अभिनेत्रीच्या नावे बोगस आधारकार्ड देऊन हॉटेलमध्ये रूम घेतली

10

सामना प्रतिनिधी । मुंबई

बॉलीवूड अभिनेत्रीच्या नावाचे बोगस आधारकार्ड दाखवून वांद्रे येथील ‘प्लश’ या पंचतारांकित हॉटेलमधील रूमचे ऑनलाईन बुकिंग केल्याचे उघडकीस आले आहे.

‘काबिल’, ‘सिंग साब द ग्रेट’, ‘सनम रे’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री ऊर्वशी रौतेला हिच्या नावाने बोगस आधारकार्ड बनल्याची माहिती यामुळे समोर आली आहे. एका कार्यक्रमासाठी ऊर्वशी प्लश हॉटेलमध्ये आली असता हॉटेल स्टाफने तिच्या नावे रूम बुक झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी तिने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिस तपासात ऑनलाईन बुकिंग वेळी वापरण्यात आलेल्या आधारकार्डचा क्रमांक बोगस असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ४२०, ४६८ अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या