…आणि सीतारमण यांनी शशी थरूर यांची भेट घेतली

22
niramla-sitaraman

सामना ऑनलाईन । तिरुअनंतपूरम

लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान सत्ताधारी-विरोधक-अपक्ष असे सगळेच एकमेकांवर तुटून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र असे असतानाच तिरुअनंतपूरममध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

शशी थरूर हे सोमवारी तिरुअनंतपूरममधील एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी एका धार्मिक विधी दरम्यान त्यांची तुला करण्यात आली. हा विधी सुरू असतानाच शशी थरूर अचानक पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डोक्याला 11 टाके पडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या