भविष्य – रविवार ८ ते शनिवार १४ एप्रिल २०१८

46

>> मानसी इनामदार

मेष – कल्पकतेचा वापर

मन विनाकारण अस्थिर राहील. पण चिंतेचे कारण नाही. यश मिळेल. कल्पकतेचा वापर कराल. घरच्यांची साथ लाभेल. नव्या व्यवसाय उद्योगात गुंतवणूक करा. आरोग्य उत्तम राहील. दिनचर्येला शिस्त लावा. त्यामुळे जीवनशैऴी सुधारेल. निळा रंग जवळ बाळगा. महत्त्वाचे निर्णय याच आठवडय़ात घ्या. मुऴांमुळे घरात आनंदी वातावरण असेल.
शुभ आहार – आंबा, आंब्याचा रस, पुरी

वृषभ – तोंडात साखर

रागावर अत्यंत नियंत्रण ठेवा. त्यामुळे होत असऴेऴी कामे बिघडण्याचा संभव आहे. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर हे तत्त्व या आठवड्यात लक्षात ठेवा. मित्रांबरोबर गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर वादविवाद टाळा. पण अनेक महत्वाची कामे मार्गी लागतील. कामानिमित्त बाहेर राहाल. जोडीदारास सोबत ठेवा. भगवा रंग जवळ ठेवा.
शुभ आहार – गाजर, मिश्र भाज्या, गाजराचा रस

मिथुन – मदतीचा हात

समाजातील प्रतिष्ठतांमध्ये वावराल. त्यातून मानसन्मान लाभेल. कलावंताना त्यांच्या कामाचा गौरव म्हणून पुरस्कार लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र ठराल. मित्रमंडळींकडून मदतीचा हात लाभेल. त्यामुळे संबंधात मधुरता निर्माण होईल. पण घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. आकाशी रंग जवळ बाळगा. आभाळाएवढे यश मिळेल.
शुभ आहार – मोसमातील फळे, आंबा, जाम

कर्प – अचानक धनप्राप्ती

कामाचा उत्साह राहील. त्यामुळे सकारात्मकता वाढेल. अचानक धनप्राप्तीचा संभव आहे. जलपूजन करा. देवघरात रोज ताज्या पाण्याने भरऴेला कलश ठेवा. त्याची पूजा करा. घरातील अडचणी नाहीशा होतील. अनावश्यक खर्चाला आळा घाला. पांढरा रंग जवळ बाळगा. काwटुंबीक सोहळ्यात सहभागी क्हाल. स्वकाrयांच्या भेटीगाठी होतील.
शुभ आहार – दूध आणि फळे, दही, श्रीखंड

सिंह – यश मिळेल

घरात सदस्यांमध्ये उगीचच वादविवाद संभवतात. पण तुम्ही त्यापासून ऴांब राहा. ज्येष्ठांच्या प्रपृतीची काळजी घ्या. त्यांना पौष्टिक आहार खायला घाला. कार्यालयीन कामकाजात यश मिळेल. गृहिणींना कामाचा ताण वाढेल. सक्तीने विश्रांती घ्यावी. नाहीतर तब्येतीवर विपरीत परिणाम होईल. व्यवसाय उद्योगात यश मिळेल. त्यातून अर्थप्राप्ती होईल. तपकिरी रंग जवळ बाळगा.
शुभ आहार – चिपू, ताडगोळे, पोळी

कन्या – बाहेरगावी जाल

संगीत साधनेतून अध्यात्माची प्राप्ती होईल. उत्तमोत्तम संगीतरचना ऐकाल. त्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. मनाजोगत्या गोष्टी घडतील. गृहिणी घरातील आवडत्या माणसांसाठी पाककाwशल्य पणाला लावतील. बाहेर जाण्याचा योग आहे. जवळच्या पर्यटनस्थळास भेट द्याल. जवळची माणसे भेटतील. खुश क्हाल. कामात यश मिळेल. लाल रंग जवळ ठेवा.
शुभ आहार – घावन, आंबोळी, इडऴी

