भविष्य – रविवार ८ ते शनिवार १४ जुलै २०१८

64

>> नीलिमा प्रधान

मेष – गैरसमज दूर होतील
सूर्य-नेपच्यून लाभयोग व चंद्र-मंगळ त्रिकोणयोग होत आहे. उदासीनपणा कमी होईल. राजकीय क्षेत्रात तुम्ही केलेले प्रयत्न सत्कारणी लागतील. सामाजिक कार्यात लोकप्रियता मिळेल. तुमच्याबद्दलचे गैरसमज दूर होतील. व्यवसायात जम बसेल. कोर्ट केस लवकर संपवा. प्रकृतीत सुधारणा होईल.
शुभ दिनांक – ९, १०.

वृषभ – कुटुंबातील तणाव दूर करा!
सूर्य-चंद्र लाभयोग आणि चंद्र-बुध केंद्रयोग होत आहे. नोकरीत जम बसेल. धंद्यात लक्ष देऊन समस्या सोडवा. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय क्षेत्रात लोकांना दिलेला शब्द पूर्ण करण्याची तयारी ठेवा. कायद्याचा विचार करून कोणताही व्यवहार करा. कुटुंबातील तणाव, गैरसमज दूर करा.
शुभ दिनांक – ११, १३.

मिथुन -परदेशी जाण्याचा योग
चंद्र-बुध लाभयोग आणि सूर्य-प्लुटो प्रतियुती होत आहे. सोमवार, मंगळवार कामाचा व्याप वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. वरिष्ठांच्या मतांना दुजोरा दिल्याने सामाजिक कार्यात त्यांची मदत मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. परदेशी जाण्याचा योग येईल.
शुभ दिनांक – ८, १३.

कर्क- अंदाज चुकेल
बुध-नेपच्यून षडाष्टक योग आणि शुक्र-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात शुक्रवार, शनिवार तणाव आणि समस्या येईल. तुमचा अंदाज चुकेल. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांचा दबाव त्रासदायक वाटेल. कुटुंबात संततीच्या प्रगतीसंबंधी चिंता कमी होईल. वृद्ध व्यक्तीची सेवा करावी लागेल.
शुभ दिनांक – ९, १०.

सिंह -गुप्त कारवायांचा त्रास
याच आठवडय़ात महत्त्वाचे काम करा. चर्चा व संवादात यश मिळेल. सूर्य-नेपच्यून त्रिकोणयोग आणि चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. राजकीय क्षेत्रात स्वतः खात्री करून मगच मत प्रदर्शित करा. आठवडय़ाच्या शेवटी एखादा प्रश्न उग्र स्वरूप धारण करील. गुप्त कारवायांचा त्रास होईल.
शुभ दिनांक – ९, ११

कन्या – प्रेमात तणाव निर्माण होईल
सूर्य-चंद्र लाभयोग आणि बुध-गुरू केंद्रयोग होत आहे. रविवार, सोमवार कुटुंबात प्रश्न निर्माण होतील. वाटाघाटीत नाराजी व गैरसमज होईल. व्यवसायात दुर्लक्ष नको. करार करताना कायद्याचा विचार करा. प्रेमात तणाव निर्माण होईल. क्रीडा क्षेत्रात चमकाल. घर, वाहन खरेदीची संधी मिळेल.
शुभ दिनांक – १०, ११.

तूळ – दर्जेदार मित्र मिळतील
चंद्र-शुक्र लाभयोग आणि सूर्य-प्लुटो प्रतियुती होत आहे. राजकीय क्षेत्रात तुमच्या हिताच्या घटना घडतील. तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास सोमवार, मंगळवारी डळमळीत करण्याचा प्रयत्न होईल. दर्जेदार मित्र मिळतील. नवीन संधी मिळेल. मैत्री वाढेल.
शुभ दिनांक – १३, १४.

वृश्चिक – बदनामीचा प्रयत्न होईल
चंद्र-बुध लाभयोग आणि शुक्र-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. नोकरीत सावधपणे महत्त्वाचा निर्णय घ्या. इतरांच्या सांगण्यावरून तुमचे विचार बदलू नका. राजकीय क्षेत्रात बदनाम करण्याचा प्रयत्न होईल. सामाजिक कार्यात तुमच्या स्वभावाचा आणि प्रतिष्ठsचा वापर करून घेतला जाईल. मात्र त्याचा गैरवापर होऊ देऊ नका. शुभ दिनांक ः १०, १४.

धनु – कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी
सूर्य-चंद्र लाभयोग आणि बुध-नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. नकळत बोलण्यातून चूक होऊ शकते. वाटाघाटीत, व्यवसायात भलताच शब्द देऊन अडचणी वाढू शकतात. कुटुंबात इतरांच्या जबाबदारीमुळे तुमची दगदग होऊ शकते. नोकरीत बदल करता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.
शुभ दिनांक – ८, १२.

मकर – चर्चेत संयम ठेवा
सूर्य-प्लुटो प्रतियुती आणि बुध-नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. तुम्ही कोणाला शब्द देत नाही, पण जर दिला तर तो नक्की पाळता. खंबीर आणि एकमार्गी स्वभावामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. चर्चेत संयम ठेवा. सामाजिक बांधिलकी तुम्हाला चांगली परिचयाची आहे, पण तुमचा प्रभाव पडणे कठीण आहे.
शुभ दिनांक – १०, १४.

कुंभ -चौफेर घोडदौड
सूर्य-चंद्र लाभयोग आणि शुक्र-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. चौफेर घोडदौड करता येईल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घ्या. याच आठवडय़ात तुमचा दबदबा दिसून येईल. सामाजिक कार्यात लोकांचे प्रेम मिळेल. आर्थिक आवक येण्यास वेळ लागेल. कुटुंबाला खूश ठेवता येईल. कोर्ट केस यशस्वीपणे पार पडू शकते.
शुभ दिनांक – ८, १२.

मीन – पैसा मिळेल
चंद्र-बुध लाभयोग आणि चंद्र-मंगळ त्रिकोण योग होत आहे. व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळेल. पैसा मिळेल. अर्थात गोड बोलून तुमचा पैसा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. विरुद्धलिंगी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. व्यसन, मोह यामुळे अडचणी वाढतील. फाजील आत्मविश्वास न ठेवता कार्य सिद्ध करा.
शुभ दिनांक- ९, १०.

आपली प्रतिक्रिया द्या