रुग्णालयाच्या Wi-Fi वर 80 हजार ‘चाईल्ड पॉर्न’ केले डाउनलोड, महिलेला पोलिसांनी केली अटक

लॉकडाऊनच्या काळात पॉर्न पाहणाऱ्या आणि डाउनलोड करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले. मात्र लंडनमध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. येथे रुग्णालयातील सार्वजनिक वायफायवर तब्बल 80 हजार ‘चाईल्ड पॉर्न’ डाउनलोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लंडन पोलिसांनी एका तृतीयपंथी महिलेला अटक केली असून न्यायालयाने तिला 9 महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला आहे. ‘डेली मेल’ने याबाबत वृत्त दिले आहे.

लंडन पोलिसांनी अटक केलेल्या 54 वर्षीय तृतीयपंथी महिलेचे नाव ज्यूली मार्शल (Julie Marshall) असे आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला 2017 मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान तिचा इंटरनेट पॅक संपला आणि तिने रुग्णालयाच्या वायफायचा वापर करून बेडवर झोपून असताना हा कारणामा केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ज्यूली हिच्या घरी छापेमारी केली. पोलिसांनी तिच्या घरून दोन लॅपटॉप, फोन आणि सीडी जप्त केल्या.

पोलिसांनी लॅपटॉप तपासला तेव्हा त्यात हजारो चाइल्ड पॉर्न फोटो सापडले आहेत. महिलेला अटक करण्यात आली आहे. यानंतर लंडनच्या प्रेस्टन क्राउन कोर्टानं तिला शिक्षा सुनावली. मात्र आता तिला पुरुषांच्या तुरुंगात ठेवायचे की महिलांच्या तुरूंगात टाकायचं याबाबत पोलीस संभ्रमात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या