तूळ – खरेदी कराल

व्यवसायासाठी नव्या वास्तूच्या उभारणीचे नियोजन कराल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करा. नवीन उत्पन्नाचे साधन जोडऴे जाईल. नव्या वस्तूंची खरेदी कराल. त्यामुळे मनास उभारी मिळेल. हिरवा रंग जवळ बाळगा. निसर्गाच्या जवळ जाल.
शुभ आहार – हिरव्या पालेभाज्या, भाज्या

वृश्चिक – सुवर्णखरेदी होईल

विनाकारण हितशत्रूंचा त्रास होईल. दुर्लक्ष करा. पर्यटनावर खर्च होईल. आवडत्या स्थळास भेट द्याल. गंगाजल घरी येईल. देवघरात स्थापना करा. त्यामुळे तुमची सकारात्मकता वाढेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. आवडीच्या वस्तू खरेदी कराल. ती बहुदा सुवर्णखरेदी असेल. त्यामुळे घरात सुबत्ता येईल. सोन्याची सर्वप्रथम पूजा करा. सोनेरी रंग शुभ ठरेल.
शुभ आहार – पुरणपोळी, बेसन, डाळ

धनु – नशिबाची साथ

खूप दिवस रखडऴेऴे काम मार्गी लागेल. त्यामुळे मनास समाधान लाभेल. पत्नीस विश्वासात घ्या. त्यामुळे संबंधात माधूर्य वाढेल. नशिबाची पूर्ण साथ लाभेल. तिच्यासाठी मौल्यवान खरेदी कराल. आर्थिक लाभ संभवतो. पिवळा रंग तुमच्या राशीचा. त्यामुळे तुमच्यासाठी नेहमीच शुभ राहील. खेळाडूंना नवी उमेद मिळेल.
शुभ आहार – भोपळा, कांदा, भाज्या

मकर – गुलाबी आठवडा

नवविवाहितांसाठी आनंदाचा काळ. नवी स्वप्ने पाहाल. ती पूर्ण होतील. जोडीदाराची साथ मोलाची. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. सत्पात्री अन्नदान करा. त्याचा नवीन संसाराला खूप फायदा होईल. खर्चाचे नियोजन करा. त्यातून बचत होईल. गुलाबी रंग जवळ बाळगा. जोडीने देवीचे दर्शन करा.
शुभ आहार – थंड पदार्थ, दुधाचे पदार्थ, फळे

कुंभ – आनंदाचे क्षण

भाग्योदय आहे. नशिबाची प्रचंड साथ लाभेल. अर्थप्राप्ती होईल. पण पैशांना वाटा फुटतील. रोजच्या संपका&तील व्यक्तींवर अति विश्वास ठेवू नका. बाहेर गावी जाण्याचा योग आहे. अनेक आनंदाचे क्षण लाबह्तील. पण जवळची व्यक्ती दुरावेल. त्याची खंत राहील. नारिंगी रंग जवळ बाळगा. घरातील ज्येष्ठांची विचारपूस करा. त्यांच्यासाठी वेळ काढा.
शुभ आहार – ताक, दही, लोणी

मीन – सुरक्षितता लाभेल

खेळाडूंसाठी सरावाचा आठवडा. उत्साही वातावरण. ऊर्जा मिळेल. मेहनतीतील सातत्य यशाचे शिखर मिळवून देईल. कलावंतांचा मानसन्मान होईल. विनाकारण एखादे आर्थिक संकट उद्भवते. मन शांत ठेवा. हितसंबंध सुधारतील. जवळच्या व्यक्तीची नव्याने छानशी ओळख होईल. त्यामुळे मनास सुरक्षितता लाभेल. गडद निळा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार – आवडीचे पदार्थ, गोड, गूळ

आपली प्रतिक्रिया द्या