भविष्य – रविवार २४ ते शनिवार ३० जून २०१८

48

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रकृतीची काळजी घ्या
ध्येय व आव्हान समोर असले की तुमची प्रतिमा व आत्मविश्वास जास्त प्रमाणात जागृत होत असतो. त्याचाच उपयोग राजकीय-सामाजिक क्षेत्रात खेळी खेळताना होईल. मेषेच्या सुखस्थानात बुध व सूर्य, शनी प्रतियुती होत आहे. कार्य पूर्ण करताना अडचणी येतील. स्वतःच्या प्रकृतीची काळजी नीट घ्या. शुभ दि. – २७, २८

वृषभ – प्रगतीची संधी
संयम व सबुरी ठेवल्यामुळेच कठीण काळातून तुमची वाटचाल होत आहे. या आठवडय़ात प्रगतीची संधी तुमच्या क्षेत्रात तुम्हाला मिळेल. नोकरीचा प्रश्न सुटेल. चंद्र-शुक्र त्रिकोणयोग व चंद्र-मंगळ युती होत आहे. व्यवसायाला कलाटणी मिळेल. तणाव कमी होईल. सावध राहा. शुभ दि. – २५, २६

मिथुन- डावपेच ओळखून निर्णय घ्या
चंद्र-शुक्र त्रिकोणयोग व बुध हर्षल केंद्रयोग होत आहे. तुमचे वर्चस्व व आत्मविश्वास याचे प्रदर्शन करण्याची वेळ येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विरोधक तुमचे धैर्य डळमळीत करण्याचा प्रयत्न करतील. बुद्धिचातुर्य व व्यवहार याचा मेळ घाला. समोरचे डावपेच ओळखा व निर्णय घ्या. प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. – २७, २८

कर्क – आरोप होऊ शकतो
कुठल्याही समस्येला व वादाला तुम्हीच कारणीभूत आहात असा आरोप तुमच्यावर होऊ शकतो. कर्केत बुध, सूर्य-शनी प्रतियुती व सूर्य मंगळ षडाष्टक योग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात टीका होईल. व्यवसायात फसगत होईल. गुंतवणूक करण्याचा उतावळेपणा नको. शुभ दि. – २४, २५

सिंह – प्रतिष्ठा सांभाळता येईल
सिंहेच्या व्ययस्थानात बुध प्रवेश व शुक्र नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. भावना व व्यवहार यांच्या मोहजालात तुम्हाला गुंडाळण्याचा प्रयत्न केला जाईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मनावर दडपण येईल. dसर्वांची मर्जी राखणे कठीण होईल, पण प्रतिष्ठा सांभाळता येईल. शुभ दि. – २७, २८

कन्या – जमीन व्यवहारात फायदा
कन्येच्या एकादशात बुध प्रवेश व चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न सोडवता येईल. जमीन व्यवहारात घर खरेदी-विक्रीत फायदा होईल. आर्थिक सहाय्य मिळेल. व्यवसायात लक्ष द्या. शेअर्समध्ये फायदा होईल. संतती व जीवनसाथीच्या मर्जीने निर्णय घ्यावा लागेल. प्रवासाचा बेत ठरवाल.शुभ दि. – २४, २५

तूळ – विरोधकांना समज द्याल
अडचणीत आलेली कामे या आठवडय़ात पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. तुळेच्या दशमस्थानात बुध व सूर्य शनी-प्रतियुती होत आहे. तुमच्याबरोबर स्पर्धा करणाऱयांना व विरोधकांना योग्य प्रकारे समज देता येईल. थोरामोठय़ांचे सहाय्य मिळेल. कुटुंबातील तणाव कमी होईल. नोकरीचा प्रयत्न करा. शिक्षण क्षेत्रांत प्रगती. शुभ दि. – २५, २६

वृश्चिक – सत्य समजून घ्या
सामाजिक कार्य करताना विचार तर करायचाच आहे. परंतु सत्य परिस्थितीसुद्धा समजून घ्या. भ्रमात राहून पाहिजे ते यश मिळणे कठीण असते. कल्पनेने चित्र रंगवले जाते. परंतु त्यात जिवंतपणा आणण्यासाठी सत्याचे बारीक निरीक्षण करण्याची गरज जास्त असते. शुभ दि. – २७, २९

धनु – कोर्ट केस संपवा
धनु राशीच्या अष्टमेषात बुधाचे राशांतर व सूर्य-शनी प्रतियुती होत आहे. व्यवसायात करार करताना सावध राहा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रयत्न होईल. आरोप येईल. वरिष्ठांच्या सल्ल्याने, पाठिंब्याने प्रश्न मिटवता येईल. कोर्ट केस संपवण्याची हीच वेळ आहे. योग्य सल्ला घ्या. शुभ दि.- २९, ३०

मकर – जिद्दीने कार्य करा
मकरेच्या सप्तमेषात बुध प्रवेश व सूर्य-चंद्र षडाष्टकयोग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात आवेशाने व जिद्दीने कार्य करा. संताप व्यक्त करण्यापेक्षा लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची तयारी करा. बुधवार, गुरुवारी टीका होईल. अडचणी वाढतील. कायद्याच्या कचाटय़ात सापडू नका. समस्या सोडवाव्या लागतील. शुभ दि. – २५, २६

कुंभ – दमदार पाऊल टाका
तुम्ही दमदार पाऊल पुढे टाका, विरोधक त्या धुळीत गोंधळून जातील. तुमचे ध्येय साध्य करणे सोपे होऊ शकेल. कुंभेच्या षष्ठस्थानात बुध प्रवेश व सूर्य, शनी प्रतियुती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. संताप व्यक्त करण्याची वेळ येऊ शकते. मित्राची भेट होईल. मनावर दडपण राहील. शुभ दि. – २५, २८

मीन – नव्या परिचयाने उत्साह वाढेल
मीनेच्या पंचमेषात बुधाचे राशांतर व चंद्र-शुक्र त्रिकोण योग होत आहे. प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नवीन परिचयाने तुमचा उत्साह वाढेल. विचारांना चालना मिळेल. व्यवसायात वाढ होईल. खरेदीची संधी मिळेल. पोटाची काळजी घ्या. शुभ दि. – २८, २९

आपली प्रतिक्रिया द्या