अपघाताचा ‘हा’ व्हिडीओ बघून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

60
सामना ऑनलाईन । मुंबई
धुवाधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जात असताना एका भरधाव टेम्पो चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटते आणि हा टेम्पो थेट दुभाजकावर चढून दुसऱ्या कारला धडक देतो. चित्रपटाला साजेसे हे दृष्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून याचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये एका हायवेवर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढणाऱ्या टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते. काही कळायच्या आत टेम्पो थेट दुभाजकावर चढतो आणि पुढे जाणाऱ्या कारला जोरदार धजक देतो. या धडकेमुळे कार जाग्यावर फिरते. नियंत्रण सुटलेला टेम्पो रस्त्याच्या कडेला मैदानात जाऊन थांबतो. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झालेली नाही. परंतु देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्ययच या अपघाताचा व्हिडीओ पाहताना येतो. अपघाताचा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळाली नसली तरी सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ :
आपली प्रतिक्रिया द्या