि. २८, २९

मीन – संधीचा लाभ घ्या
तुमच्या क्षेत्रातील बऱयाच अडचणी कमी होतील. संधी पाहून नम्रतेने प्रश्न सोडवा. आर्थिक सहाय्य सामाजिक कार्यास मिळू शकेल. राजकीय क्षेत्रात मिळालेले पद टिकवण्याची जिद्द ठेवा. लोकांचे प्रेम मिळवण्यात यश मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात तुमचे वर्चस्व दिसेल. शुभ दि. २६, २७

आपली प्रतिक्रिया द्या