भविष्य – रविवार २९ ते शनिवार ५ मे २०१८

56

>> नीलिमा प्रधान

मेष – आर्थिक सहाय्य लाभेल
राजकीय, सामाजिक कार्याचा अंदाज बरोबर घेता येईल. नव्या पद्धतीने डावपेच टाकता येतील. उत्साह वाढेल. व्यवसायाला नवा फंडा देणारे लोक भेटतील. गुंतवणूक वाढेल. आर्थिक सहाय्य मिळेल. कोर्ट केसमध्ये प्रश्न मिटविण्याचा जास्त प्रयत्न करा. कला, क्रीडा क्षेत्रांत वर्चस्व दिसेल. शुभ दिनांक -२९, ३०

वृषभ – संघर्षावर मात कराल
सामाजिक कार्यात तुमचा संयमीपणा व धूर्तपणा उपयोगी येईल. आत्मविश्वासात भर पडेल. अडचणी कमी होतील. संघर्ष संपलेला नाही. कुटुंबातील तणाव कमी करण्याची संधी सोडू नका. तडजोड करून प्रश्न मिटवा. नोकरीत वरिष्ठांचा रोख पाहूनच तुमचे मत व्यक्त करा. शुभ दिनांक – १, २

मिथुन- वर्चस्व सिद्ध होईल
महत्त्वपूर्ण कामे व चर्चा याच आठवडय़ात पूर्ण करा. तुमचे वर्चस्व राहील. राजकीय क्षेत्रात तुमचा अधिकार वाढेल. तुमची मते सर्वांना पटवून देता येतील. कुटुंबात वादळ होईल. व्यवसायात खर्च झाला तरी नफा करून घेता येईल. नोकरीत जबाबदारी पूर्ण होईल. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. शुभ दिनांक – २९, ३०

कर्क – नावलौकिक मिळेल
तुमच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी तुमच्याकडून होईल. नावलौकिक मिळेल. दर्जेदार लोकांचा परिचय होईल. सहवास मिळेल. विचारांना चालना मिळेल. कला क्षेत्रात कल्पनेपेक्षा अधिक यश मिळेल. राजकीय क्षेत्रात योजना वेगाने पुढे नेता येतील. सामाािज्क प्रतिष्ठा मिळेल.कायारंभ होईल. शुभ दिनांक – १, २

सिंह – सामाजिक कार्य होईल
विरोधकांना नमते धोरण घेऊन तुमचे काम करावे लागेल. राजकीय क्षेत्रात तुमच्या सहाय्याची गरज मित्रपक्षाला वाटेल. सामाजिक कार्यात तुमचा ठसा उमटवा. अपेक्षेने लोक येतील. भाषण करताना काळजी घ्या. कोर्टकेसमध्ये बाजी माराल. कला, क्रीडा क्षेत्रांत लोकप्रियता मिळेल. शुभ दिनांक ः ३०, ४

कन्या – विचार मांडण्याची संधी
तुमचे परखड विचार मांडण्याची संधी तुम्हाला मिळेल. राजकीय क्षेत्रात कोणते डावपेच केव्हा टाकावयाचे याचे नीट गणित करा. सामाजिक कार्यात मागे राहू नका. लोकांचे आर्थिक सहाय्य होईल. व्यवसायात मोठे कंत्राट मिळेल. कोर्ट केसमध्ये विचारांची दिशा बदलावी लागेल. अहंकार नको. शुभ दिनांक ः ३०,१

तूळ – आत्मविश्वास वाढेल
यश, अपयशाचा विचार न करता काम करत राहणे केव्हाही मानसिक, शारीरिक हिताचे असते. तुमचा आत्मविश्वास व उत्साह वाढेल. जवळच्या माणसांना समजून घ्यावे लागेल. प्रवासात वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक कार्यांत वेळ प्रसंगानुरूप मत व्यक्त करा. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. शुभ दिनांक ः १, २

वृश्चिक – निर्णयात सावधगिरी बाळगा
आठवडय़ाच्या सुरुवातीला कामाचा गोंधळ होईल. विरोधक आक्रमक होतील. त्यामुळे राजकीय क्षेत्रात निर्णय घेताना काळजी घ्या. कामांची तत्परता ठेवा. सामाजिक कार्यात लोकांचे सहाय्य मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. व्यवसायात अंदाज घेणे कठीण होईल. नवे काम मिळेल. शुभ दिनांक ः ३,४

धनु- प्रसिद्धी लाभेल
व्यवसायात मोठे काम मिळेल व खर्चही वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमच्या प्रसिद्धीत वाढ होईल. वरिष्ठ तुमची बाजू घेतील. कुटुंबात तुमच्याकडून इतरांच्या अपेक्षा वाढतील. महत्त्वाची वस्तू सांभाळा. गैरसमज होईल, तणाव होईल. कुसपट काढून मन अस्थिर करण्याचा प्रयत्न होईल. मन शांत ठेवा. शुभ दिनांक ः २९, ३०

मकर- कार्याचे कौतुक होईल
या आठवडय़ात तुम्ही महत्त्वाची कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमचा संताप होईल. कुटुंबात वाटाघाटीचा प्रश्न निघेल. नोकरीत नवा बदल करण्याची संधी मिळेल. महत्त्वाकांक्षा वाढेल. तुमच्या कार्याचे कौतुक होईल. कोर्ट केसमध्ये मुद्देसूद बोलता येईल. जमीन, कला, क्रीडा क्षेत्रांत संघर्षातून यश मिळेल. शुभ दिनांक ः १, २

कुंभ – जबाबदारी स्वीकारावी लागेल
तुम्ही ठरविलेला कार्यक्रम व योजना पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाची चर्चा करून निर्णय घ्या. जबाबदारी पूर्णपणे स्वीकारावी लागेल. लोकांच्या प्रश्नांना न चिडता उत्तरे द्या. तुमचा प्रभाव वाढवण्याची संधी सोडू नका. व्यवसायात भागीदाराचे ऐकावे लागेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ दिनांक – ३०, १

मीन – कठीण कामे पूर्ण होतील
आठवडय़ाच्या सुरुवातीला धावपळ होण्याची शक्यता आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत मोठी कामगिरी पूर्ण करावी अशी वरिष्ठांची इच्छा असेल. लोकांच्या सहाय्याने कठीण कामे होतील. स्वतःचा प्रभाव वाढविण्याची एकही संधी सोडू नका. व्यवसायात जम बसेल. अधिकारांचा वापर कराल. शुभ दिनांक – १, ३

आपली प्रतिक्रिया द्या