अमेरिकेतील शाळेत भुताचा धूमाकूळ, व्हिडिओ व्हायरल

1079

सामना ऑनलाईन । कॅलिफोर्निया

अमेरिकेतील एका शाळेत भुताने धूमाकूळ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मध्यरात्री भूत शाळेच्या हॉलमधील कपाटातील पुस्तकं जमिनीवर फेकतं तर कधी तिथे ठेवलेल्या सामानाची आदळआपट करतं. भूताच्या या करामतीचे दृश्य शाळेतील सीसीटीव्हीने कैद केले आहे. शाळेनेही या घटनेचा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितला असून अनेकांनी ही चेष्टा असल्याचं म्हटलं आहे. तर शाळेत भूत आहेच, असा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे. ही शाळा आर्यंलडमधील कोर्क येथे असून डीरपार्क सीबीएस (Deerpark CBS) असे शाळेचे नाव आहे.

शाळेने प्रसिद्ध केलेला व्हिडिओ १ ऑक्टोबरचा आहे. यात मध्यरात्री ३ च्या सुमारास हॉलच्या एका कोपऱ्यात आदळआपट झाल्याचे दिसत आहे. हे दोन मिनिटांचे व्हिडिओ फूटेज आहे. मध्यरात्री सगळीकडे निरव शांतता असताना अचानक दरवाजा आपटल्याचा आवाज येतो. त्यानंतर हॉलच्या कोपऱ्यातील पुस्तकांचे कपाट बराचवेळ हलत असल्याचे दिसते. नंतर यातील काही पुस्तकं खाली पडतात. तर दुसऱ्याच क्षणाला जमिनीवर ठेवलेला सूचनांचा बोर्ड हवेत उडताना या व्हिडिओत दिसतो.

ही घटना जेव्हा घडली तेव्हा मध्यरात्र होती. यामुळे त्यावेळी शाळेत कोणताही कर्मचारी नव्हता. याआधीही शाळेच्या शौचालयातून कोणाच्यातरी रडण्याचा आवाज येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी शाळेच्या कर्मचाऱ्यांनाही रात्रीच्या वेळेस शाळेच्या आवारात विचित्र घटना घडत असल्याचा प्रत्यय आला. यामुळे रात्रपाळीत काम करायला कोणीही तयार होत नाही. पण काही साहसी कर्मचाऱ्यांनी खरं खोटं तपासण्यासाठी एक रात्र शाळेत घालवली होती. पण त्यांनाही रात्रीच्या वेळेस विचित्र अनुभव आला. असे शाळेचे मुख्याध्यापक अॅरोन वोल्फ (Aaron Wolfe) यांनी म्हटले आहे. शाळेची स्थापना १८२८ साली करण्यात आली असून कोर्कमधील सर्वात जुनी शाळा म्हणून या शाळेची ओळख आहे.

पाहा व्हिडिओ –

आपली प्रतिक्रिया द्या