अरेच्चा! घोड्यानं घातली जीन्स

आजवर आपण कुत्रा किंवा मांजरीला हौस म्हणून त्यांच्या मालकांनी त्यांना कपडे घातल्याचे पाहिले आहे. परंतु सध्या इंटरनेटवर एका फॅशनेबल घोडय़ाचा फोटो व्हायरल होतोय. हा फोटो पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. कारण घोडय़ाला चक्क जीन्स घालण्यात आली आहे.

घोडय़ाच्या पुढच्या दोन पायांमध्ये जीन्स घातली असून जीन्सची लांबी जास्त असल्याने त्याला नीट बसवण्यासाठी खालून फोल्ड केली आहे. बेन वोयटास या युझरने हा फोटो ट्विटरवर शेअर करत म्हटलेय, घोडय़ाच्या पुढच्या पायाला जखम झाली असून त्यावर वारंवार माशा घोंघावत होत्या. त्यामुळे माझ्या पत्नीने ही अनोखी शक्कल लढवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या