ग्रॅण्ड हयातमध्ये नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त बुधवारी मुंबईसह राज्यभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मराठी नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष आता फाईव्ह स्टार हॉटेलमध्येदेखील होऊ लागला आहे. सांताक्रुझच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेना आणि हॉटेल व्यवस्थापनाच्या वतीने नववर्षानिमित्त गुढी उभारण्यात आली.

     गेल्या आठ वर्षांपासून ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेनेच्या वतीने गुढी उभारण्यात येते, अशी माहिती आयोजक आणि भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मनोज धुमाळ यांनी दिली. या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार संजय राऊत, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख- आमदार अॅड. अनिल परब, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आणि आमदार सचिन अहिर, कार्याध्यक्ष अजित साळवी, संजय कदम, दिलीप जाधव, योगेश आवळे, माजी नगरसेवक सदा परब, एचआर तेजस चांदपुरे, हॉटेलचे मॅनेजर शेरी पड्डा आदी उपस्थित होते.