भविष्य- रविवार 30 डिसेंबर 2018 ते शनिवार 5 जानेवारी 2019

>> नीलिमा प्रधान

मेष-आत्मविश्वास वाढेल
मेषेच्या भाग्येषात बुध, शुक्र अष्टमेषात प्रवेश. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धावपळ होईल. मनाप्रमाणे डावपेच टाकले व त्याला यश मिळाले यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायाला मोठय़ा लोकांचे सहकार्य मिळेल. प्रवासाला सावध राहा. कलाक्षेत्रात तुमची आक्रमकता फारच कौतुकास्पद ठरेल. शुभ दि. :- 1, 5.

वृषभ-करार सावधपणे करा; अहंकार नको
वृषभेच्या अष्टमेषात बुध, सप्तमेषात शुक्र प्रवेश. व्यवसायात सावधपणे करार करा. अहंकारी भाषा कुठेही वापरू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रात एक चांगली घटना तर एक तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे. कोणत्याही वादात समतोल राखून बोला. कोणतीही अतिशयोक्ती केल्यास गैरसमज वाढेल. शुभ दि.:- 2, 3.

मिथुन-गुंतवणुकीची संधी मिळेल
मिथुनेच्या सप्तमेषात बुध, षष्ठेषात शुक्र प्रवेश करीत आहे. राजकीय, सामाजिक कार्याचा नीट आढावा घ्या. दिग्गज लोकांच्या सल्ल्याने महत्त्वाचा निर्णय घ्या. व्यवसायात नव्या पद्धतीची गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. कोणताही मोह टाळण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक काळ. नोकरीत चांगला बदल होऊ शकेल. शुभ दि.:- 30, 31.

कर्क-चांगला बदल घडेल
कर्केच्या षष्ठsषात बुध व पंचमेषात शुक्र. सर्वच क्षेत्रात वेगळय़ाच प्रकारची उलाढाल होईल. सावध रहा. प्रतिष्ठा सांभाळा. व्यवसायात चांगला बदल होईल. नाटय़, चित्रपट, क्रीडा क्षेत्रात नवीन संधी मिळेल. तुमची कल्पना फारच आवडेल. कृती करण्यात किरकोळ अडचणी येतील. कोर्टकेसमध्ये घाईत नको.  शुभ दि.:- 30, 31.

सिंह-नवीन ओळखी होतील
सिंहेच्या पंचमेषात बुध, सुखेषात शुक्र प्रवेश करीत आहे. मोठय़ा लोकांच्या ओळखी होतील. आर्थिक मदत राजकीय – सामाजिक क्षेत्रात तुम्हाला मिळू शकेल. धावपळीत स्वतःच्या प्रकृतीची काळजी व्यवस्थित घ्या. योजनांकडे लक्ष द्या. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात नवा उच्चांक गाठता येईल. शुभ दि. :- 31, 1

धनु-कामाच्या कक्षा रुंदावतील
कन्येच्या सुखस्थानात बुध, पराक्रमात शुक्र प्रवेश करीत आहे. क्षेत्र कोणतेही असो तुमच्या कार्याच्या कक्षा रुंदावतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नव्या पद्धतीचे डावपेच टाकण्याचा योग्य प्रयत्न करता येईल. मोठय़ा खरेदीमधील अडचणी दूर करता येतील. कलाक्षेत्रातील प्रवास भविष्यासाठी सकारात्मक ठरणारा आहे. शुभ दि. :-1, 2.

तूळ-प्रगतीकारक काळ
तुळेच्या पराक्रमात बुध, धनेषात शुक्र राश्यांतर होत आहे. क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक क्षण प्रगतिकारक ठरेल. मागे राहू नका. वेळेला महत्त्व द्या. प्रयत्नांत कसूर नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळेल. तुमचे वर्चस्व दिसेल. लोकप्रियता वाढेल. ग्रहांची साथ व प्रयत्नांचा वेग यामुळे प्रगतीकारक काळ. शुभ दि.:- 2, 3.

वृश्चिक-द्विधा स्थिती होईल
वृश्चिकेच्या धनेषात बुध, स्वराशीत शुक्र राश्यांतर होत आहे. व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घेताना आठवडय़ाच्या सुरुवातीला द्विधा अवस्था होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप होतील. डावपेच टाकताना घाई नको. उत्साह, आत्मविश्वासाच्या जोरावर तुमच्या क्षेत्रात पुढे जाता येईल. शुभ दि.:- 4, 5.

धनु-निर्णयात सावधगिरी बाळगा
स्वराशीत बुध, धनुच्या व्ययेशात शुक्राचे राश्यांतर होत आहे. व्यवसायात लाभदायक प्रोजेक्ट जवळची व्यक्ती तुमच्याकडे आणण्याची शक्यता आहे. दूरदृष्टिकोनातून निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दुटप्पी भूमिका घेणारे लोक सहवासात येतील. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात संमिश्र घटना घडतील. शुभ दि.:- 30, 31

मकर-लोकप्रियता वाढेल
मकरेच्या द्वादशात बुध, एकादशात शुक्राचे राश्यांतर होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याची उपेक्षा करणारे केक सहवासात येतील. तरीही तुमची लोकप्रियता मात्र वाढेल. ध्येय ठेवा. व्यवसायात मोठा बदल होईल. गुंतवणूक करणारे येतील. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात तुमचा निर्णय, कल्पना नावाजल्या जातील. शुभ दि. :- 31, 1.

कुंभ-शेअर्समध्ये लाभ होईल
कुंभेच्या एकादशात बुध, दशमेषात शुक्र राश्यांतर होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुम्ही जे ठरवाल तेच घडवून आणता येईल. अधिकाराचा वापर चांगल्या कामासाठी केल्याचे समाधान मिळेल. व्यवसायात मोठे व्हाल. शेअर्समध्ये फायदा वाढेल. नवी खरेदी होईल. क्रीडा-कलाक्षेत्रात यश मिळेल.  शुभ दि. :- 1, 2

मीन-उत्साहवर्धक काळ
तुमच्या क्षेत्रात तुम्ही ज्या क्षणाची अपेक्षा करीत होतात ते काम होईल. तुमचा दांडगा आत्मविशस उत्साहाने भरलेला असेल. मीनेच्या दशमेषात बुध, भाग्येषात शुक्राचे राश्यांतर होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिशा मिळेल. पदाधिकार मिळेल. नोकरीसाठी चांगला काळ. परदेशगमनाची संधी मिळेल. शुभ दि. :- 2, 3.

आपली प्रतिक्रिया द्या